S M L

नितीन गडकरींच्या भागातील 'भाई'ला भाजपकडून उमेदवारी

09 फेब्रुवारीमहापालिका निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारी दिली आहे. पण नागपूरमध्ये एक धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन यांच्या गावातच, त्यांच्या निवासस्थान असलेल्या महाल या भागाच्या जवळ असलेल्या गरोबा मैदान या भागातून भाजपने अनिल धावडे याला उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे अनिल धावडेवर सट्टा चालवण्याचा आरोप आहे तसेच धावडे याने मोक्कांतर्गत 2001-2008 तुरुंगाची हवा खाल्ली आहे पण पुराव्याअभावी नंतर त्याची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. यांचा पराक्रम इथेच थांबला नाही तर या अगोदर हत्यार बाळगणे, हल्ला करणे, जीवे मारण्याची धमकी देणे असे खटले प्रलंबित आहेत. काही दिवसांपुर्वी उत्तरप्रदेशमध्ये भ्रष्टाचाराचा ठप्पा ठेवून बाबूसिंह कुशवाह यांनी बसपामधून हकालपट्टी करण्यात आली होती. पण कुशवाह यांनी दुसर्‍याच दिवशी भाजपमध्ये प्रवेश घेतला होता. भाजपमध्ये कुशवाह यांच्या प्रवेशावरुन भाजपच्या अंतर्गत आरोप प्रत्यारोप तर झालेच पण विरोधकांनीही टीकेला सामोर जावं लागलं. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितिन गडकरी यांच्याच गावात एका गुन्हेगाराला उमेदवारी दिली आहे. जवळपास सर्वच पक्षांनी गुन्हेगारांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना तिकीटं दिली आहेत. यावर प्रश्न विचारला तर या गुंडांची पाठराखणही केली जाते. तेव्हा अशा गुन्हेगारांच्या पदरी मतांचं दान टाकायचं की नाही, हे शेवटी मतदार राजानंच ठरवायचं.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 9, 2012 06:17 PM IST

नितीन गडकरींच्या भागातील 'भाई'ला भाजपकडून उमेदवारी

09 फेब्रुवारी

महापालिका निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारी दिली आहे. पण नागपूरमध्ये एक धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन यांच्या गावातच, त्यांच्या निवासस्थान असलेल्या महाल या भागाच्या जवळ असलेल्या गरोबा मैदान या भागातून भाजपने अनिल धावडे याला उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे अनिल धावडेवर सट्टा चालवण्याचा आरोप आहे तसेच धावडे याने मोक्कांतर्गत 2001-2008 तुरुंगाची हवा खाल्ली आहे पण पुराव्याअभावी नंतर त्याची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. यांचा पराक्रम इथेच थांबला नाही तर या अगोदर हत्यार बाळगणे, हल्ला करणे, जीवे मारण्याची धमकी देणे असे खटले प्रलंबित आहेत. काही दिवसांपुर्वी उत्तरप्रदेशमध्ये भ्रष्टाचाराचा ठप्पा ठेवून बाबूसिंह कुशवाह यांनी बसपामधून हकालपट्टी करण्यात आली होती. पण कुशवाह यांनी दुसर्‍याच दिवशी भाजपमध्ये प्रवेश घेतला होता. भाजपमध्ये कुशवाह यांच्या प्रवेशावरुन भाजपच्या अंतर्गत आरोप प्रत्यारोप तर झालेच पण विरोधकांनीही टीकेला सामोर जावं लागलं. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितिन गडकरी यांच्याच गावात एका गुन्हेगाराला उमेदवारी दिली आहे. जवळपास सर्वच पक्षांनी गुन्हेगारांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना तिकीटं दिली आहेत. यावर प्रश्न विचारला तर या गुंडांची पाठराखणही केली जाते. तेव्हा अशा गुन्हेगारांच्या पदरी मतांचं दान टाकायचं की नाही, हे शेवटी मतदार राजानंच ठरवायचं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 9, 2012 06:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close