S M L

राष्ट्रवादीने कमावले, काँग्रेसने गमावले !

आशिष जाधव, मुंबई17 फेब्रुवारीमुंबईत आमचीच सत्ता येईल, असा दावा केलेल्या काँग्रेसला फक्त मुंबईतच नाही, तर पुणे, सोलापूर, नाशिक अशा अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये फटका बसला. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने मात्र आपली पिंपरीची महापालिका राखत पुण्यातही सर्वांत मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. जिथे युती सत्तेत, तिथे आघाडी करायचीच, असा चंग काँग्रेसने बांधला होता. पण तरीही पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर आणि अमरावती या चार शहरात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा मुकाबला रंगला. यांपैकी पिंपरी आणि पुण्यात राष्ट्रवादीची सरशी झाली. आणि अपेक्षेप्रमाणेच पक्षाच्या नेत्यांनी या कामगिरीचं श्रेय अजित दादांना दिलं.या निवडणुकात राष्ट्रवादीकडे गमावण्यासारखं फारसं नसल्यानं. त्यांची कामगिरी बरी मानली जात आहे. तर दुसरीकडे काँग्रेसची अवस्था मात्र बिकट आहे. 10 पैकी फक्त दोन महापालिकात.. अमरावती आणि सोलापुरात काँग्रेसची कामगिरी चांगली आहे. विशेष करून मुंबईतला पराभव काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. त्यामागे अनेक कारणं आहेत.- गुरुदास कामत आणि कृपाशंकर सिंग या दोन गटांमधला वाद भोवला- कामतांचे निष्ठावंत अजित सावंत यांना निलंबित केल्यानं निर्माण झालेल्या मराठी विरुद्ध अमराठी वादाचा फटका बसला- मुख्यमंत्र्यांनी बिल्डर्सच्या विरुद्ध उघडलेल्या मोहिमेमुळे पक्षातले अनेक नेते नाराज होते- निम्म्याहून अधिक आमदार आणि खासदारांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला नव्हता- अनेक नेत्यांच्या नातेवाइकांना तिकिटं देण्यात आल्यामुळे नाराजी होती- त्यामुळे 41 बंडखोर उमेदवार उभे राहिले- सेनेच्या महिला आघाडीच्या तुलनेत महिला काँग्रेसचा सहभाग कमी होताराज्यभरातल्या आणि विशेषतः मुंबईतल्या कामगिरीसाठी आता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेसचे प्रमुख कृपाशंकर सिंग अशा अनेक नेत्यांना अनेक प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 17, 2012 03:30 PM IST

राष्ट्रवादीने कमावले, काँग्रेसने गमावले !

आशिष जाधव, मुंबई

17 फेब्रुवारी

मुंबईत आमचीच सत्ता येईल, असा दावा केलेल्या काँग्रेसला फक्त मुंबईतच नाही, तर पुणे, सोलापूर, नाशिक अशा अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये फटका बसला. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने मात्र आपली पिंपरीची महापालिका राखत पुण्यातही सर्वांत मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. जिथे युती सत्तेत, तिथे आघाडी करायचीच, असा चंग काँग्रेसने बांधला होता. पण तरीही पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर आणि अमरावती या चार शहरात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा मुकाबला रंगला. यांपैकी पिंपरी आणि पुण्यात राष्ट्रवादीची सरशी झाली. आणि अपेक्षेप्रमाणेच पक्षाच्या नेत्यांनी या कामगिरीचं श्रेय अजित दादांना दिलं.

या निवडणुकात राष्ट्रवादीकडे गमावण्यासारखं फारसं नसल्यानं. त्यांची कामगिरी बरी मानली जात आहे. तर दुसरीकडे काँग्रेसची अवस्था मात्र बिकट आहे. 10 पैकी फक्त दोन महापालिकात.. अमरावती आणि सोलापुरात काँग्रेसची कामगिरी चांगली आहे. विशेष करून मुंबईतला पराभव काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. त्यामागे अनेक कारणं आहेत.

- गुरुदास कामत आणि कृपाशंकर सिंग या दोन गटांमधला वाद भोवला- कामतांचे निष्ठावंत अजित सावंत यांना निलंबित केल्यानं निर्माण झालेल्या मराठी विरुद्ध अमराठी वादाचा फटका बसला- मुख्यमंत्र्यांनी बिल्डर्सच्या विरुद्ध उघडलेल्या मोहिमेमुळे पक्षातले अनेक नेते नाराज होते- निम्म्याहून अधिक आमदार आणि खासदारांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला नव्हता- अनेक नेत्यांच्या नातेवाइकांना तिकिटं देण्यात आल्यामुळे नाराजी होती- त्यामुळे 41 बंडखोर उमेदवार उभे राहिले- सेनेच्या महिला आघाडीच्या तुलनेत महिला काँग्रेसचा सहभाग कमी होता

राज्यभरातल्या आणि विशेषतः मुंबईतल्या कामगिरीसाठी आता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेसचे प्रमुख कृपाशंकर सिंग अशा अनेक नेत्यांना अनेक प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 17, 2012 03:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close