S M L

टोलधाडविरोधात आता अण्णांचा लढा

26 फेब्रुवारीजनलोकपाल विधेयकासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगण ते दिल्ली मैदान दणाणून सोडले. अण्णांच्या आंदोलनात देशासह विदेशातून लोकांनी आंदोलनात सहभाग नोंदवला. अण्णांच्या आंदोलनाची दखल सरकारला घ्यावीच लागली. आता अण्णांनी टोलधाडाविरोधात मोहिम उघडणार आहे. वारंवार इशारे देऊनही राज्यात टोलधाड सुरू असल्याने अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार केला आहे. यासंदर्भात अण्णा हजारे उद्या राळेगणमध्ये एक महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीला बंडातात्या कराडकर तसेच टोलवसुली विरोेधात लढणार्‍या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत टोलविरोधातील आंदोलनाची दिशा अण्णा ठरवणार असल्याचं समजत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 26, 2012 10:24 AM IST

टोलधाडविरोधात आता अण्णांचा लढा

26 फेब्रुवारी

जनलोकपाल विधेयकासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगण ते दिल्ली मैदान दणाणून सोडले. अण्णांच्या आंदोलनात देशासह विदेशातून लोकांनी आंदोलनात सहभाग नोंदवला. अण्णांच्या आंदोलनाची दखल सरकारला घ्यावीच लागली. आता अण्णांनी टोलधाडाविरोधात मोहिम उघडणार आहे. वारंवार इशारे देऊनही राज्यात टोलधाड सुरू असल्याने अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार केला आहे. यासंदर्भात अण्णा हजारे उद्या राळेगणमध्ये एक महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीला बंडातात्या कराडकर तसेच टोलवसुली विरोेधात लढणार्‍या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत टोलविरोधातील आंदोलनाची दिशा अण्णा ठरवणार असल्याचं समजत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 26, 2012 10:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close