S M L

राज ठाकरेंविरोधातील गुन्हा रद्द

21 फेब्रुवारीमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना हायकोर्टाने एक दिलासा दिला आहे. राज यांच्या विरोधातील गुन्हा रद्द करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. राज ठाकरे यांनी 2008 सालात विक्रोळी इथल्या सभेत अबू आझमी हे उत्तर भारतीयांना काट्या वाटणार असतील तर मी मराठी तरुणांना तलवारी वाटेन असं वक्तव्य केलं होतं. या बाबत राज ठाकरे यांच्या विरोधात विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. कलम 153 (ए) आणि 153 (बी) या नुसार हा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात राज यांना अटक ही झाली होती. मात्र, हा गुन्हाच आज मुंबई हायकोर्टाने रद्द केला आहे. राज्य सरकारने हा खटला चालवण्यासाठी आरोपपत्र दाखल करण्यासाठी परवानगी दिली नाही, या कारणास्तव हा गुन्हा रद्द कऱण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 21, 2012 12:50 PM IST

राज ठाकरेंविरोधातील गुन्हा रद्द

21 फेब्रुवारी

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना हायकोर्टाने एक दिलासा दिला आहे. राज यांच्या विरोधातील गुन्हा रद्द करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. राज ठाकरे यांनी 2008 सालात विक्रोळी इथल्या सभेत अबू आझमी हे उत्तर भारतीयांना काट्या वाटणार असतील तर मी मराठी तरुणांना तलवारी वाटेन असं वक्तव्य केलं होतं. या बाबत राज ठाकरे यांच्या विरोधात विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. कलम 153 (ए) आणि 153 (बी) या नुसार हा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात राज यांना अटक ही झाली होती. मात्र, हा गुन्हाच आज मुंबई हायकोर्टाने रद्द केला आहे. राज्य सरकारने हा खटला चालवण्यासाठी आरोपपत्र दाखल करण्यासाठी परवानगी दिली नाही, या कारणास्तव हा गुन्हा रद्द कऱण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 21, 2012 12:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close