S M L

काँग्रेस-राष्ट्रवादीत 'आघाडी'ची लढाई !

30 जानेवारीनिवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेला धूळ चारण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले पण आता आघाडीमध्येच जुंपली आहे. राष्ट्रवादीने याआधी शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय भूकंप घडवलेत आणि आता मित्रपक्षातच फोडाफोडी सुरू केली आहे. अलीकडेच झालेल्या एका सभेत काँग्रेसचे नेते विलासराव देशमुख म्हणतात, आमची लढाई स्वकियांशीच आहे असं विधान केलं. आता आपला क्रमांक 1 चा शत्रू हा राष्ट्रवादीच आहे, हे आता काँग्रेसच्या नेत्यांना चांगलेच उमगले आहे. पण, आपल्याला राज्याचा मुख्यमंत्री व्हायचं तर काँग्रेसचीच ताकद कमी करावी लागेल, असा निर्धारच अजित पवारांनी केला आहे. त्यामुळे सुरुवातीला भाजप आणि शिवसेनेला खिंडार पाडल्यानंतर आता राष्ट्रवादीने काँग्रेसलाच धक्के द्यायला सुरुवात केली आहे. शनिवारी काँग्रेसचे हिंगोली जिल्हाध्यक्ष शिवाजी माने यांना राष्ट्रवादीत आणून अजित पवारांनी काँग्रेसला डिवचलं.काँग्रेस-राष्ट्रवादीतला संघर्ष कोकणातही जिल्हा परिषदात चांगलाच चिघळणार आहे. नारायण राणेंनी आपल्या मुखपत्रात राष्ट्रवादीच्या वस्त्रहरणाचा इशारा दिला. त्याला अजित पवारांनीही सडेतोड उत्तर दिलं. नारायण राणेंनी आपल्या वर्तमानपत्रातून राष्ट्रवादीचे वस्त्रहरण करण्याची वल्गना केली. पण राणेंचंच वस्त्रहरण करण्याचा चंग बांधलेल्या राष्ट्रवादीने त्यांना आज एक जोर का झटका दिला. नारायण राणेंचे सहकारी आणि वेंगुर्ल्यांचे माजी आमदार शंकर कांबळी यांना आपल्याकडे आणण्यात राष्ट्रवादीला यश आलं आहे. शंकर कांबळी यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. नारायण राणेंसाठी हा मोठा धक्का आहे. शंकर कांबळी हे शिवसेनेतून नारायण राणेंसोबत काँग्रेसमध्ये आले होते. पण काँग्रेसमध्ये आपल्याला योग्य सन्मान मिळाला नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. अजित पवार केवळ बोलून गप्प बसले नाहीत तर त्यांनी नारायण राणेंचे खंदे समर्थक आणि वेंगुर्ल्याचे माजी आमदार शंकर कांबळीही यांनाही गळाला लावलं. राष्ट्रवादीच्या या धक्क्यानंतर आता मंगळवारी कुडाळच्या सभेत नारायण राणे राष्ट्रवादीला कसं उत्तर याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 30, 2012 05:24 PM IST

काँग्रेस-राष्ट्रवादीत 'आघाडी'ची लढाई !

30 जानेवारी

निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेला धूळ चारण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले पण आता आघाडीमध्येच जुंपली आहे. राष्ट्रवादीने याआधी शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय भूकंप घडवलेत आणि आता मित्रपक्षातच फोडाफोडी सुरू केली आहे. अलीकडेच झालेल्या एका सभेत काँग्रेसचे नेते विलासराव देशमुख म्हणतात, आमची लढाई स्वकियांशीच आहे असं विधान केलं. आता आपला क्रमांक 1 चा शत्रू हा राष्ट्रवादीच आहे, हे आता काँग्रेसच्या नेत्यांना चांगलेच उमगले आहे. पण, आपल्याला राज्याचा मुख्यमंत्री व्हायचं तर काँग्रेसचीच ताकद कमी करावी लागेल, असा निर्धारच अजित पवारांनी केला आहे.

त्यामुळे सुरुवातीला भाजप आणि शिवसेनेला खिंडार पाडल्यानंतर आता राष्ट्रवादीने काँग्रेसलाच धक्के द्यायला सुरुवात केली आहे. शनिवारी काँग्रेसचे हिंगोली जिल्हाध्यक्ष शिवाजी माने यांना राष्ट्रवादीत आणून अजित पवारांनी काँग्रेसला डिवचलं.काँग्रेस-राष्ट्रवादीतला संघर्ष कोकणातही जिल्हा परिषदात चांगलाच चिघळणार आहे. नारायण राणेंनी आपल्या मुखपत्रात राष्ट्रवादीच्या वस्त्रहरणाचा इशारा दिला. त्याला अजित पवारांनीही सडेतोड उत्तर दिलं. नारायण राणेंनी आपल्या वर्तमानपत्रातून राष्ट्रवादीचे वस्त्रहरण करण्याची वल्गना केली. पण राणेंचंच वस्त्रहरण करण्याचा चंग बांधलेल्या राष्ट्रवादीने त्यांना आज एक जोर का झटका दिला.

नारायण राणेंचे सहकारी आणि वेंगुर्ल्यांचे माजी आमदार शंकर कांबळी यांना आपल्याकडे आणण्यात राष्ट्रवादीला यश आलं आहे. शंकर कांबळी यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. नारायण राणेंसाठी हा मोठा धक्का आहे. शंकर कांबळी हे शिवसेनेतून नारायण राणेंसोबत काँग्रेसमध्ये आले होते. पण काँग्रेसमध्ये आपल्याला योग्य सन्मान मिळाला नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

अजित पवार केवळ बोलून गप्प बसले नाहीत तर त्यांनी नारायण राणेंचे खंदे समर्थक आणि वेंगुर्ल्याचे माजी आमदार शंकर कांबळीही यांनाही गळाला लावलं. राष्ट्रवादीच्या या धक्क्यानंतर आता मंगळवारी कुडाळच्या सभेत नारायण राणे राष्ट्रवादीला कसं उत्तर याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 30, 2012 05:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close