S M L

सर्वसामान्यांच्या विकासासाठी सुरक्षित वातावरणाची गरज - सोनिया गांधी

21 नोव्हेंबर दिल्लीराजधानी दिल्लीत हिंदुस्थान टाईम्स आणि सीएनएन आयबीएन यांच्या संयुक्त विद्यामानं लीडरशिप समिट आयोजित करण्यात आली आहे. या समिटचं उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं. परिषेदेची सुरुवात पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या भाषणानं झाली. या परिषदेत जगभरातल्या देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यापुढचा विकास हा बुद्धीच्या जोरावर होईल असं सांगत, भारतीय लोकशाही जनतेच्या सर्व समस्या सोडवण्यास सक्षम असल्याचं प्रतिपादनही त्यांनी केलं. तसंच जाती आणि प्रांताच्या नावावर राजकारण करणा-यांना थारा मिळणार नाही असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.या लीडरशीप समिटमध्ये सोनिया गांधीनीसुद्धा आपले विचार मांडले.विकास करतांना सामाजिक न्यायाचं भान आपण सोडता कामा नये हा मुद्दा त्यांनी प्रामुख्यानं मांडला. तर येत्या निवडणुका लक्षात घेता सोनियांनी पुन्हा एकदा आम आदमीकडे आपला रोख वळवला आहे. सामान्य माणसांसाठी सुरक्षित वातावरण तयार करणं गरजेचं आहे. आणि याचसाठी उद्योगांवर निर्बंध घालणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.या समिटमध्ये लालकृष्ण अडवाणी, पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी आणि ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर हजर राहणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 21, 2008 03:12 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 21, 2008 03:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close