S M L

नाशिकच्या मनसे उमेदवारांची सहल निघाली अज्ञातस्थळी

23 फेब्रुवारी नाशिकमध्ये छगन भुजबळांच्या तिरक्याचालीने मनसेच्या गोटात जोरात हालचाली सुरु झाल्या आहे. मनसेचा महापौर रोखण्यासाठी रिपाइंचा महापौर करण्याचं आमीष दाखवलं जातं आहे. तर दुसरीकडे मनसेनही आपला किल्ला बांधायला सुरुवात केली आहे.मनसेचा पहिला महापौर नाशिकचा असेल या राज ठाकरेंच्या विधानानंतर नाशिकमध्ये मनसेच्या कँम्पमध्ये शांतता होती. खरं तर जादुई आकड्यापर्यंत पोहोचण्याठी मनसे लगबग चाली खेळेल असं वाटत होतं. मात्र प्रत्यक्षात पहिली चाल विरोधी गटातूनच आली. रामदास आठवले म्हणतात, भुजबळ साहेबांनी मला बोलावलं आहे. नाशकात रिपाइंचा महापौर असा प्रस्ताव प्रस्ताव मिळाला. आणि अचानक मनसेनं आपल्या सर्व नगरसेवकांना रात्रीतून एकत्र आणलं. विभागीय आयुक्तांकडे नोंदणी करुन या नगरसेवकांना तातडीने अज्ञात स्थळी रवानाही केलं. कारण मनसेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनीही सावध पवित्रा घेण्याची आवश्यकता भासायला लागली.मनसेचे आमदार आणि प्रदेश सरचिटणीस वसंत गीते म्हणतात, नाशिकमध्ये ज्या घडामोडी घडताहेत त्यामुळे सावधगिरी बाळगायला हवी.नाशिकमध्ये सत्तेच्या सारीपटलावर प्रत्येकाने आपआपल्या चाली खेळायला सरुवात केली आहे.अपेक्षेप्रमाणे भुजबळांनी आठवलेंना पाचारण करुन तिरकी चाल खेळली. त्यामुळे आपला वजीर पुढे करण्याऐवजी मनसेला आपल्या प्याद्यांचे संरक्षण करावं लागतंय. त्यामुळे पुढची चाल कोण खेळणार याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे. आता भुजबळांकडून आलेल्या आठवलेंच्या प्रस्तावाला शिवसेना, भाजप काय उत्तर देतील यावर सगळ्यांचं लक्ष आहे.  

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 23, 2012 06:17 PM IST

नाशिकच्या मनसे उमेदवारांची सहल निघाली अज्ञातस्थळी

23 फेब्रुवारी

 

नाशिकमध्ये छगन भुजबळांच्या तिरक्याचालीने मनसेच्या गोटात जोरात हालचाली सुरु झाल्या आहे. मनसेचा महापौर रोखण्यासाठी रिपाइंचा महापौर करण्याचं आमीष दाखवलं जातं आहे. तर दुसरीकडे मनसेनही आपला किल्ला बांधायला सुरुवात केली आहे.

मनसेचा पहिला महापौर नाशिकचा असेल या राज ठाकरेंच्या विधानानंतर नाशिकमध्ये मनसेच्या कँम्पमध्ये शांतता होती. खरं तर जादुई आकड्यापर्यंत पोहोचण्याठी मनसे लगबग चाली खेळेल असं वाटत होतं. मात्र प्रत्यक्षात पहिली चाल विरोधी गटातूनच आली. रामदास आठवले म्हणतात, भुजबळ साहेबांनी मला बोलावलं आहे. नाशकात रिपाइंचा महापौर असा प्रस्ताव प्रस्ताव मिळाला. आणि अचानक मनसेनं आपल्या सर्व नगरसेवकांना रात्रीतून एकत्र आणलं. विभागीय आयुक्तांकडे नोंदणी करुन या नगरसेवकांना तातडीने अज्ञात स्थळी रवानाही केलं. कारण मनसेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनीही सावध पवित्रा घेण्याची आवश्यकता भासायला लागली.

मनसेचे आमदार आणि प्रदेश सरचिटणीस वसंत गीते म्हणतात, नाशिकमध्ये ज्या घडामोडी घडताहेत त्यामुळे सावधगिरी बाळगायला हवी.

नाशिकमध्ये सत्तेच्या सारीपटलावर प्रत्येकाने आपआपल्या चाली खेळायला सरुवात केली आहे.अपेक्षेप्रमाणे भुजबळांनी आठवलेंना पाचारण करुन तिरकी चाल खेळली. त्यामुळे आपला वजीर पुढे करण्याऐवजी मनसेला आपल्या प्याद्यांचे संरक्षण करावं लागतंय. त्यामुळे पुढची चाल कोण खेळणार याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे. आता भुजबळांकडून आलेल्या आठवलेंच्या प्रस्तावाला शिवसेना, भाजप काय उत्तर देतील यावर सगळ्यांचं लक्ष आहे.  

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 23, 2012 06:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close