S M L

'जैतापूर'ला विरोधामुळे शिवसेनेच्या चौकशीची मागणी

29 फेब्रुवारीजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणार्‍या शिवसेना आणि अन्य संघटनांना विदेशी शक्तीत मिळतेय का याची चौकशी करण्याची मागणी प्रदेश काँग्रेसने पतप्रधान कार्यालयाकडे केली आहे. तामिळनाडूतल्या कुडनकुलम अणुप्रकल्पाला विरोध करणार्‍या एनजीओजना विदेशातून आर्थिक मदत होत असल्याचं चौकशीत आढळून आलं आहे. त्यानंतर केंद्र सरकारने मंगळवारी चार एनजीओवर गुन्हा दाखल केला. त्या पाश्वभूमीवर जैतापूर अणुप्रकल्पाला विरोध कऱणार्‍या शिवसेनेसह अन्य संघटनांना विदेशातून आर्थिक मदत मिळते का ? याची चौकशी करण्याची मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री नारायण स्वामी यांच्याकडे केली आहे. दरम्यान जैतापूर प्रकल्पा संबंधीचे गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न करणारे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांच्यावर कुठलीही सेन्सॉरशिप सहन केली जाणार नाही, अशी सेन्सॉरशिप लादणार्‍या शिवसेनेसह अन्य कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 29, 2012 09:57 AM IST

'जैतापूर'ला विरोधामुळे शिवसेनेच्या चौकशीची मागणी

29 फेब्रुवारी

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणार्‍या शिवसेना आणि अन्य संघटनांना विदेशी शक्तीत मिळतेय का याची चौकशी करण्याची मागणी प्रदेश काँग्रेसने पतप्रधान कार्यालयाकडे केली आहे. तामिळनाडूतल्या कुडनकुलम अणुप्रकल्पाला विरोध करणार्‍या एनजीओजना विदेशातून आर्थिक मदत होत असल्याचं चौकशीत आढळून आलं आहे. त्यानंतर केंद्र सरकारने मंगळवारी चार एनजीओवर गुन्हा दाखल केला. त्या पाश्वभूमीवर जैतापूर अणुप्रकल्पाला विरोध कऱणार्‍या शिवसेनेसह अन्य संघटनांना विदेशातून आर्थिक मदत मिळते का ? याची चौकशी करण्याची मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री नारायण स्वामी यांच्याकडे केली आहे. दरम्यान जैतापूर प्रकल्पा संबंधीचे गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न करणारे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांच्यावर कुठलीही सेन्सॉरशिप सहन केली जाणार नाही, अशी सेन्सॉरशिप लादणार्‍या शिवसेनेसह अन्य कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 29, 2012 09:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close