S M L

उद्या बँक आणि कामगार संघटनचे संप

27 फेब्रुवारीउद्या कामगार संघटना, सहकारी संस्था आणि बँकांच्या सात प्रमुख संघटनांनी एक दिवसाच्या लाक्षणिक संपाची हाक दिली आहे. त्यामुळे हा संप एकप्रकारे महासंपच असणार आहे. वाढती महागाई,बेरोजगारी खासगीकरणास विरोध, सामाजिक सुरक्षा निधीची मागणी, रोजगार निर्मिताला चालन, कंत्राटी पद्धत मोडीत काढावी, बोनस आणि ग्रॅज्युइटीमध्ये वाढ करावी आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात येत आहे. या देशव्यापी संपाला महापालिका आणि मंत्रालयातील संघटनांनी पाठिंबा दिला असला तरी या संघटना संपात सक्रीय सहभागी होणार नाहीत. त्यामुळे मुंबईतल्या अत्यावश्यक सेवांसह महापालिका आणि मंत्रालयाचे कामकाज सुरळीत सुरू राहणार आहे. कामगारांच्या या संपामध्ये सीटू, आयटक, इंटक यांच्यासह सर्व कामगार संघटना,प्राध्यापक, बँक,विमा कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी,घरकामगार, फेरीवाले, रिक्षाचालक संघटना सहभागी होणार आहेत. या संपाला शिवसेनेनं सक्रीय पाठिंबा दिला असून त्यांच्या भारतीय कामगार सेना महासंघाशी आणि स्थानिय लोकधिकार समितीशी संलग्न सर्व संघटना सहभागी होत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 27, 2012 03:50 PM IST

उद्या बँक आणि कामगार संघटनचे संप

27 फेब्रुवारी

उद्या कामगार संघटना, सहकारी संस्था आणि बँकांच्या सात प्रमुख संघटनांनी एक दिवसाच्या लाक्षणिक संपाची हाक दिली आहे. त्यामुळे हा संप एकप्रकारे महासंपच असणार आहे. वाढती महागाई,बेरोजगारी खासगीकरणास विरोध, सामाजिक सुरक्षा निधीची मागणी, रोजगार निर्मिताला चालन, कंत्राटी पद्धत मोडीत काढावी, बोनस आणि ग्रॅज्युइटीमध्ये वाढ करावी आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात येत आहे. या देशव्यापी संपाला महापालिका आणि मंत्रालयातील संघटनांनी पाठिंबा दिला असला तरी या संघटना संपात सक्रीय सहभागी होणार नाहीत. त्यामुळे मुंबईतल्या अत्यावश्यक सेवांसह महापालिका आणि मंत्रालयाचे कामकाज सुरळीत सुरू राहणार आहे. कामगारांच्या या संपामध्ये सीटू, आयटक, इंटक यांच्यासह सर्व कामगार संघटना,प्राध्यापक, बँक,विमा कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी,घरकामगार, फेरीवाले, रिक्षाचालक संघटना सहभागी होणार आहेत. या संपाला शिवसेनेनं सक्रीय पाठिंबा दिला असून त्यांच्या भारतीय कामगार सेना महासंघाशी आणि स्थानिय लोकधिकार समितीशी संलग्न सर्व संघटना सहभागी होत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 27, 2012 03:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close