S M L

महाशिवरात्रीनिमित्त शिवमंदिरात भाविकांनी गर्दी

20 फेब्रुवारीदेशभर महाशिवरात्रीनिमित्त शिवमंदिरात भाविकांनी गर्दी केली. अंबरनाथमधल्या अतिप्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली. मध्यरात्रीपासूनच शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या.अंबरनाथचं हे मंदिर हेमाडपांती असून शिलाहार राजा मुब्बानी याने साडे नऊशे वर्षांपूर्वी हे मंदिर बांधलं. युनेस्कोनं जाहीर केलेल्या भारतातल्या अतीप्राचीन पुरातन मंदिराच्या यादीत या शिवमंदिराची नोंद आहे. तर परभणी जिल्हातील रामपुरी रत्नेश्वर इथल्या शंकर मंदिरातील शिवलिंगाभोवतीचे पाणी कधीच आटत नसल्याची आख्यायिका आहे. प्रभू रामचंद्र वनवासात असताना त्यांना हे स्वयंभू शिवलिंग सापडलं. त्यांनी त्या शिवलिंगाची पूजा करुन रत्नांचा अभिषेक केला,अशीही आख्यायिका आहे. महाशिवरात्री निमित्त आता याठिकाणी दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. तर गडचिरोलीच्या हेमाड पंथीय मार्कंडेय मंदिरातही भाविकांनी महादेवाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच गर्दी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 20, 2012 08:20 AM IST

महाशिवरात्रीनिमित्त शिवमंदिरात भाविकांनी गर्दी

20 फेब्रुवारी

देशभर महाशिवरात्रीनिमित्त शिवमंदिरात भाविकांनी गर्दी केली. अंबरनाथमधल्या अतिप्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली. मध्यरात्रीपासूनच शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या.अंबरनाथचं हे मंदिर हेमाडपांती असून शिलाहार राजा मुब्बानी याने साडे नऊशे वर्षांपूर्वी हे मंदिर बांधलं. युनेस्कोनं जाहीर केलेल्या भारतातल्या अतीप्राचीन पुरातन मंदिराच्या यादीत या शिवमंदिराची नोंद आहे. तर परभणी जिल्हातील रामपुरी रत्नेश्वर इथल्या शंकर मंदिरातील शिवलिंगाभोवतीचे पाणी कधीच आटत नसल्याची आख्यायिका आहे. प्रभू रामचंद्र वनवासात असताना त्यांना हे स्वयंभू शिवलिंग सापडलं. त्यांनी त्या शिवलिंगाची पूजा करुन रत्नांचा अभिषेक केला,अशीही आख्यायिका आहे. महाशिवरात्री निमित्त आता याठिकाणी दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. तर गडचिरोलीच्या हेमाड पंथीय मार्कंडेय मंदिरातही भाविकांनी महादेवाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच गर्दी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 20, 2012 08:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close