S M L

माथेफिरु संतोष मानेची येरवड्यात रवानगी होणार

01 जानेवारीपुण्यात एसटी महामंडळाची बस पळवून हैदोस घालणार्‍या माथेफिरु संतोष मानेचा वैद्यकीय निरीक्षणाचा कालावधी वाढवण्यात आला आहे. पुणे कोर्टाने आज हा निर्णय घेतला. माने हा मनोरुग्ण असल्याचे त्याच्या डॉक्टारांनी सांगितलं होतं. त्यामुळे वैद्यकीय निरीक्षणानंतरच त्याच्यावर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. मानेला 6 फेब्रुवारीपर्यंत येरवडा इथल्या मनोरुग्णालयात ठेवण्याचे आदेश पुणे कोर्टाने दिले आहे. माथेफिरु संतोष मानेनं प्रजासत्ताक दिनाच्या आदल्यादिवशी मनासारखी ड्युटी न मिळाल्यामुळे स्वारगेट स्टेशनमधून एसटीची बस पळवून नेली. आणि शहरात तब्बल एक तास दामटली. वाटेत येईल त्या वाहनांना धडका दिल्यात. या अपघात आठ निष्पाप लोकांचा बळी गेला तर 27 जण जखमी झाले होते. अखेर आज कोर्टाने संतोष मानेची येरवडा मनोरुग्नालयात दाखल करा असा आदेश दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 1, 2012 02:16 PM IST

माथेफिरु संतोष मानेची येरवड्यात रवानगी होणार

01 जानेवारी

पुण्यात एसटी महामंडळाची बस पळवून हैदोस घालणार्‍या माथेफिरु संतोष मानेचा वैद्यकीय निरीक्षणाचा कालावधी वाढवण्यात आला आहे. पुणे कोर्टाने आज हा निर्णय घेतला. माने हा मनोरुग्ण असल्याचे त्याच्या डॉक्टारांनी सांगितलं होतं. त्यामुळे वैद्यकीय निरीक्षणानंतरच त्याच्यावर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. मानेला 6 फेब्रुवारीपर्यंत येरवडा इथल्या मनोरुग्णालयात ठेवण्याचे आदेश पुणे कोर्टाने दिले आहे. माथेफिरु संतोष मानेनं प्रजासत्ताक दिनाच्या आदल्यादिवशी मनासारखी ड्युटी न मिळाल्यामुळे स्वारगेट स्टेशनमधून एसटीची बस पळवून नेली. आणि शहरात तब्बल एक तास दामटली. वाटेत येईल त्या वाहनांना धडका दिल्यात. या अपघात आठ निष्पाप लोकांचा बळी गेला तर 27 जण जखमी झाले होते. अखेर आज कोर्टाने संतोष मानेची येरवडा मनोरुग्नालयात दाखल करा असा आदेश दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 1, 2012 02:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close