S M L

छगन भुजबळ यांनी 178 कोटींचा घोटाळा केल्याची तक्रार

02 फेब्रुवारीवांद्रे इथल्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टमध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी 178 कोटींचा घोटाळा केल्याची तक्रार संस्थेचे उपाध्यक्ष सुनील कर्वे यांनी केली आहे. या घोटाळ्याची लेखी तक्रार कर्वेंनी आर्थिक गुन्हे विभागाकडे केलीय. ट्रस्टशी संबंधित मालमत्तेचा वापर भुजबळ स्वत:च्या फायद्यासाठी करत आहेत,आणि स्वत:ची जहागिरी असल्याप्रमाणे ते शिक्षण संस्थेचा वापर करत असल्याचे पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. खासगी तसेच राजकीय समारंभासाठीचा खर्च ट्रस्ट उचलत आहे आणि गेल्या 29 सप्टेंबरच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा मुद्दा मांडण्यात आला. भुजबळांनी सगळा खर्च ट्रस्टकडे जमा करावा अशी मागणी झाली. पण भुजबळांनी त्याला नकार दिल्यामुळे हे पाऊल उचलल्याचे कर्वेंनी तक्रारीत म्हटलं आहे. या संदर्भातली एक याचिका कर्वेंनी धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे. धर्मादाय आयुक्त हे ''क्वासीज्युडिशीअरी ऍथोरिटी'' आहेत. त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा असल्यानेच आपण एमईटी संस्था सोडणार नसल्याचे स्पष्टीकरण कर्वेंनी दिलं आहे. या संस्थेत राहूनच कायदेशीर लढाई लढणार असल्याचे कर्वेंनी म्हटलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 2, 2012 05:31 PM IST

छगन भुजबळ यांनी 178 कोटींचा घोटाळा केल्याची तक्रार

02 फेब्रुवारी

वांद्रे इथल्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टमध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी 178 कोटींचा घोटाळा केल्याची तक्रार संस्थेचे उपाध्यक्ष सुनील कर्वे यांनी केली आहे. या घोटाळ्याची लेखी तक्रार कर्वेंनी आर्थिक गुन्हे विभागाकडे केलीय. ट्रस्टशी संबंधित मालमत्तेचा वापर भुजबळ स्वत:च्या फायद्यासाठी करत आहेत,आणि स्वत:ची जहागिरी असल्याप्रमाणे ते शिक्षण संस्थेचा वापर करत असल्याचे पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. खासगी तसेच राजकीय समारंभासाठीचा खर्च ट्रस्ट उचलत आहे आणि गेल्या 29 सप्टेंबरच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा मुद्दा मांडण्यात आला. भुजबळांनी सगळा खर्च ट्रस्टकडे जमा करावा अशी मागणी झाली. पण भुजबळांनी त्याला नकार दिल्यामुळे हे पाऊल उचलल्याचे कर्वेंनी तक्रारीत म्हटलं आहे. या संदर्भातली एक याचिका कर्वेंनी धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे. धर्मादाय आयुक्त हे ''क्वासीज्युडिशीअरी ऍथोरिटी'' आहेत. त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा असल्यानेच आपण एमईटी संस्था सोडणार नसल्याचे स्पष्टीकरण कर्वेंनी दिलं आहे. या संस्थेत राहूनच कायदेशीर लढाई लढणार असल्याचे कर्वेंनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 2, 2012 05:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close