S M L

बाळासाहेबांसाठी राज ठाकरेंचे पाऊल पुढे

06 मार्चशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हे ठाणे आहे याचा विकास व्हावा अशी त्यांची इच्छा आहे त्यांच्या इच्छेचा आदर राखत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहोत असं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलं. ठाण्यात जनादेश हा महायुतीला आहे त्यामुळे जनतेचा कौल लक्षात घेत युतीला पाठिंबा देत असल्याच स्पष्ट केलं. राज यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तसेच महायुतीच्या महापौरपदाचा मार्गही मोकळा झाला आहे. ठाण्यात मागिल आठवड्यापासून सुरु असलेल्या राजकीय डावपेचामुळे वातावरण चांगलेच तापले. युतीच्या नगरसेविका सुहासिनी लोखंडे गेल्या 10 दिवसांपासून बेपत्ता असल्यामुळे महायुतीने ठाणे बंद पाडले. आज महापौरपदाची निवडणूक होणार आहे. पण लोखंडेबाईचा पत्ता लागत नसल्यामुळे युतीच्या गोटात धाकधूक वाढली. पण मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला महायुतीला पाठिंबा आहे असं जाहीर केलं आणि महायुतीचा जीव भांड्यात पडला. शिवसेनेतून बाहेर पडलेले राज ठाकरे यांनी अचानक असा निर्णय घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. बाळासाहेबांचे हे ठाणे आहे ठाण्याचा विकास व्हावा अशी त्यांची इच्छा आहे त्याच इच्छेचा आदर आहे. शहराचा विकास व्हावा हे महत्वाचं आहे पण त्यांना हा पाठिंबा इथेच आहे ही काही युतीची नांदी वगैरे काही नाही असंही स्पष्ट केलं. तसेच याबाबत शिवसेनेच 3 आमदार मला भेटले होते त्यांनी सध्याच्या परिस्थितीबद्दल सांगितले. या अगोदर ही बाळा नांदगावकर आणि इतर सहकार्यांशी यांच्याशी संबंध होते. पण कधी माझ्या कानी कोणत्या मागणी आली नाही. शेवटी जनादेशाच्या बाजूने मी आहे. जनतेला स्थिर सरकार मिळावं ही माझीही इच्छा आहे तसेच वेळ आली तर नाशिकमध्ये मनसे विरोधी पक्ष म्हणून बसेल , पण सत्तेसाठी तडजोड करणार नाही, असही राज यांनी ठासून सांगितलंय. त्याचबरोबर पुण्यात मनसे विरोधी पक्षाची भूमिका बजावेल असही राजनी म्हटलं आहे. राज यांच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादीने तलवार म्यान करत महायुतीला शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादीचे आमदार जिंतेद्र आव्हाड यांनी आयबीएन लोकमतशी बोलतांना राज यांची भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. पण लोखंडेबाईंचे अपहरणाचे आरोप फेटाळून लावले.-

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 6, 2012 04:31 PM IST

बाळासाहेबांसाठी राज ठाकरेंचे पाऊल पुढे

06 मार्च

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हे ठाणे आहे याचा विकास व्हावा अशी त्यांची इच्छा आहे त्यांच्या इच्छेचा आदर राखत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहोत असं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलं. ठाण्यात जनादेश हा महायुतीला आहे त्यामुळे जनतेचा कौल लक्षात घेत युतीला पाठिंबा देत असल्याच स्पष्ट केलं. राज यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तसेच महायुतीच्या महापौरपदाचा मार्गही मोकळा झाला आहे.

ठाण्यात मागिल आठवड्यापासून सुरु असलेल्या राजकीय डावपेचामुळे वातावरण चांगलेच तापले. युतीच्या नगरसेविका सुहासिनी लोखंडे गेल्या 10 दिवसांपासून बेपत्ता असल्यामुळे महायुतीने ठाणे बंद पाडले. आज महापौरपदाची निवडणूक होणार आहे. पण लोखंडेबाईचा पत्ता लागत नसल्यामुळे युतीच्या गोटात धाकधूक वाढली. पण मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला महायुतीला पाठिंबा आहे असं जाहीर केलं आणि महायुतीचा जीव भांड्यात पडला. शिवसेनेतून बाहेर पडलेले राज ठाकरे यांनी अचानक असा निर्णय घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. बाळासाहेबांचे हे ठाणे आहे ठाण्याचा विकास व्हावा अशी त्यांची इच्छा आहे त्याच इच्छेचा आदर आहे. शहराचा विकास व्हावा हे महत्वाचं आहे पण त्यांना हा पाठिंबा इथेच आहे ही काही युतीची नांदी वगैरे काही नाही असंही स्पष्ट केलं.

तसेच याबाबत शिवसेनेच 3 आमदार मला भेटले होते त्यांनी सध्याच्या परिस्थितीबद्दल सांगितले. या अगोदर ही बाळा नांदगावकर आणि इतर सहकार्यांशी यांच्याशी संबंध होते. पण कधी माझ्या कानी कोणत्या मागणी आली नाही. शेवटी जनादेशाच्या बाजूने मी आहे. जनतेला स्थिर सरकार मिळावं ही माझीही इच्छा आहे तसेच वेळ आली तर नाशिकमध्ये मनसे विरोधी पक्ष म्हणून बसेल , पण सत्तेसाठी तडजोड करणार नाही, असही राज यांनी ठासून सांगितलंय. त्याचबरोबर पुण्यात मनसे विरोधी पक्षाची भूमिका बजावेल असही राजनी म्हटलं आहे. राज यांच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादीने तलवार म्यान करत महायुतीला शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादीचे आमदार जिंतेद्र आव्हाड यांनी आयबीएन लोकमतशी बोलतांना राज यांची भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. पण लोखंडेबाईंचे अपहरणाचे आरोप फेटाळून लावले.-

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 6, 2012 04:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close