S M L

उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात 64 टक्के मतदान

08 फेब्रुवारीउत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आज 862 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं. पहिल्या टप्प्यातल्या एकूण 55 जागांसाठी शांततेत मतदान झालं आहे. पण या मतदानात पावसाचा व्यत्यय आला. पहिल्या टप्प्यात 64 टक्के मतदान झालं. सगळ्यात कमी मतदान अयोध्या आणि बहरिचमध्ये झालं. पहिल्या फेरीत पूर्व उत्तर प्रदेशातल्या 55 जागांसाठी मतदान झालं. हा भाग बहुजन समाज पक्षाचा बालेकिल्ला मानला जातोय. पण सरकारविरोधातल्या असंतोषाचा आपल्याला फायदा होईल, असं काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला वाटतं आहे. तिकडे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उत्तरप्रदेशमध्ये युतीची शक्यता फेटाळून लावली आहे. त्यांनी आज उन्नाओमध्ये प्रचारसभा घेतली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 8, 2012 05:32 PM IST

उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात 64 टक्के मतदान

08 फेब्रुवारी

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आज 862 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं. पहिल्या टप्प्यातल्या एकूण 55 जागांसाठी शांततेत मतदान झालं आहे. पण या मतदानात पावसाचा व्यत्यय आला. पहिल्या टप्प्यात 64 टक्के मतदान झालं. सगळ्यात कमी मतदान अयोध्या आणि बहरिचमध्ये झालं. पहिल्या फेरीत पूर्व उत्तर प्रदेशातल्या 55 जागांसाठी मतदान झालं. हा भाग बहुजन समाज पक्षाचा बालेकिल्ला मानला जातोय. पण सरकारविरोधातल्या असंतोषाचा आपल्याला फायदा होईल, असं काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला वाटतं आहे. तिकडे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उत्तरप्रदेशमध्ये युतीची शक्यता फेटाळून लावली आहे. त्यांनी आज उन्नाओमध्ये प्रचारसभा घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 8, 2012 05:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close