S M L

कृपाशंकर सिंह यांचा राजीनामा

22 फेब्रुवारीमुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद कृपाशंकर सिंह यांना हायकोर्टाने दणका दिल्यानंतर आणखी एक जोर का झटका कृपाशंकर यांना बसला आहे. कृपाशंकर यांनी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. हायकमांडने कृपाशंकर यांचा राजीनामा स्विकारला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसला पराभव पत्कारावा लागला.यापराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारुन कृपाशंकर यांनी आपला राजीनामा दिला. बेनामी मालमत्ता प्रकरण कृपाशंकर यांना चांगलाच भोवला आहे. मधु कोडा प्रकरणात अडकलेल्या कृपाशंकर सिंह यांना महापालिकेच्या निवडणुकांआधीच मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद सोडायला सांगितलं जाईल असं अनेक काँग्रेस नेत्यांना वाटत होतं. पण कृपाशंकर सिंह यांचं दिल्लीतलं प्रस्थ मोठं असल्यानं त्यांच्यावर काँग्रेस श्रेष्ठींची कृपा झाली. त्यांना मुंबई काँग्रेसचे काळजीवाहू अध्यक्षपद देण्यात आलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने कृपाशंकर सिंह यांनी राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय कसा बरोबर आहे, हे पक्षश्रेष्ठींनाही पटवून दिलं. मात्र यात काँग्रेस कार्यकर्त्यांना कृपाशंकर सिंह यांची काही वेगळीच चाल दिसली.कृपाशंकर सिंह यांच्याविरोधातील बेहिशोबी संपत्तीचे प्रकरण हायकोर्टात गेलं. त्याचा निकाल हा कधी ना कधी त्यांच्याविरोधात लागणारच होता. पण त्याआधीच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन कृपाशंकर सिंह यांनी अहवालाबरोबरच आपला राजीनामा हायकमांडकडे पाठवला होता.एकीकडे कृपाशंकर सिंह यांचा राजीनामा काँग्रेस हायकमांडने स्वीकारला. तर दुसरीकडे मुंबई हायकोर्टाने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत एकूणच काय कृपाशंकर सिंह यांच्यावर पराभवाचे खापर फोडून काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.बेनामी संपत्ती ?सामाजिक कार्यकर्ते संजय तिवारी यांनी कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. यात त्यांनी कृपाशंकर सिंह यांच्या बेनामी संपत्तीची माहिती दिली. तिवारी यांच्या म्हणण्यानुसार कृपाशंकर यांच्याकडे काय काय बेनामी संपत्ती आहे ?- रत्नागिरीत 225 एकर जमीन खरेदी- मुंबईत सांताक्रुझला ज्यूपिटर इमारतीत एक संपूर्ण मजला- सांताक्रुझमध्ये आणखी एक फ्लॅट- मुंबईत वांद्रे इथे 'सारंग' बंगला- उत्तर प्रदेशातील जौनपूर इथं मोठी संपत्ती- कृपाशंकर यांच्या नावावर दोन पॅनकार्डदरम्यान, कृपाशंकर सिंह यांनी एमआरसीसी (MRCC) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता त्यांचा उत्तराधिकारी कोण, याविषयी सुप्त चर्चा सुरु झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी खासदार प्रिया दत्त, आमदार चंद्रकांत हंडोरे, आमदार मधु चव्हाण, आमदार राजहंस सिंह आणि भाई जगताप यांची नावं आघाडीवर आहेत. अध्यक्षपद निवडीचे सर्वाधिकार सोनिया गांधी यांना दिले जातील असं दिसतंय.नवा एमआरसीसी अध्यक्ष कोण? 1) खा. प्रिया दत्त - स्वच्छ प्रतिमा- सलग दुसर्‍यांदा खासदार- अ. भा. महिला काँग्रेसच्या सरचिटणीस- महिला अध्यक्ष देण्याची हायकमांडची इच्छा2) आ.चंद्रकांत हंडोरे- मुंबई काँग्रेसचा दलित चेहरा- सलग तिसर्‍यांदा आमदार- मंत्रिपदी वर्णी लागली नसल्यानं मुंबई अध्यक्षपदासाठी दावेदारी3) आ.मधू चव्हाण - भायखळ्याचे आमदार - निष्ठावंत म्हणून ओळख - एमआरसीसी अध्यक्षपदासाठी अनेक वर्षांपासून दावेदारी4) आ.राजहंस सिंह - गुरुदास कामत समर्थक - मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेतेयाशिवाय आणखी एक नाव या यादीत आहे. ते आहे खासदार संजय निरुपम यांचं. निरुपम यांनी सर्वात जास्त 11 नगरसेवक निवडून आणलेकृपाशंकर सिंग यांना शह देण्याची धमक तसेच उत्तर भारतीयांचं नवं नेतृत्त्व.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 22, 2012 01:11 PM IST

कृपाशंकर सिंह यांचा राजीनामा

22 फेब्रुवारी

मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद कृपाशंकर सिंह यांना हायकोर्टाने दणका दिल्यानंतर आणखी एक जोर का झटका कृपाशंकर यांना बसला आहे. कृपाशंकर यांनी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. हायकमांडने कृपाशंकर यांचा राजीनामा स्विकारला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसला पराभव पत्कारावा लागला.यापराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारुन कृपाशंकर यांनी आपला राजीनामा दिला. बेनामी मालमत्ता प्रकरण कृपाशंकर यांना चांगलाच भोवला आहे.

मधु कोडा प्रकरणात अडकलेल्या कृपाशंकर सिंह यांना महापालिकेच्या निवडणुकांआधीच मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद सोडायला सांगितलं जाईल असं अनेक काँग्रेस नेत्यांना वाटत होतं. पण कृपाशंकर सिंह यांचं दिल्लीतलं प्रस्थ मोठं असल्यानं त्यांच्यावर काँग्रेस श्रेष्ठींची कृपा झाली. त्यांना मुंबई काँग्रेसचे काळजीवाहू अध्यक्षपद देण्यात आलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने कृपाशंकर सिंह यांनी राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय कसा बरोबर आहे, हे पक्षश्रेष्ठींनाही पटवून दिलं. मात्र यात काँग्रेस कार्यकर्त्यांना कृपाशंकर सिंह यांची काही वेगळीच चाल दिसली.

कृपाशंकर सिंह यांच्याविरोधातील बेहिशोबी संपत्तीचे प्रकरण हायकोर्टात गेलं. त्याचा निकाल हा कधी ना कधी त्यांच्याविरोधात लागणारच होता. पण त्याआधीच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन कृपाशंकर सिंह यांनी अहवालाबरोबरच आपला राजीनामा हायकमांडकडे पाठवला होता.एकीकडे कृपाशंकर सिंह यांचा राजीनामा काँग्रेस हायकमांडने स्वीकारला. तर दुसरीकडे मुंबई हायकोर्टाने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत एकूणच काय कृपाशंकर सिंह यांच्यावर पराभवाचे खापर फोडून काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.

बेनामी संपत्ती ?

सामाजिक कार्यकर्ते संजय तिवारी यांनी कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. यात त्यांनी कृपाशंकर सिंह यांच्या बेनामी संपत्तीची माहिती दिली. तिवारी यांच्या म्हणण्यानुसार कृपाशंकर यांच्याकडे काय काय बेनामी संपत्ती आहे ?

- रत्नागिरीत 225 एकर जमीन खरेदी- मुंबईत सांताक्रुझला ज्यूपिटर इमारतीत एक संपूर्ण मजला- सांताक्रुझमध्ये आणखी एक फ्लॅट- मुंबईत वांद्रे इथे 'सारंग' बंगला- उत्तर प्रदेशातील जौनपूर इथं मोठी संपत्ती- कृपाशंकर यांच्या नावावर दोन पॅनकार्ड

दरम्यान, कृपाशंकर सिंह यांनी एमआरसीसी (MRCC) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता त्यांचा उत्तराधिकारी कोण, याविषयी सुप्त चर्चा सुरु झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी खासदार प्रिया दत्त, आमदार चंद्रकांत हंडोरे, आमदार मधु चव्हाण, आमदार राजहंस सिंह आणि भाई जगताप यांची नावं आघाडीवर आहेत. अध्यक्षपद निवडीचे सर्वाधिकार सोनिया गांधी यांना दिले जातील असं दिसतंय.

नवा एमआरसीसी अध्यक्ष कोण?

1) खा. प्रिया दत्त - स्वच्छ प्रतिमा- सलग दुसर्‍यांदा खासदार- अ. भा. महिला काँग्रेसच्या सरचिटणीस- महिला अध्यक्ष देण्याची हायकमांडची इच्छा

2) आ.चंद्रकांत हंडोरे- मुंबई काँग्रेसचा दलित चेहरा- सलग तिसर्‍यांदा आमदार- मंत्रिपदी वर्णी लागली नसल्यानं मुंबई अध्यक्षपदासाठी दावेदारी

3) आ.मधू चव्हाण - भायखळ्याचे आमदार - निष्ठावंत म्हणून ओळख - एमआरसीसी अध्यक्षपदासाठी अनेक वर्षांपासून दावेदारी

4) आ.राजहंस सिंह - गुरुदास कामत समर्थक - मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते

याशिवाय आणखी एक नाव या यादीत आहे. ते आहे खासदार संजय निरुपम यांचं. निरुपम यांनी सर्वात जास्त 11 नगरसेवक निवडून आणलेकृपाशंकर सिंग यांना शह देण्याची धमक तसेच उत्तर भारतीयांचं नवं नेतृत्त्व.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 22, 2012 01:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close