S M L

अग्निशमन दलाच्या इमारतीत उभारले मतदान केंद्र

13 फेब्रुवारीपुण्यात महानगर पालिका निवडणुकीसाठी सात मतदान केंद्र निवडणूक आयोगाने भवानी पेठ इथल्या अग्निशमन दलाच्या इमारतीच्या परिसरात उभारलं आहे. यामुळे अग्निशमन दलाला अनेक अडचणी येत आहे. अग्निशमन दलाच्या या इमारतीत पाण्याचे एकूण 33 टँकर आणीबाणीसाठी नेहमी तयार असतात. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदार आणि वाहनांचीही गर्दी असेल. अशा वेळेस अग्निशमन दलाला जर ही पाण्याची टँकरची गाडी बाहेर काढायची असेल तर, त्यांना भरपूर वेळ लागू शकतो. या भागात मतदाराच्या वाहनांच्या पार्किंगसाठी कोणतीही व्यवस्था नाही. तरीही निवडणूक आयोगाने इथंच मतदान केंद्र उभारलं आहे. या भागातल्या शाळेमध्येही मतदान केंद्र उभारता आलं असतं. पण मतदान केंद्र उभारण्याचा आदेश बळजबरीने अग्निशमन दलावर लादल्याची माहिती समजत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 13, 2012 10:17 AM IST

अग्निशमन दलाच्या इमारतीत उभारले मतदान केंद्र

13 फेब्रुवारी

पुण्यात महानगर पालिका निवडणुकीसाठी सात मतदान केंद्र निवडणूक आयोगाने भवानी पेठ इथल्या अग्निशमन दलाच्या इमारतीच्या परिसरात उभारलं आहे. यामुळे अग्निशमन दलाला अनेक अडचणी येत आहे. अग्निशमन दलाच्या या इमारतीत पाण्याचे एकूण 33 टँकर आणीबाणीसाठी नेहमी तयार असतात. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदार आणि वाहनांचीही गर्दी असेल. अशा वेळेस अग्निशमन दलाला जर ही पाण्याची टँकरची गाडी बाहेर काढायची असेल तर, त्यांना भरपूर वेळ लागू शकतो. या भागात मतदाराच्या वाहनांच्या पार्किंगसाठी कोणतीही व्यवस्था नाही. तरीही निवडणूक आयोगाने इथंच मतदान केंद्र उभारलं आहे. या भागातल्या शाळेमध्येही मतदान केंद्र उभारता आलं असतं. पण मतदान केंद्र उभारण्याचा आदेश बळजबरीने अग्निशमन दलावर लादल्याची माहिती समजत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 13, 2012 10:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close