S M L

अखेर पोलिओग्रस्त देशांच्या यादीतून भारताचे नाव वगळले

25 फेब्रुवारी'दो बुंद जिंदगी के' हे ब्रिद वाक्य घेऊन पोलिओविरुद्धचा लढा भारताने खर्‍या अर्थाने जिंकला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं पोलिओग्रस्त देशांच्या यादीतून भारताचं नाव काढण्यात आलं आहे. गेल्या वर्षभरात पोलिओ निर्मूलनात भारताला मोठं यश मिळालं आहे. 2010 मध्ये पहिल्यांदाच पोलिओचे अनेक टेस्ट निगेटीव्ह आले आहेत. जानेवारी महिन्यात पोलिओची एकही केस आढळली नाही. त्यामुळे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननंही भारताचं कौतुक केलं होतं. तसेच इतर देशांनीही भारतापासून शिकावे असं आवाहन डब्लू.एच.ओ (WHO) नं केलं होतं. त्यामुळे पोलियोग्रस्त देशांच्या यादीतून भारताचे नाव अखेर काढण्यात आले आहे. पोलिओ निर्मुलनासाठी भारत सरकारने मोठी मोहीम हाती घेतली. गेल्या काही वर्षात 24 लाख वॉलेंटिअर्स आणि दीड लाख कार्यकर्त्यांची मदत घेण्यात आली. जवळपास हजार कोटी रुपये खर्च आला. आणि अखेर पोलिओ निर्मुलनात भारताला यश आलंय. पश्चिम बंगालमधल्या हावडा जिल्ह्यातली दोन वर्षांची रुखसाना ही पोलिओची शेवटची रुग्ण होती. आता तिचे वडिलच पोलिओविषयी जनजागृती करत आहे. पोलिओ लसीकरण मोहिमेत दरवेळी जवळपास 17 कोटी मुलांना पोलिओ लस दिली जाते. पण आव्हान इथेच संपत नाही. देशात गेल्या वर्षी पोलिओचा एकही रुग्ण आढळला नसला तर लढा अजून संपलेला नाही. आपल्याला सतत सतर्क राहण्याची गरज आहे. पण सध्या तरी पाकिस्तान, नायजेरिया, अफगाणिस्तान अशा पोलिओग्रस्त राष्ट्रांच्या यादीतून भारताचे नाव वगळण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 25, 2012 05:00 PM IST

अखेर पोलिओग्रस्त देशांच्या यादीतून भारताचे नाव वगळले

25 फेब्रुवारी

'दो बुंद जिंदगी के' हे ब्रिद वाक्य घेऊन पोलिओविरुद्धचा लढा भारताने खर्‍या अर्थाने जिंकला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं पोलिओग्रस्त देशांच्या यादीतून भारताचं नाव काढण्यात आलं आहे. गेल्या वर्षभरात पोलिओ निर्मूलनात भारताला मोठं यश मिळालं आहे. 2010 मध्ये पहिल्यांदाच पोलिओचे अनेक टेस्ट निगेटीव्ह आले आहेत. जानेवारी महिन्यात पोलिओची एकही केस आढळली नाही. त्यामुळे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननंही भारताचं कौतुक केलं होतं. तसेच इतर देशांनीही भारतापासून शिकावे असं आवाहन डब्लू.एच.ओ (WHO) नं केलं होतं. त्यामुळे पोलियोग्रस्त देशांच्या यादीतून भारताचे नाव अखेर काढण्यात आले आहे.

पोलिओ निर्मुलनासाठी भारत सरकारने मोठी मोहीम हाती घेतली. गेल्या काही वर्षात 24 लाख वॉलेंटिअर्स आणि दीड लाख कार्यकर्त्यांची मदत घेण्यात आली. जवळपास हजार कोटी रुपये खर्च आला. आणि अखेर पोलिओ निर्मुलनात भारताला यश आलंय. पश्चिम बंगालमधल्या हावडा जिल्ह्यातली दोन वर्षांची रुखसाना ही पोलिओची शेवटची रुग्ण होती. आता तिचे वडिलच पोलिओविषयी जनजागृती करत आहे. पोलिओ लसीकरण मोहिमेत दरवेळी जवळपास 17 कोटी मुलांना पोलिओ लस दिली जाते. पण आव्हान इथेच संपत नाही.

देशात गेल्या वर्षी पोलिओचा एकही रुग्ण आढळला नसला तर लढा अजून संपलेला नाही. आपल्याला सतत सतर्क राहण्याची गरज आहे. पण सध्या तरी पाकिस्तान, नायजेरिया, अफगाणिस्तान अशा पोलिओग्रस्त राष्ट्रांच्या यादीतून भारताचे नाव वगळण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 25, 2012 05:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close