S M L

'रामलीला'वर हिंसाचाराला बाबा रामदेवही जबाबदार : कोर्ट

23 फेब्रुवारीगेल्या वर्षी जूनमध्ये योगगुरु बाबा रामदेव यांनी काळ्या पैशाविरोधात आंदोलन पुकारलं. त्यासाठी दिल्लीतल्या रामलीला मैदानावर त्यांनी उपोषण सुरु केलं. पण 5 जूनच्या मध्यरात्री पोलिसांनी लाठीमार करत आंदोलन चिरडून टाकलं. या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टाने निर्वाळा दिला. या हिंसाचाराला दिल्ली पोलीस आणि बाबा रामदेव दोघेही जबाबदार असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. दिल्लीतल्या रामलीला मैदानावर बाबा रामदेव यांचं आंदोलन दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर करत चिरडलं. मध्यरात्रीची ही दंडेलशाही अख्या देशाने टीव्हीच्या माध्यमातून बघितली. या घटनेची दखल न्यायालयाने घेतली आणि स्वतंत्रपणे चौकशीचे आदेश दिले. आठ महिन्यांनी याप्रकरणाचा निकाल लागला. न्यायालय निकालात म्हणतं, "दिल्ली पोलिसांनी आपल्या बळाचा गैरवापर केलाय आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा भंगही केलाय. ती परिस्थिती पोलीस चांगल्या प्रकारे हाताळू शकले असते. लोकांनी निवडून दिलेलं सरकार आणि लोक यांच्यातल्या विश्वासाच्या कमतरतेचं हे ठळक उदाहरण आहे." दिल्ली पोलिसांवर ठपका ठेवतानाच कोर्टानं बाबा रामदेव यांनाही फटकारले आहे. "पोलिसांनी धरणं थांबवा असं सांगितल्यानंतर ते थांबवणे हे रामदेव यांचं नैतिक आणि कायदेशीर कर्तव्य होतं. आपल्या समर्थकांना रामदेव यांनी योग्य पद्धतीने समजावणं गरजेचं होतं. याशिवाय लाठीचार्जमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या राजबाला यांच्या कुटुंबीयांना 5 लाख रूपये, गंभीर जखमींना 50 हजार तर, किरकोळ जखमींना 25 हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. या एकूण रकमेतली 25 टक्के रक्कम रामदेव यांच्या ट्रस्ट मधून तर उरलेली रक्कम दिल्ली पोलिसांनी द्यायचीय. पण बाबा रामदेव यांच्याकडून रक्कम स्वीकारणार नाही, असं राजबाला यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. कोर्टाच्या निकालाचा आदर राखावा, अशी प्रतिक्रिया अण्णा हजारेंनी दिलीय. तर काँग्रेस आणि भाजपनं सोयीस्कर प्रतिक्रिया दिल्या आहे. एकंदरीतच रामदेव आणि सरकार या दोघांनाही न्यायालयाने दोषी ठरवल्यामुळे एकमेकांकडे बोटं दाखवण्याची संधी दोघांनाही मिळणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 23, 2012 09:56 AM IST

'रामलीला'वर हिंसाचाराला बाबा रामदेवही जबाबदार : कोर्ट

23 फेब्रुवारी

गेल्या वर्षी जूनमध्ये योगगुरु बाबा रामदेव यांनी काळ्या पैशाविरोधात आंदोलन पुकारलं. त्यासाठी दिल्लीतल्या रामलीला मैदानावर त्यांनी उपोषण सुरु केलं. पण 5 जूनच्या मध्यरात्री पोलिसांनी लाठीमार करत आंदोलन चिरडून टाकलं. या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टाने निर्वाळा दिला. या हिंसाचाराला दिल्ली पोलीस आणि बाबा रामदेव दोघेही जबाबदार असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. दिल्लीतल्या रामलीला मैदानावर बाबा रामदेव यांचं आंदोलन दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर करत चिरडलं. मध्यरात्रीची ही दंडेलशाही अख्या देशाने टीव्हीच्या माध्यमातून बघितली. या घटनेची दखल न्यायालयाने घेतली आणि स्वतंत्रपणे चौकशीचे आदेश दिले. आठ महिन्यांनी याप्रकरणाचा निकाल लागला. न्यायालय निकालात म्हणतं, "दिल्ली पोलिसांनी आपल्या बळाचा गैरवापर केलाय आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा भंगही केलाय. ती परिस्थिती पोलीस चांगल्या प्रकारे हाताळू शकले असते. लोकांनी निवडून दिलेलं सरकार आणि लोक यांच्यातल्या विश्वासाच्या कमतरतेचं हे ठळक उदाहरण आहे."

दिल्ली पोलिसांवर ठपका ठेवतानाच कोर्टानं बाबा रामदेव यांनाही फटकारले आहे. "पोलिसांनी धरणं थांबवा असं सांगितल्यानंतर ते थांबवणे हे रामदेव यांचं नैतिक आणि कायदेशीर कर्तव्य होतं. आपल्या समर्थकांना रामदेव यांनी योग्य पद्धतीने समजावणं गरजेचं होतं.

याशिवाय लाठीचार्जमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या राजबाला यांच्या कुटुंबीयांना 5 लाख रूपये, गंभीर जखमींना 50 हजार तर, किरकोळ जखमींना 25 हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. या एकूण रकमेतली 25 टक्के रक्कम रामदेव यांच्या ट्रस्ट मधून तर उरलेली रक्कम दिल्ली पोलिसांनी द्यायचीय. पण बाबा रामदेव यांच्याकडून रक्कम स्वीकारणार नाही, असं राजबाला यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.

कोर्टाच्या निकालाचा आदर राखावा, अशी प्रतिक्रिया अण्णा हजारेंनी दिलीय. तर काँग्रेस आणि भाजपनं सोयीस्कर प्रतिक्रिया दिल्या आहे. एकंदरीतच रामदेव आणि सरकार या दोघांनाही न्यायालयाने दोषी ठरवल्यामुळे एकमेकांकडे बोटं दाखवण्याची संधी दोघांनाही मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 23, 2012 09:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close