S M L

हिरानंदानींना सुप्रीम कोर्टातही जोरदार लढा देऊ - मेधा पाटकर

24 फेब्रुवारीसर्वसामान्यासाठी परवडणारी घरं बांधण्याच्या हेतूने राज्य सरकारनं हिरानंदानी बिल्डरला पवई येथील जमीन दिली होती. पण हिरानंदानी बिल्डर्सनी श्रीमंतांसाठी घरं बांधून सरकारला फसवलं आहे. त्यामुळे एमएमआरडीएनं आपल्या अहवालात सुचवलं आहे. याप्रमाणे राज्य सरकारनं हिरानंदानी गार्डनची सर्व जमीन ताब्यात घ्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केली आहे.तसेच कोर्टाच्या निर्णयावर आम्ही आधीच कॅव्हेट दाखल केला आहे.त्यामुळे हिरानंदानी बिल्डर्सनी जरी या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं तरी आमची बाजू ऐकुन घेतल्याशिवाय सुप्रीम कोर्टाला निकाल देता येणार नाही. असंही पाटकर यांनी स्पष्ट केलं. पवईतल्या हिरानंदानी टाऊनशिपवर आणि हिरानंदानी बिल्डर्सवर मुंबई हाय कोर्टाने ताशेरे ओढले होते. त्यावर आज सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच राज्य सरकारने स्पष्ट कायदेशीर कारवाई या बाबतीत घेण्याची गरज होती. आणि बिल्डर्स आणि राजकीय नेत्यांच्या युतीतूनच अशा गोष्टी घडत असल्याचा आरोप मेधा पाटकर यांनी केला. त्याचबरोबर येत्या काही आठवड्यात आम्ही हिरानंदानी गार्डनवर फौजदारी गुन्हा दाखल करणार आहोत आणि हिरानंदानीना अजूनही धक्के भविष्यात मिळणार असल्याचं मेधा पाटकर यांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 24, 2012 01:21 PM IST

हिरानंदानींना सुप्रीम कोर्टातही जोरदार लढा देऊ - मेधा पाटकर

24 फेब्रुवारी

सर्वसामान्यासाठी परवडणारी घरं बांधण्याच्या हेतूने राज्य सरकारनं हिरानंदानी बिल्डरला पवई येथील जमीन दिली होती. पण हिरानंदानी बिल्डर्सनी श्रीमंतांसाठी घरं बांधून सरकारला फसवलं आहे. त्यामुळे एमएमआरडीएनं आपल्या अहवालात सुचवलं आहे. याप्रमाणे राज्य सरकारनं हिरानंदानी गार्डनची सर्व जमीन ताब्यात घ्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केली आहे.तसेच कोर्टाच्या निर्णयावर आम्ही आधीच कॅव्हेट दाखल केला आहे.त्यामुळे हिरानंदानी बिल्डर्सनी जरी या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं तरी आमची बाजू ऐकुन घेतल्याशिवाय सुप्रीम कोर्टाला निकाल देता येणार नाही. असंही पाटकर यांनी स्पष्ट केलं. पवईतल्या हिरानंदानी टाऊनशिपवर आणि हिरानंदानी बिल्डर्सवर मुंबई हाय कोर्टाने ताशेरे ओढले होते. त्यावर आज सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच राज्य सरकारने स्पष्ट कायदेशीर कारवाई या बाबतीत घेण्याची गरज होती. आणि बिल्डर्स आणि राजकीय नेत्यांच्या युतीतूनच अशा गोष्टी घडत असल्याचा आरोप मेधा पाटकर यांनी केला. त्याचबरोबर येत्या काही आठवड्यात आम्ही हिरानंदानी गार्डनवर फौजदारी गुन्हा दाखल करणार आहोत आणि हिरानंदानीना अजूनही धक्के भविष्यात मिळणार असल्याचं मेधा पाटकर यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 24, 2012 01:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close