S M L

पद्मनाभ स्वामी मंदिराच्या खजिन्याची मोजणी सुरु

20 फेब्रुवारीकेरळामधल्या पद्मनाभ स्वामी मंदिरातल्या खजिन्याची मोजणी करायला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर पद्मनाभ स्वामी मंदिराचा खजिना उघडण्यात आला होता. यावेळी मंदिरात अनेक मोलाचे दागिने सापडले होते. या खजिन्याची किंमत जवळजवळ 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं बोललं जात आहे. या मंदिरातील अजून एक दरवाजा उघडायचा अजून बाकी आहे. काही महिन्यापूर्वी तळघरातील खजिन्याची मोजणी करण्यात आली होती. यावेळी कोट्यावधींची संपत्ती समोर आली होती. पण संपत्तीवर झालेल्या वादामुळे सुप्रीम कोर्टाचे दार ठोकावे लागले. कोर्टाने निर्णय देत प्रतिबंध केला होता. यावेळी या खजिन्याची मोजणी व्हिडिओ कॅमेरात कैद होणार आहे. यासाठी माध्यमांनाही दुर ठेवण्यात येणार आहे. कोर्टाने या मोजणीसाठी विशेष समिती स्थापन केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 20, 2012 12:49 PM IST

पद्मनाभ स्वामी मंदिराच्या खजिन्याची मोजणी सुरु

20 फेब्रुवारी

केरळामधल्या पद्मनाभ स्वामी मंदिरातल्या खजिन्याची मोजणी करायला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर पद्मनाभ स्वामी मंदिराचा खजिना उघडण्यात आला होता. यावेळी मंदिरात अनेक मोलाचे दागिने सापडले होते. या खजिन्याची किंमत जवळजवळ 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं बोललं जात आहे. या मंदिरातील अजून एक दरवाजा उघडायचा अजून बाकी आहे. काही महिन्यापूर्वी तळघरातील खजिन्याची मोजणी करण्यात आली होती. यावेळी कोट्यावधींची संपत्ती समोर आली होती. पण संपत्तीवर झालेल्या वादामुळे सुप्रीम कोर्टाचे दार ठोकावे लागले. कोर्टाने निर्णय देत प्रतिबंध केला होता. यावेळी या खजिन्याची मोजणी व्हिडिओ कॅमेरात कैद होणार आहे. यासाठी माध्यमांनाही दुर ठेवण्यात येणार आहे. कोर्टाने या मोजणीसाठी विशेष समिती स्थापन केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 20, 2012 12:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close