S M L

कृपांना धक्का;याचिका पुढे ढकलली

02 मार्चबेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अटक टाळण्यासाठी कृपाशंकर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मात्र सुप्रीम कोर्टाने कृपांच्या याचिकेवर 13 मार्चपर्यंत सुनवाणी पुढे ढकलण्यात आली आहे. कारवाईचा बडगा टाळण्यासाठी कृपाशंकरनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण, कोर्टानं त्यांना दिलासा द्यायला नकार दिला. आता मुंबई पोलीस त्यांना कधी अटक करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.कृपाशंकर यांच्यावर आजवर दिल्लीनं नेहमीच कृपा केली. पण यावेळी मात्र दिल्लीतल्या सुप्रीम कोर्टानंच त्यांना धक्का दिला. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देण्याच्या त्यांच्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला. मुळात या याचिकेची सुनावणी 3 मार्चला होणार होती. पण कृपाशंकर यांचे वकील अरविंद सिंह यांनी चलाखी करत ही सुनावणी 2 मार्चला घ्यायला लावली. यावर कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली. नाराज न्यायमूतीर्ंनी म्हटलं. 'हे प्रकरण आम्ही आज ऐकणार नाही..सुट्टीनंतरच आता त्याची सुनावणी होईल.'सुट्टीनंतरच सुनावणी असं कोर्टाने स्पष्टपणे सांगितल्यामुळे सुट्टीच्या काळात न्यायाधीशांच्या घरी जाऊन स्थगिती मिळवण्याचा मार्गही बंद झाला. कृपांनी आपल्या याचिकेत तीन आदेशांना स्थगिती मागितली होती.कृपांची याचिका- मुंबई हायकोर्टाच्या FIR दाखल करण्याला स्थगिती द्या- संपत्ती जप्त करण्याच्या आदेशाला स्थगिती द्या - एसआयटीच्या नेमणुकीलाही स्थगिती द्या आता ही याचिका आता 13 मार्चला ऐकली जाईल. कृपांवर गंभीर आरोप आहेत. मालमत्तेशी संबंधित काही कागदपत्रंही जाळली गेली आहेत. कृपा बाहेर राहिले तर अजून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो..तरीही कृपांना अटक केली जात नाहीय. त्यामुळेच मुंबई पोलीस कृपांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत का, हा प्रश्न निर्माण होतोय. अजूनपर्यंत कृपाशंकर सिंह कुठे आहेत, हे कुणालाही ठाऊक नाही.कृपाशंकर सिंह यांच्यावर कोणते गुन्हे दाखल ?1) प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट 13(1) डी - सरकारी नोकरानं ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती गोळा करणं आणि 13(1) ई ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती गोळा केल्याबाबत शिक्षा आयपीसी नुसार कारवाईकलम 120 - सात वर्षांपर्यत शिक्षा कलम 409 - सरकारी नोकरानं विश्‍वासघात करणं - शिक्षा सात वर्षं कलम 471 - खोट्या कागदपत्रांचा वापर करणं - शिक्षा सात वर्षं कलम 420 - फसवणूक करणे - शिक्षा सात वर्षंकलम 468 - खोट्या कागदपत्रांचा वापर करून फसवणूक करणं - शिक्षा सात वर्षंकलम 201 - पुरावा नष्ट करणे - शिक्षा तीन वर्षं कृपा शंकर यांच्या विरोधात ही सर्व कलमं गंभीर स्वरुपाची आहेत

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 2, 2012 09:59 AM IST

कृपांना धक्का;याचिका पुढे ढकलली

02 मार्च

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अटक टाळण्यासाठी कृपाशंकर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मात्र सुप्रीम कोर्टाने कृपांच्या याचिकेवर 13 मार्चपर्यंत सुनवाणी पुढे ढकलण्यात आली आहे. कारवाईचा बडगा टाळण्यासाठी कृपाशंकरनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण, कोर्टानं त्यांना दिलासा द्यायला नकार दिला. आता मुंबई पोलीस त्यांना कधी अटक करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

कृपाशंकर यांच्यावर आजवर दिल्लीनं नेहमीच कृपा केली. पण यावेळी मात्र दिल्लीतल्या सुप्रीम कोर्टानंच त्यांना धक्का दिला. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देण्याच्या त्यांच्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला. मुळात या याचिकेची सुनावणी 3 मार्चला होणार होती. पण कृपाशंकर यांचे वकील अरविंद सिंह यांनी चलाखी करत ही सुनावणी 2 मार्चला घ्यायला लावली. यावर कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली. नाराज न्यायमूतीर्ंनी म्हटलं. 'हे प्रकरण आम्ही आज ऐकणार नाही..सुट्टीनंतरच आता त्याची सुनावणी होईल.'

सुट्टीनंतरच सुनावणी असं कोर्टाने स्पष्टपणे सांगितल्यामुळे सुट्टीच्या काळात न्यायाधीशांच्या घरी जाऊन स्थगिती मिळवण्याचा मार्गही बंद झाला. कृपांनी आपल्या याचिकेत तीन आदेशांना स्थगिती मागितली होती.

कृपांची याचिका- मुंबई हायकोर्टाच्या FIR दाखल करण्याला स्थगिती द्या- संपत्ती जप्त करण्याच्या आदेशाला स्थगिती द्या - एसआयटीच्या नेमणुकीलाही स्थगिती द्या

आता ही याचिका आता 13 मार्चला ऐकली जाईल. कृपांवर गंभीर आरोप आहेत. मालमत्तेशी संबंधित काही कागदपत्रंही जाळली गेली आहेत. कृपा बाहेर राहिले तर अजून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो..तरीही कृपांना अटक केली जात नाहीय. त्यामुळेच मुंबई पोलीस कृपांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत का, हा प्रश्न निर्माण होतोय. अजूनपर्यंत कृपाशंकर सिंह कुठे आहेत, हे कुणालाही ठाऊक नाही.

कृपाशंकर सिंह यांच्यावर कोणते गुन्हे दाखल ?

1) प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट 13(1) डी - सरकारी नोकरानं ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती गोळा करणं आणि 13(1) ई ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती गोळा केल्याबाबत शिक्षा आयपीसी नुसार कारवाईकलम 120 - सात वर्षांपर्यत शिक्षा कलम 409 - सरकारी नोकरानं विश्‍वासघात करणं - शिक्षा सात वर्षं कलम 471 - खोट्या कागदपत्रांचा वापर करणं - शिक्षा सात वर्षं कलम 420 - फसवणूक करणे - शिक्षा सात वर्षंकलम 468 - खोट्या कागदपत्रांचा वापर करून फसवणूक करणं - शिक्षा सात वर्षंकलम 201 - पुरावा नष्ट करणे - शिक्षा तीन वर्षं कृपा शंकर यांच्या विरोधात ही सर्व कलमं गंभीर स्वरुपाची आहेत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 2, 2012 09:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close