S M L

पंतप्रधान निवासस्थानाजवळ कारमध्ये स्फोट

13 फेब्रुवारीराजधानी दिल्लीत पंतप्रधान निवास्थानाजवळ दुपारी साडे तीनच्या सुमारास एका इनोव्हा कारमध्ये स्फोट झाला आहे. इस्त्रायलच्या दूतावासासमोर उभ्या असलेल्या कारमध्ये हा स्फोट झाला. स्फोटात दोन जण जखमी झाले आहेत. यात एक महिला अधिकारीही असल्याची माहिती दूतावासाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. स्फोटाच्या काही वेळापूर्वीच कारजवळ दोनं तरुण दिसले होते. बाईकवर आलेल्या या तरुणांनी कारमध्ये एक वस्तु फेकली आणि त्यानंतर स्फोट झाल्याचं बोललं जातं आहे. बॉम्बनिरोधक पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. दरम्यान इस्त्रायलने आपल्या देशभरातील कार्यालयांना हाय अलर्ट जारी केला आहे. तसेच गृहमंत्री पि. चिदंबरम चेन्नईवरुन घटनास्थळाकडे रवाना झाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 13, 2012 12:45 PM IST

पंतप्रधान निवासस्थानाजवळ कारमध्ये स्फोट

13 फेब्रुवारी

राजधानी दिल्लीत पंतप्रधान निवास्थानाजवळ दुपारी साडे तीनच्या सुमारास एका इनोव्हा कारमध्ये स्फोट झाला आहे. इस्त्रायलच्या दूतावासासमोर उभ्या असलेल्या कारमध्ये हा स्फोट झाला. स्फोटात दोन जण जखमी झाले आहेत. यात एक महिला अधिकारीही असल्याची माहिती दूतावासाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. स्फोटाच्या काही वेळापूर्वीच कारजवळ दोनं तरुण दिसले होते. बाईकवर आलेल्या या तरुणांनी कारमध्ये एक वस्तु फेकली आणि त्यानंतर स्फोट झाल्याचं बोललं जातं आहे. बॉम्बनिरोधक पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. दरम्यान इस्त्रायलने आपल्या देशभरातील कार्यालयांना हाय अलर्ट जारी केला आहे. तसेच गृहमंत्री पि. चिदंबरम चेन्नईवरुन घटनास्थळाकडे रवाना झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 13, 2012 12:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close