S M L

कृपांच्या पुत्राचे पनवेलमधील दुकान ताब्यात

07 मार्चकृपाशंकर सिंह यांच्यावरील कारवाई पोलिसांनी आता आणखी तीव्र केली आहे. मुंबईतल्या मालमत्ता जप्त केल्यानंतर आता पोलिसांनी पनवेलमधील कृपाशंकर सिंह यांचा मुलगा नरेंद्र मोहन याच्या नावावरील एक दुकान ताब्यात घेतलं आहे. उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा जास्त संपत्ती बाळगल्याच्या प्रकरणात हायकोर्टाच्या आदेशावरुन कृपाशंकर सिंह यांच्यावर कारवाई सुरु आहे. यांसदर्भात याचिकाकर्ते संजय तिवारी यांना दाखल केलेल्या याचिकेत या मालमत्तेचा उल्लेख करण्यात आला आहे. 1100 स्वेअर फुटाचे दुकान कृपाशंकर यांचा मुलगा नरेंद्रमोहन सिंह यांच्या नावाने आहे. तसेच कृपाशंकर सिंह यांची रत्नागिरी मधील जागा आणि जोनपुरमधील प्रॉपर्टीही जप्त करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 7, 2012 04:44 PM IST

कृपांच्या पुत्राचे पनवेलमधील दुकान ताब्यात

07 मार्च

कृपाशंकर सिंह यांच्यावरील कारवाई पोलिसांनी आता आणखी तीव्र केली आहे. मुंबईतल्या मालमत्ता जप्त केल्यानंतर आता पोलिसांनी पनवेलमधील कृपाशंकर सिंह यांचा मुलगा नरेंद्र मोहन याच्या नावावरील एक दुकान ताब्यात घेतलं आहे. उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा जास्त संपत्ती बाळगल्याच्या प्रकरणात हायकोर्टाच्या आदेशावरुन कृपाशंकर सिंह यांच्यावर कारवाई सुरु आहे. यांसदर्भात याचिकाकर्ते संजय तिवारी यांना दाखल केलेल्या याचिकेत या मालमत्तेचा उल्लेख करण्यात आला आहे. 1100 स्वेअर फुटाचे दुकान कृपाशंकर यांचा मुलगा नरेंद्रमोहन सिंह यांच्या नावाने आहे. तसेच कृपाशंकर सिंह यांची रत्नागिरी मधील जागा आणि जोनपुरमधील प्रॉपर्टीही जप्त करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 7, 2012 04:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close