S M L

मनसेच्या सहा विभागध्यक्षांचे राजीनामे

29 फेब्रुवारीमुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला चांगलं यश मिळालं असलं तरी दक्षिण मुंबईत मात्र मनसेचा एकही नगरसेवक निवडून येऊ शकला नाही. त्यामुळे या पराभवाची जबाबदारी घेत दक्षिण मुंबईतल्या मनसेच्या 6 विभाग अध्यक्षांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. अरविंद गावडे, संजय नाईक, धनराज नाईक, भूपेन जोशी, शरीफ देशमुख आणि रवी चव्हाण अशी या विभागअध्यक्षांची नावं आहेत. काही दिवसांपूर्वी मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांनी या पराभवाची जबाबदारी घेत गटनेतेपदाचा राजीनामा राज ठाकरेंकडे सोपवला आहे. पण राज ठाकरेंनी अजून याबाबत निर्णय घेतलेला नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 29, 2012 11:46 AM IST

मनसेच्या सहा विभागध्यक्षांचे राजीनामे

29 फेब्रुवारी

मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला चांगलं यश मिळालं असलं तरी दक्षिण मुंबईत मात्र मनसेचा एकही नगरसेवक निवडून येऊ शकला नाही. त्यामुळे या पराभवाची जबाबदारी घेत दक्षिण मुंबईतल्या मनसेच्या 6 विभाग अध्यक्षांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. अरविंद गावडे, संजय नाईक, धनराज नाईक, भूपेन जोशी, शरीफ देशमुख आणि रवी चव्हाण अशी या विभागअध्यक्षांची नावं आहेत. काही दिवसांपूर्वी मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांनी या पराभवाची जबाबदारी घेत गटनेतेपदाचा राजीनामा राज ठाकरेंकडे सोपवला आहे. पण राज ठाकरेंनी अजून याबाबत निर्णय घेतलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 29, 2012 11:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close