S M L

सनातनच्या वर्तमानपत्रातून विषारी प्रचार

अमेय तिरोडकर21 नोव्हेंबर, मुंबईहिंदू दहशतवादाला सनातन संस्था प्रोत्साहन देत असल्याचं आता उघड झालंय. ' सनातन प्रभात ' या त्यांच्या पेपरमधूनच ते दहशतवादी बनण्याचा प्रचार करतायंत. 'आपल्याला धर्मराज्यासाठी धार्मिक नक्षलवादी बनायलं हवं ' , ' हिंदुत्ववादी कार्यकर्ते पोलिसांचा मारही खातात. हे टाळण्यासाठीच आता नक्षलवादी व दहशतवादी यांचे अनुकरण करावं लागेल ' सनातनच्या पेपरमधून असा विषारी प्रचार होतोय. याच सनातनचं नाव ठाण्यातील गडकरी रंगायतनात झालेल्या बॉम्बस्फोटात घेतलं जात होतं. रमेश हनुमंत गडकरी हा त्यांचा साधक यात पकडला गेलाय. तेव्हा सनातनने आपली भूमिका मांडताना शांतीचा मुखवटा घातला होता. ' आम्ही या दहशतवादाचा आणि झालेल्या घटनेचा तीव्र निषेध करतो ' , असं सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. दहशतवादाचा निषेध करणारी संस्था मग आपल्या मुखपत्रातून त्याचाच प्रचार कसा करू शकते, हा प्रश्न आता उभा राहिला आहे. त्यामुळेच मालेगाव बॉम्बस्फोटातील हिंदू दहशतवादाच्या लिंकचं सनातननं अप्रत्यक्ष समर्थन केलंय. सनातनचा हा विषारी प्रचार इतक्यावरच थांबत नाही. ' जोधा अकबर ' या पिक्चरच्या प्रदर्शनाला हिंदू संघटनांनी विरोध केला होता. त्यावरून सांगलीत आंदोलनही झालं होतं. ते आंदोलन रोखू पाहणार्‍या पोलिसांना क्रांतीच्या वेळी लक्षात ठेवा, असा इशारा या पेपरमधून देण्यात आलाय. पोलिसी अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी सनातनच्या प्रशिक्षण वर्गात सहभागी व्हा, अशा प्रकारचं प्रसिद्धीपत्रकच त्यांच्या पेपरमध्ये देण्यात आलंय. ' आमच्या या संस्थेमध्ये स्व संरक्षणासाठीचं प्रशिक्षण दिल जातंय आणि आता हे मान्य झालंय की, स्व संरक्षण हे प्रत्येकाला आवश्यक आहे ', असं वर्तक यांनी सांगितलंय.सनातनचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांचे आक्रमक संदेश वारंवार या पेपरमध्ये छापले जातात. असाच हा एक. ' धर्मक्रांतीच्या वेळी सर्व राजकीय पक्षांच्या राष्ट्र व धर्मद्रोही नेत्यांना व अनुयायांना नष्ट केलं जाईल.' वेगवेगळ्या आंदोलनाच्या वेळी होणार्‍या बसगाड्यांच्या किंवा इतर वाहनांच्या नुकसानीवर प्रतिक्रिया म्हणून हा संदेश छापला गेलाय. अशा गंभीर प्रचारामुळेच आता सनातन संस्था अडचणीत आलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 21, 2008 03:25 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 21, 2008 03:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close