S M L

...तर कर्णधारपद सोडण्यास तयार - धोणी

31 जानेवारीइंग्लंड पाठोपाठ ऑस्ट्रेलियात टीम इंडियाला व्हाईटवॉश मिळाल्यावर टीम इंडियावर चौफेर टीका झाली. यावर टीमची कामगिरी माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि कर्णधारपदाला मी अतिरिक्त जबाबदारी समजतो जर माझ्यापेक्षा चांगला कर्णधार असेल तर मी कर्णधारपद सोडण्यास तयार आहे असं स्पष्ट उत्तर धोणीने दिलं. मी नेहमी चांगलं काही करण्याचा प्रयत्न केला आहे असंही धोणी यावेळी म्हणाला. त्याचबरोबर सीनिअर खेळाडूंबद्दल बोलतानाही धोणीने बचावात्मक बाजू घेतली. वयामुळे काही फरक पडत नाही, खेळाडूची कामगिरी महत्त्वाची असते असं धोणींने स्पष्ट केलं. ऑस्ट्रेलियात दारुण पराभवानंतर धोणीने प्रसारमाध्यमांना पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. इंग्लंड पाठोपाठ ऑस्ट्रेलियात टीम इंडियाला व्हाईटवॉश मिळाल्यामुळे धोणीच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला. गेल्या सात महिन्यात परदेशात टीम इंडियाने नेहमी पराभवाचा झेंडाच रोवला आहे. इंग्लंडमध्ये 4-0 आणि ऑस्ट्रेलियातही 4-0 असा लाजिरवान्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 31, 2012 03:10 PM IST

...तर कर्णधारपद सोडण्यास तयार - धोणी

31 जानेवारी

इंग्लंड पाठोपाठ ऑस्ट्रेलियात टीम इंडियाला व्हाईटवॉश मिळाल्यावर टीम इंडियावर चौफेर टीका झाली. यावर टीमची कामगिरी माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि कर्णधारपदाला मी अतिरिक्त जबाबदारी समजतो जर माझ्यापेक्षा चांगला कर्णधार असेल तर मी कर्णधारपद सोडण्यास तयार आहे असं स्पष्ट उत्तर धोणीने दिलं. मी नेहमी चांगलं काही करण्याचा प्रयत्न केला आहे असंही धोणी यावेळी म्हणाला. त्याचबरोबर सीनिअर खेळाडूंबद्दल बोलतानाही धोणीने बचावात्मक बाजू घेतली. वयामुळे काही फरक पडत नाही, खेळाडूची कामगिरी महत्त्वाची असते असं धोणींने स्पष्ट केलं. ऑस्ट्रेलियात दारुण पराभवानंतर धोणीने प्रसारमाध्यमांना पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. इंग्लंड पाठोपाठ ऑस्ट्रेलियात टीम इंडियाला व्हाईटवॉश मिळाल्यामुळे धोणीच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला. गेल्या सात महिन्यात परदेशात टीम इंडियाने नेहमी पराभवाचा झेंडाच रोवला आहे. इंग्लंडमध्ये 4-0 आणि ऑस्ट्रेलियातही 4-0 असा लाजिरवान्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 31, 2012 03:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close