S M L

राहुल द्रविडचा क्रिकेटला अलविदा

09 मार्चभारताचा 'द वॉल' राहुल द्रविडनं क्रिकेटला अलविदा केला आहे. आज बंगळुरुमध्ये पत्रकार परिषदेत राहुल द्रविडने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. याआधीच त्यानं वन डे आणि टी-20 क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली होती. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात राहुल द्रविडची कामगिरी चांगली झाली नव्हती. भारतीय टीमला तर व्हाईटवॉश मिळालाच. शिवाय द्रविडने स्वत: 8 इनिंगमध्ये 194 रन्स केलेत. त्याचा ऍव्हरेज 24 रन्सचा होता. शिवाय सीरिजमध्ये द्रविड रेकॉर्ड सहावेळा क्लीनबोल्ड झाला. त्याच्या आणि एकूणच सीनिअर खेळाडूंच्या कामगिरीवर सगळीकडून टीकेची झोड उठली होती. पण ऑस्ट्रेलियाचा दौरा वगळता द्रविड भारतीय टीमचा प्रमुख आधारस्तंभ राहिला. टेस्ट करिअरच्या 15 वर्षात द्रविडनं देशात आणि परदेशात भारताला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिलेत. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स करणार्‍या बॅट्समनच्या यादीत सचिननंतर द्रविड हा दुसर्‍या क्रमांकावरचा बॅट्समन आहे. वन डे क्रिकेटमध्येही त्याच्या नावावर 10 हजाराहून अधिक रन्स आहेत. याशिवाय टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक 210 कॅचचा वर्ल्ड रेकॉर्डही त्याच्याच नावावर आहे. सचिन तेंडुलकर, व्ही व्ही एस लक्ष्मण आणि राहुल द्रविड या भारताच्या त्रिमुर्तीमधून द्रविड आता निवृत्त झाला आहे. 'द वॉल'ची कारकीर्द द वॉल राहुल द्रविडनं 1996 मध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आणि गेल्या 15 वर्षात त्यानं भारताला देशात आणि परदेशात भारताला अनेक विजय मिळवून दिले. टेस्ट क्रिकेटमध्ये द्रविड 164 खेळलाय आणि यात 52 च्या ऍव्हरेजनं त्याच्या नावावर 13 हजार 288 रन्स जमा आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स करणार्‍या बॅट्समनच्या यादीत सचिन तेंडुलकरनंतर द्रविड हा दुसरा बॅट्समन आहे. द्रविडच्या नावावर 36 सेंच्युरीही जमा आहेत. पाकिस्तानविरुध्द त्यानं 270 रन्सची सर्वाधिक खेळी केली होती. याशिवाय वन डे क्रिकेटमध्येही द्रविडने 10 हजार रन्सचा टप्पा पार केला आहे. 344 वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 10 हजार 889 रन्स जमा आहेत. यात 12 सेंच्युरीचाही समावेश आहे.कॅप्टन राहुल द्रविडराहुल द्रविड... भारतीय टीमचा द वॉल, भारतीय टीममध्ये तिसर्‍या क्रमांकावर सर्वाधिक यशस्वी बॅट्समन जशी त्याची कामगिरी होती तितकीच भारतीय टीमचा कॅप्टन म्हणूनही तो यशस्वी ठरला. 2005 मध्ये भारतीय टेस्ट टीमच्या कॅप्टनपदाची धूरा राहुल द्रविडवर सोपवण्यात आली. द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय टीनं 25 टेस्ट मॅच खेळली आणि यातल्या 8 मॅचमध्ये भारतीय टीम विजयी ठरली, तर 6 मॅचमध्ये पराभव पत्करावा लागला. 11 मॅच ड्रॉ राहिल्या. द्रविडच्या नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकण्याची कमाल करुन दाखवली.राहुल सारखा दुसरा बॅट्समन होणं नाही - सचिन तेंडुलकरमास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि द्रविड जवळ जवळ वीस वर्षं एकत्र क्रिकेट खेळले. त्यामुळे द्रविड निवृत्त झाल्यावर भारतीय टीममधून पहिली प्रतिक्रिया आली ती सचिनचीच, ''क्रिकेटच्या पिचवर द्रविड सोबत मी खूप चांगला काळ घालवलाय. त्याच्याबरोबर मी अनेक सेंच्युरी पार्टनरशिप केल्यात. जो खेळाडू 164 टेस्ट मॅच खेळलाय, 13 हजारपेक्षा जास्त रन्स केलेत, अशा खेळाडूबद्दल मी वेगळं काय बोलणार? याक्षणी मी इतकंच म्हणू शकतो की, राहुल द्रविड सारखा दुसरा बॅट्समन होणं नाही. ड्रेसिंग रुममध्ये आणि मैदानावरही त्याची उणीव मला भासेल.' - सचिन तेंडुलकरराहुल द्रविडला मिळालेल्या पुरस्कार1998 - अर्जुन ऍवॉर्ड2000 - विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर2004 - आयसीसी (ICC) टेस्ट प्लेअर ऑफ द इयर2004 - आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर2004 - पद्मश्री पुरस्कार2006 - कॅप्टन ऑफ द आयसीसी टेस्ट टीम2011 - पॉली उम्रीगर ऍवॉर्ड

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 9, 2012 08:27 AM IST

राहुल द्रविडचा क्रिकेटला अलविदा

09 मार्च

भारताचा 'द वॉल' राहुल द्रविडनं क्रिकेटला अलविदा केला आहे. आज बंगळुरुमध्ये पत्रकार परिषदेत राहुल द्रविडने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. याआधीच त्यानं वन डे आणि टी-20 क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली होती. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात राहुल द्रविडची कामगिरी चांगली झाली नव्हती. भारतीय टीमला तर व्हाईटवॉश मिळालाच. शिवाय द्रविडने स्वत: 8 इनिंगमध्ये 194 रन्स केलेत. त्याचा ऍव्हरेज 24 रन्सचा होता. शिवाय सीरिजमध्ये द्रविड रेकॉर्ड सहावेळा क्लीनबोल्ड झाला. त्याच्या आणि एकूणच सीनिअर खेळाडूंच्या कामगिरीवर सगळीकडून टीकेची झोड उठली होती.

पण ऑस्ट्रेलियाचा दौरा वगळता द्रविड भारतीय टीमचा प्रमुख आधारस्तंभ राहिला. टेस्ट करिअरच्या 15 वर्षात द्रविडनं देशात आणि परदेशात भारताला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिलेत. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स करणार्‍या बॅट्समनच्या यादीत सचिननंतर द्रविड हा दुसर्‍या क्रमांकावरचा बॅट्समन आहे. वन डे क्रिकेटमध्येही त्याच्या नावावर 10 हजाराहून अधिक रन्स आहेत. याशिवाय टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक 210 कॅचचा वर्ल्ड रेकॉर्डही त्याच्याच नावावर आहे. सचिन तेंडुलकर, व्ही व्ही एस लक्ष्मण आणि राहुल द्रविड या भारताच्या त्रिमुर्तीमधून द्रविड आता निवृत्त झाला आहे.

'द वॉल'ची कारकीर्द

द वॉल राहुल द्रविडनं 1996 मध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आणि गेल्या 15 वर्षात त्यानं भारताला देशात आणि परदेशात भारताला अनेक विजय मिळवून दिले. टेस्ट क्रिकेटमध्ये द्रविड 164 खेळलाय आणि यात 52 च्या ऍव्हरेजनं त्याच्या नावावर 13 हजार 288 रन्स जमा आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स करणार्‍या बॅट्समनच्या यादीत सचिन तेंडुलकरनंतर द्रविड हा दुसरा बॅट्समन आहे. द्रविडच्या नावावर 36 सेंच्युरीही जमा आहेत. पाकिस्तानविरुध्द त्यानं 270 रन्सची सर्वाधिक खेळी केली होती. याशिवाय वन डे क्रिकेटमध्येही द्रविडने 10 हजार रन्सचा टप्पा पार केला आहे. 344 वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 10 हजार 889 रन्स जमा आहेत. यात 12 सेंच्युरीचाही समावेश आहे.

कॅप्टन राहुल द्रविड

राहुल द्रविड... भारतीय टीमचा द वॉल, भारतीय टीममध्ये तिसर्‍या क्रमांकावर सर्वाधिक यशस्वी बॅट्समन जशी त्याची कामगिरी होती तितकीच भारतीय टीमचा कॅप्टन म्हणूनही तो यशस्वी ठरला. 2005 मध्ये भारतीय टेस्ट टीमच्या कॅप्टनपदाची धूरा राहुल द्रविडवर सोपवण्यात आली. द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय टीनं 25 टेस्ट मॅच खेळली आणि यातल्या 8 मॅचमध्ये भारतीय टीम विजयी ठरली, तर 6 मॅचमध्ये पराभव पत्करावा लागला. 11 मॅच ड्रॉ राहिल्या. द्रविडच्या नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकण्याची कमाल करुन दाखवली.राहुल सारखा दुसरा बॅट्समन होणं नाही - सचिन तेंडुलकर

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि द्रविड जवळ जवळ वीस वर्षं एकत्र क्रिकेट खेळले. त्यामुळे द्रविड निवृत्त झाल्यावर भारतीय टीममधून पहिली प्रतिक्रिया आली ती सचिनचीच, ''क्रिकेटच्या पिचवर द्रविड सोबत मी खूप चांगला काळ घालवलाय. त्याच्याबरोबर मी अनेक सेंच्युरी पार्टनरशिप केल्यात. जो खेळाडू 164 टेस्ट मॅच खेळलाय, 13 हजारपेक्षा जास्त रन्स केलेत, अशा खेळाडूबद्दल मी वेगळं काय बोलणार? याक्षणी मी इतकंच म्हणू शकतो की, राहुल द्रविड सारखा दुसरा बॅट्समन होणं नाही. ड्रेसिंग रुममध्ये आणि मैदानावरही त्याची उणीव मला भासेल.' - सचिन तेंडुलकर

राहुल द्रविडला मिळालेल्या पुरस्कार

1998 - अर्जुन ऍवॉर्ड2000 - विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर2004 - आयसीसी (ICC) टेस्ट प्लेअर ऑफ द इयर2004 - आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर2004 - पद्मश्री पुरस्कार2006 - कॅप्टन ऑफ द आयसीसी टेस्ट टीम2011 - पॉली उम्रीगर ऍवॉर्ड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 9, 2012 08:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close