S M L

प्रफुल्ल पटेल यांनी घेतली अडीच लाख डॉलर्सची लाच ?

03 फेब्रुवारीदेशात भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस येत असताना आता आणखी एका प्रकरणाने खळबळ उडाली आहे. भारतीय वंशाचे कॅनडियन व्यावसायिक नझीर कारीगर यांनी प्रफुल्ल पटेल यांना अडीच लाख डॉलर, लाच दिल्याचा दावा कॅनडाच्या वृत्तपत्रांनी केला आहे. पटेल यांना लाच देण्यासाठी राज्यातील राष्ट्रवादीचे मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी मध्यस्थी केल्याचंही नझीर यांनी सांगितल्याचा दावा या वृत्तपत्रांनी केला आहे. एअर इंडियात सुरक्षेसाठी `फेशियल रेक्गनायझेशन` या प्रणालीचं 100 मिलियन डॉलरचे कंत्राट घेण्यासाठी ही लाच देण्यात आली. नझीर मूळचे सोलापूरचे आहेत. त्या ओळखीतून त्यांनी लक्ष्मण ढोबळे यांच्यामार्फत तत्कालीन हवाई वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती मिळतेय. यासाठी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त हसन गफूर यांनीही मदत केल्याच उघड झालं आहे. नझीर सध्या कॅनडा पोलिसांच्या ताब्यात आहेत. नझीर हे सुरक्षेसाठी क्रिप्टोमेट्रोक प्रणाली देणार्‍या कॅनडाच्या एका कंपनीचे एजंट म्हणून काम करतात. क्रिप्टोमेट्रोक कंपनी आणि नझीर यांच्यादरम्यान वाद झाल्याने नझीर यांनी या लाच प्रकरणाची माहिती भारतातल्या कॅनडाच्या उच्चायुक्तांना दिली, त्यातूनच हे प्रकरण बाहेर आलं आहे.या लाचखोरीचा घटनाक्रम नेमका कसा होता ?- 2005 मध्ये नजीर कारीगर आपला लहानपणीचा मित्र आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त हसन गफूर यांना भेटले. - हसन गफूर यावेळी एअर इंडियावर प्रतिनियुक्तीवर होते. - या भेटीदरम्यान हसन गफूर यांनी एअर इंडिया, फेशियल रेकग्निशन मशीन खरेदी करणार असल्याची माहिती कारीगर यांना दिली. - कारगीर यांनी ही माहिती ओटावा इथल्या क्रिप्टोमॅट्रीक कंपनीला दिली - एअर इंडियामध्ये फेशिअल रेक्गनायझेशन ही अत्याधुनिक मशिनरी लावण्यासाठी 100 मिलीअन डॉलर्सचं कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी भारतीय नेता आणि अधिकार्‍यांना लाच दिली. - यासाठी क्रिप्टोमॅट्रीक टेक्नोलॉजीकडून भारतातल्या एजंटचं काम कारीगर करत होता - 2007 रोजी लक्ष्मण ढोबळे यांनी नजीर कारीगर याची प्रफुल्ल पटेल यांच्याशी भेट घालून दिली...- लक्ष्मण ढोबळे यांना अडिच लाख डॉलर्स दिल्याची कारीगर यांची कबुली - या दरम्यान क्रिप्टोमेट्रीक आणि कारीगर यांच्यामध्ये धुसफुस. - कारीगर यांनी या व्यवहाराची टीप भारतातल्या कॅनेडियन उच्चायुक्तांना दिली..- कारीगर यांनी craftysmiles@yahoo.com या मेल वरुन इमेल्स पाठवून कॅनेडियन पोलिसांना सगळी माहिती दिली..- कारीगर यांच्यावर 1999 मध्ये फॉरेन एन्टी करप्शन ऍक्ट अंतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे..- सध्या कारीगर कॅनडा पोलिसांच्या ताब्यात आहेत दरम्यान प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे'हे सर्व आरोप निराधार आणि चुकीचे असल्याचं स्पष्टिकरण पटेल यांनी दिले आहे. यामुळे आपली आणि केंद्र सरकारची बदनामी होत असल्याचंही पटेल यांनी म्हटलंय'.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 3, 2012 09:10 AM IST

प्रफुल्ल पटेल यांनी घेतली अडीच लाख डॉलर्सची लाच ?

03 फेब्रुवारी

देशात भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस येत असताना आता आणखी एका प्रकरणाने खळबळ उडाली आहे. भारतीय वंशाचे कॅनडियन व्यावसायिक नझीर कारीगर यांनी प्रफुल्ल पटेल यांना अडीच लाख डॉलर, लाच दिल्याचा दावा कॅनडाच्या वृत्तपत्रांनी केला आहे. पटेल यांना लाच देण्यासाठी राज्यातील राष्ट्रवादीचे मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी मध्यस्थी केल्याचंही नझीर यांनी सांगितल्याचा दावा या वृत्तपत्रांनी केला आहे. एअर इंडियात सुरक्षेसाठी `फेशियल रेक्गनायझेशन` या प्रणालीचं 100 मिलियन डॉलरचे कंत्राट घेण्यासाठी ही लाच देण्यात आली. नझीर मूळचे सोलापूरचे आहेत.

त्या ओळखीतून त्यांनी लक्ष्मण ढोबळे यांच्यामार्फत तत्कालीन हवाई वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती मिळतेय. यासाठी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त हसन गफूर यांनीही मदत केल्याच उघड झालं आहे. नझीर सध्या कॅनडा पोलिसांच्या ताब्यात आहेत. नझीर हे सुरक्षेसाठी क्रिप्टोमेट्रोक प्रणाली देणार्‍या कॅनडाच्या एका कंपनीचे एजंट म्हणून काम करतात. क्रिप्टोमेट्रोक कंपनी आणि नझीर यांच्यादरम्यान वाद झाल्याने नझीर यांनी या लाच प्रकरणाची माहिती भारतातल्या कॅनडाच्या उच्चायुक्तांना दिली, त्यातूनच हे प्रकरण बाहेर आलं आहे.

या लाचखोरीचा घटनाक्रम नेमका कसा होता ?

- 2005 मध्ये नजीर कारीगर आपला लहानपणीचा मित्र आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त हसन गफूर यांना भेटले. - हसन गफूर यावेळी एअर इंडियावर प्रतिनियुक्तीवर होते. - या भेटीदरम्यान हसन गफूर यांनी एअर इंडिया, फेशियल रेकग्निशन मशीन खरेदी करणार असल्याची माहिती कारीगर यांना दिली. - कारगीर यांनी ही माहिती ओटावा इथल्या क्रिप्टोमॅट्रीक कंपनीला दिली - एअर इंडियामध्ये फेशिअल रेक्गनायझेशन ही अत्याधुनिक मशिनरी लावण्यासाठी 100 मिलीअन डॉलर्सचं कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी भारतीय नेता आणि अधिकार्‍यांना लाच दिली. - यासाठी क्रिप्टोमॅट्रीक टेक्नोलॉजीकडून भारतातल्या एजंटचं काम कारीगर करत होता - 2007 रोजी लक्ष्मण ढोबळे यांनी नजीर कारीगर याची प्रफुल्ल पटेल यांच्याशी भेट घालून दिली...- लक्ष्मण ढोबळे यांना अडिच लाख डॉलर्स दिल्याची कारीगर यांची कबुली - या दरम्यान क्रिप्टोमेट्रीक आणि कारीगर यांच्यामध्ये धुसफुस. - कारीगर यांनी या व्यवहाराची टीप भारतातल्या कॅनेडियन उच्चायुक्तांना दिली..- कारीगर यांनी craftysmiles@yahoo.com या मेल वरुन इमेल्स पाठवून कॅनेडियन पोलिसांना सगळी माहिती दिली..- कारीगर यांच्यावर 1999 मध्ये फॉरेन एन्टी करप्शन ऍक्ट अंतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे..- सध्या कारीगर कॅनडा पोलिसांच्या ताब्यात आहेत

दरम्यान प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे'हे सर्व आरोप निराधार आणि चुकीचे असल्याचं स्पष्टिकरण पटेल यांनी दिले आहे. यामुळे आपली आणि केंद्र सरकारची बदनामी होत असल्याचंही पटेल यांनी म्हटलंय'.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 3, 2012 09:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close