S M L

पाकचे पंतप्रधान गिलानींवर आरोप निश्चित

13 फेब्रुवारीपाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्या विरोधात पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने आरोप निश्चित केले आहेत. गिलानी यांनी कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी पाकिस्तान सुप्रीम कोर्टाने त्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. पण सुप्रीम कोर्टाने गिलानी यांच्यावर जे आरोप निश्चित केलेत, ते गिलानी यांनी फेटाळून लावले आहे. दरम्यान, गिलानी यांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी कोर्टाने 22 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. पण त्यादिवशी गिलानी कोर्टात हजर राहू शकणार नाहीत, असं त्यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितल्यानंतर गिलानी यांना 27 फेब्रुवारीपर्यंतचा मुदत वाढवून देण्यात आला. 27 फेब्रुवारीला गिलानी यांनी कोर्टात आपली भुमिका मांडल्यानंतर त्यावर 28 फेब्रुवारीला सुनावणी होईल. गिलानींवर ठेवण्यात आलेल्या आरोपात ते दोषी आढळले तर त्यांना पंतप्रधानपदावर पाणी सोडावं लागू शकतं. पाकिस्तान सुप्रीम कोर्टाकडून अशाप्रकारची कारवाई होणारे युसूफ रझा गिलानी हे पहिलेच पंतप्रधान आहेत.पाकिस्तान सरकारपुढचे पर्याय- गिलानींनी राजीनामा दिला, तरीही राष्ट्राध्यक्ष त्यांची पाठराखण करतील- गिलानींनी राजीनामा दिल्यानंतर, पीपीपी नव्या पंतप्रधानांचं नाव पुढं करेल - पण पीपीपी सुप्रीम कोर्टाचे निर्देश स्वीकारणार नाही- गिलानी राजीनामा देणार नाहीत, पण त्यांना तात्काळ पदावरुन हटवलं जाणार नाही - गिलानी जेलमध्ये गेले तरीही, ते नॅशनल असेंब्लीत हजर राहतील- गिलानींनी राजीनामा दिला तर, पाकिस्तानात मध्यावधी निवडणुका होतील एनआरओ (NRO)चा वाद नेमका काय आहे ?- नॅशनल रिकन्सिलिएशन ऑर्डिनन्स म्हणजेच राष्ट्रीय सामंजस्य अध्यादेश- माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफनी 2007 मध्ये अध्यादेश काढला- या अध्यादेशानुसार राजकारणी, अधिकार्‍यांवरचे गुन्हे माफ - हत्या आणि भ्रष्टाचारासारखे गंभीर आरोप माफ- या अध्यादेशामुळेच बेनझीर भुत्तो पाकिस्तानात परतल्या- पण, पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने हा अध्यादेश धुडकावला- 2009 - पंतप्रधान गिलानींच्या आदेशानुसार एनआरओ च्या लाभाथीर्ंची यादी जाहीर - या सर्व नेत्यांवर खटले भरण्याचा कोर्टाचा आदेश - यात पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांचंही नाव

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 13, 2012 08:39 AM IST

पाकचे पंतप्रधान गिलानींवर आरोप निश्चित

13 फेब्रुवारी

पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्या विरोधात पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने आरोप निश्चित केले आहेत. गिलानी यांनी कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी पाकिस्तान सुप्रीम कोर्टाने त्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. पण सुप्रीम कोर्टाने गिलानी यांच्यावर जे आरोप निश्चित केलेत, ते गिलानी यांनी फेटाळून लावले आहे. दरम्यान, गिलानी यांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी कोर्टाने 22 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. पण त्यादिवशी गिलानी कोर्टात हजर राहू शकणार नाहीत, असं त्यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितल्यानंतर गिलानी यांना 27 फेब्रुवारीपर्यंतचा मुदत वाढवून देण्यात आला. 27 फेब्रुवारीला गिलानी यांनी कोर्टात आपली भुमिका मांडल्यानंतर त्यावर 28 फेब्रुवारीला सुनावणी होईल. गिलानींवर ठेवण्यात आलेल्या आरोपात ते दोषी आढळले तर त्यांना पंतप्रधानपदावर पाणी सोडावं लागू शकतं. पाकिस्तान सुप्रीम कोर्टाकडून अशाप्रकारची कारवाई होणारे युसूफ रझा गिलानी हे पहिलेच पंतप्रधान आहेत.

पाकिस्तान सरकारपुढचे पर्याय

- गिलानींनी राजीनामा दिला, तरीही राष्ट्राध्यक्ष त्यांची पाठराखण करतील- गिलानींनी राजीनामा दिल्यानंतर, पीपीपी नव्या पंतप्रधानांचं नाव पुढं करेल - पण पीपीपी सुप्रीम कोर्टाचे निर्देश स्वीकारणार नाही- गिलानी राजीनामा देणार नाहीत, पण त्यांना तात्काळ पदावरुन हटवलं जाणार नाही - गिलानी जेलमध्ये गेले तरीही, ते नॅशनल असेंब्लीत हजर राहतील- गिलानींनी राजीनामा दिला तर, पाकिस्तानात मध्यावधी निवडणुका होतील

एनआरओ (NRO)चा वाद नेमका काय आहे ?

- नॅशनल रिकन्सिलिएशन ऑर्डिनन्स म्हणजेच राष्ट्रीय सामंजस्य अध्यादेश- माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफनी 2007 मध्ये अध्यादेश काढला- या अध्यादेशानुसार राजकारणी, अधिकार्‍यांवरचे गुन्हे माफ - हत्या आणि भ्रष्टाचारासारखे गंभीर आरोप माफ- या अध्यादेशामुळेच बेनझीर भुत्तो पाकिस्तानात परतल्या- पण, पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने हा अध्यादेश धुडकावला- 2009 - पंतप्रधान गिलानींच्या आदेशानुसार एनआरओ च्या लाभाथीर्ंची यादी जाहीर - या सर्व नेत्यांवर खटले भरण्याचा कोर्टाचा आदेश - यात पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांचंही नाव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 13, 2012 08:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close