S M L

जिल्हाधिकार्‍यांनाच ओळखता येईन बनावट मतदार ओळखपत्र !

दीप्ती राऊत, नाशिक03 फेब्रुवारीमतदार ओळखपत्र अधिकृत की बनावट याबाबत निवडणूक नियंत्रण यंत्रणेतच गोंधळ आहे. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत वापरण्यात आलेले संशयास्पद मतदार ओळखपत्र पुरावा म्हणून जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. मात्र, त्यांनाही ते ओळखता आले नाहीत विशेष. महापालिकेच्या निवडणुकीतल्या ओळखपत्र घोळाची चौकशी करण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या मुदतीचे तीन दिवस संपले, तीन दिवस उरले. आतापर्यंत बनावट मतदार ओळखपत्राच्या 15 तक्रारी नाशिकमध्ये दाखल झाल्या आहेत. तक्रारदार भरत मंडलीक म्हणतात, मतदान करताना आम्ही या लोकांना पकडलं, ते पळून गेले, हे त्यांची बोगस कार्ड. यांचा पत्ता आहे सुमन पेट्रोल पंपामागे पण संबंधित व्यक्ती अद्याप पर्यंत सापडली नाही. एकट्या प्रभाग क्रमांक 53 च्या मतदार यादीत मुंजवड आणि अजंग गावातली 107 नावं सापडतात आणि जिल्हाधिकारी पी. वेलारासू म्हणताहेत, 'एकाच प्रभागात दिडशे पासून दिड हजारापर्यंत मतदार यादीत नावं ऍड झाल्याच्या तक्रारी नाहीत.'ज्या तक्रारी दाखल झाल्या त्याकडे अधिकार्‍यांनी दुर्लक्षच केलं. तक्रारदार गोपाळ पाटील म्हणतात, मतदानाच्या दिवशी आम्ही त्यावर ऑबजेक्शन घेतलं, पण निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी सांगितलं त्यांच्याकडे फोटो आयडी आहे, त्यांना आम्ही थांबवू शकत नाही. तर राजेंद्र बागूल म्हणतात, आमची मागणी आहे हे बोगस आयडी तयार करणारा कन्हैय्या परदेशीला अटक झालीच पाहिजे, तो सांगत असलेल्या जागा ताब्यात घेतल्या पाहिजेत, त्यांनं ते कसे बनवले, कोणाला पुरवेल त्याचा तपास झाला पाहिजे.बनावट व्होटर आयडीचा शोध घेण्यासाठी कन्हैय्या परदेशीला अटक करणं गरजेचं आहे. पण पोलीस म्हणतात, त्याच्या विरुद्ध तक्रार नाही तेव्हा अटक कशी करणार तक्रार ? तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकार्‍यांनी करणं गरजेचं आहे. परदेशीने 27 फेब्रुवारीलात जिल्हाधिकार्‍यांकडे ही तक्रार नोंदवली, त्याचे पुरावेही दिलेत पण जिल्हाधिकारी म्हणताहेत, जिल्हाधिकारी म्हणून तो आमच्याकडे आला नाही, त्याचं पत्र आम्हाला पाहायला मिळालं नाही.विशेष म्हणजे संशयास्पद कार्ड जिल्हाधिकार्‍यांना दाखवल्यावर ते ओरिजल की बनावट हे जिल्हाधिकारीही ओळखू शकले नाहीत. मतदार कार्डासारख्या महत्त्वाच्या पुराव्याबाबत जबाबदार अधिकार्‍यांचे हे विधान.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 3, 2012 03:04 PM IST

जिल्हाधिकार्‍यांनाच ओळखता येईन बनावट मतदार ओळखपत्र !

दीप्ती राऊत, नाशिक

03 फेब्रुवारी

मतदार ओळखपत्र अधिकृत की बनावट याबाबत निवडणूक नियंत्रण यंत्रणेतच गोंधळ आहे. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत वापरण्यात आलेले संशयास्पद मतदार ओळखपत्र पुरावा म्हणून जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. मात्र, त्यांनाही ते ओळखता आले नाहीत विशेष.

महापालिकेच्या निवडणुकीतल्या ओळखपत्र घोळाची चौकशी करण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या मुदतीचे तीन दिवस संपले, तीन दिवस उरले. आतापर्यंत बनावट मतदार ओळखपत्राच्या 15 तक्रारी नाशिकमध्ये दाखल झाल्या आहेत. तक्रारदार भरत मंडलीक म्हणतात, मतदान करताना आम्ही या लोकांना पकडलं, ते पळून गेले, हे त्यांची बोगस कार्ड. यांचा पत्ता आहे सुमन पेट्रोल पंपामागे पण संबंधित व्यक्ती अद्याप पर्यंत सापडली नाही.

एकट्या प्रभाग क्रमांक 53 च्या मतदार यादीत मुंजवड आणि अजंग गावातली 107 नावं सापडतात आणि जिल्हाधिकारी पी. वेलारासू म्हणताहेत, 'एकाच प्रभागात दिडशे पासून दिड हजारापर्यंत मतदार यादीत नावं ऍड झाल्याच्या तक्रारी नाहीत.'

ज्या तक्रारी दाखल झाल्या त्याकडे अधिकार्‍यांनी दुर्लक्षच केलं. तक्रारदार गोपाळ पाटील म्हणतात, मतदानाच्या दिवशी आम्ही त्यावर ऑबजेक्शन घेतलं, पण निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी सांगितलं त्यांच्याकडे फोटो आयडी आहे, त्यांना आम्ही थांबवू शकत नाही. तर राजेंद्र बागूल म्हणतात, आमची मागणी आहे हे बोगस आयडी तयार करणारा कन्हैय्या परदेशीला अटक झालीच पाहिजे, तो सांगत असलेल्या जागा ताब्यात घेतल्या पाहिजेत, त्यांनं ते कसे बनवले, कोणाला पुरवेल त्याचा तपास झाला पाहिजे.

बनावट व्होटर आयडीचा शोध घेण्यासाठी कन्हैय्या परदेशीला अटक करणं गरजेचं आहे. पण पोलीस म्हणतात, त्याच्या विरुद्ध तक्रार नाही तेव्हा अटक कशी करणार तक्रार ? तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकार्‍यांनी करणं गरजेचं आहे. परदेशीने 27 फेब्रुवारीलात जिल्हाधिकार्‍यांकडे ही तक्रार नोंदवली, त्याचे पुरावेही दिलेत पण जिल्हाधिकारी म्हणताहेत, जिल्हाधिकारी म्हणून तो आमच्याकडे आला नाही, त्याचं पत्र आम्हाला पाहायला मिळालं नाही.

विशेष म्हणजे संशयास्पद कार्ड जिल्हाधिकार्‍यांना दाखवल्यावर ते ओरिजल की बनावट हे जिल्हाधिकारीही ओळखू शकले नाहीत. मतदार कार्डासारख्या महत्त्वाच्या पुराव्याबाबत जबाबदार अधिकार्‍यांचे हे विधान.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 3, 2012 03:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close