S M L

कृपाशंकर सिंह मुंबईतच

03 मार्चगेला आठवडाभर बेपत्ता असलेले कृपाशंकर सिंह आज मुंबईत असल्याचं उघड झालं. वांद्र्यातल्या श्री साईप्रसाद नावाच्या त्यांच्या जप्त झालेल्या घरातच ते आहेत. आज मुंबई पोलिसांनी त्यांचा जबाबही नोंदवला. दरम्यान, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न पोलीसच करत आहेत असा आरोप विरोधकांनीच नाही तर माजी पोलीस अधिकारी वाय पी सिंह यांनीही केला. कृपाशंकर सिंह कुठे गेले.. दिल्ली ? मुंबई? जौनपूर ? की आणखी कुठे ? आठवडाभर चाललेल्या या सस्पेंसवर आता पडदा पडला आहे. मुंबई काँग्रेसचे हे माजी अध्यक्ष शनिवरी सकाळी त्यांच्या वाद्र्यातल्याच घरी अवतरले. मग दुपारहून त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी मुंबई पोलिसांच्या एसआयटीचे सदस्यही थडकले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कृपांना इतक्यात अटक होण्याची शक्यता कमी. त्यामुळे पोलीस कृपांना मदत करतायत असा आरोप विरोधकांनी आणि माजी पोलीस अधिकारी वाय पी सिंह यांनी केला. कृपाशंकर सिंह यांची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली. म्हणजेच ती ताब्यात घेण्यात आली. त्यामुळे तिथं अजूनही सिंह कुटुंबीय राहू शकतील. शुक्रवारी इथं पोलिसांची कारवाई सुरू असताना कृपांचा मुलगा नरेंद्र सिंह याने असभ्य वर्तन केलं होतं. शनिवारी सकाळी त्याने माफी मागितली. पण त्यापलिकडे फारसं काही बोलायचं टाळलं. कृपांच्या मुंबईबाहेरच्या मालमत्तांवरही छापे टाकले जाण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. कृपांची रत्नागिरीत 250 एकर शेतजमीन आहे. उत्तर प्रदेशातल्या जौनपूरमध्येही त्यांची रहिवाशी आणि व्यावसायिक मालमत्ता आहे. पण ही कारवाई कधी केली जाते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. संबंधित बातम्या कृपांच्या मुंबईबाहेरील मालमत्तेवर छापे ? कृपांच्या पुत्राने मागितली माफी कृपांची मुंबईतील सर्व संपत्ती जप्त ;अटक कधी ?

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 3, 2012 12:07 PM IST

कृपाशंकर सिंह मुंबईतच

03 मार्च

गेला आठवडाभर बेपत्ता असलेले कृपाशंकर सिंह आज मुंबईत असल्याचं उघड झालं. वांद्र्यातल्या श्री साईप्रसाद नावाच्या त्यांच्या जप्त झालेल्या घरातच ते आहेत. आज मुंबई पोलिसांनी त्यांचा जबाबही नोंदवला. दरम्यान, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न पोलीसच करत आहेत असा आरोप विरोधकांनीच नाही तर माजी पोलीस अधिकारी वाय पी सिंह यांनीही केला.

कृपाशंकर सिंह कुठे गेले.. दिल्ली ? मुंबई? जौनपूर ? की आणखी कुठे ? आठवडाभर चाललेल्या या सस्पेंसवर आता पडदा पडला आहे. मुंबई काँग्रेसचे हे माजी अध्यक्ष शनिवरी सकाळी त्यांच्या वाद्र्यातल्याच घरी अवतरले. मग दुपारहून त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी मुंबई पोलिसांच्या एसआयटीचे सदस्यही थडकले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कृपांना इतक्यात अटक होण्याची शक्यता कमी. त्यामुळे पोलीस कृपांना मदत करतायत असा आरोप विरोधकांनी आणि माजी पोलीस अधिकारी वाय पी सिंह यांनी केला. कृपाशंकर सिंह यांची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली. म्हणजेच ती ताब्यात घेण्यात आली. त्यामुळे तिथं अजूनही सिंह कुटुंबीय राहू शकतील. शुक्रवारी इथं पोलिसांची कारवाई सुरू असताना कृपांचा मुलगा नरेंद्र सिंह याने असभ्य वर्तन केलं होतं. शनिवारी सकाळी त्याने माफी मागितली. पण त्यापलिकडे फारसं काही बोलायचं टाळलं.

कृपांच्या मुंबईबाहेरच्या मालमत्तांवरही छापे टाकले जाण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. कृपांची रत्नागिरीत 250 एकर शेतजमीन आहे. उत्तर प्रदेशातल्या जौनपूरमध्येही त्यांची रहिवाशी आणि व्यावसायिक मालमत्ता आहे. पण ही कारवाई कधी केली जाते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

कृपांच्या मुंबईबाहेरील मालमत्तेवर छापे ? कृपांच्या पुत्राने मागितली माफी कृपांची मुंबईतील सर्व संपत्ती जप्त ;अटक कधी ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 3, 2012 12:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close