S M L

गोळाबेरीज सिनेमा 'म्हैस'सोडून

08 फेब्रुवारीगोळाबेरीज सिनेमा येत्या 10 फेब्रुवारीला रिलीज होत आहे तो त्यातला म्हैस कथेचा भाग वगळून.. नुकताच या सिनेमाचा प्रेस शो झाला. त्यावेळी गोळाबेरीज सिनेमाचे दिग्दर्शक क्षितीज झारापकर यांनी माहिती दिली आहे. दिग्दर्शक शेखर नाईक यांनी 2008 ला गोळाबेरीज या पुस्तकातल्या 'म्हैस' कथेचे सर्व हक्क सुनीता देशपांडे यांच्याकडून रीतसर घेतल्याचा दावा केला. म्हैस या नावाने त्यांच्या सिनेमाचे रजिस्ट्रेशन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडे केलंय असंही त्यांचं म्हणणं आहे. शेखर नाईक यांनी यासाठी पुणे जिल्हा न्यायालयाकडेही धाव घेतली होती. पण आता गोळाबेरीज सिनेमाच्या निर्मात्यांनी सिनेमातला म्हैस कथेचा भाग वगळून सिनेमा रिलीज करायचं ठरवलं आहे. म्हैस कथेवर प्रभाकर फिल्म्स निर्मित चांदी या सिनेमाचाही मुहूर्त नुकताच झाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 8, 2012 04:04 PM IST

गोळाबेरीज सिनेमा 'म्हैस'सोडून

08 फेब्रुवारी

गोळाबेरीज सिनेमा येत्या 10 फेब्रुवारीला रिलीज होत आहे तो त्यातला म्हैस कथेचा भाग वगळून.. नुकताच या सिनेमाचा प्रेस शो झाला. त्यावेळी गोळाबेरीज सिनेमाचे दिग्दर्शक क्षितीज झारापकर यांनी माहिती दिली आहे. दिग्दर्शक शेखर नाईक यांनी 2008 ला गोळाबेरीज या पुस्तकातल्या 'म्हैस' कथेचे सर्व हक्क सुनीता देशपांडे यांच्याकडून रीतसर घेतल्याचा दावा केला. म्हैस या नावाने त्यांच्या सिनेमाचे रजिस्ट्रेशन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडे केलंय असंही त्यांचं म्हणणं आहे. शेखर नाईक यांनी यासाठी पुणे जिल्हा न्यायालयाकडेही धाव घेतली होती. पण आता गोळाबेरीज सिनेमाच्या निर्मात्यांनी सिनेमातला म्हैस कथेचा भाग वगळून सिनेमा रिलीज करायचं ठरवलं आहे. म्हैस कथेवर प्रभाकर फिल्म्स निर्मित चांदी या सिनेमाचाही मुहूर्त नुकताच झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 8, 2012 04:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close