S M L

गिडवाणींची काँग्रेसमधून हकालपट्टी

07 मार्चआदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणातील आरोपी माजी आमदार कन्हैयालाल गिडवाणी यांची काँग्रेसने पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यांना कायमस्वरुपी निलंबित केल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली आहे. आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणातील आरोपी माजी आमदार गिडवाणी आणि त्यांच्या मुलावर आदर्श प्रकरणात कडक कारवाई होऊ नये, यासाठी कोट्यवधी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. कन्हैय्यालाल गिडवाणी...माजी आमदार आणि भ्रष्टाचाराचा आदर्श ठरलेल्या आदर्श सोसायटीचे को प्रमोटर. दिवसेंदिवस आदर्शप्रकरण गंभीर होत असताना हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न गिडवाणी यांनी चालवला होता. याप्ररणी जग्यासी या टॅक्स कन्सल्टंटला अटक करण्यातआली. पण त्यांचा याप्रकरणाशी संबंध नसल्याचा दावा जग्यासी यांच्या वकिलानं केला. जिग्यासी याला अटक झाल्यानंतर सीबीआयचे वकील मंदार गोस्वामी यांनी जग्यासीच्या माध्यमातून गिडवाणींकडून पैसै घेतल्याचं उघड झालं. आणि गोस्वामीसह गिडवाणी आणि त्यांच्या मुलालाही पोलिसांनी अटक केली. या सगळ्यांना 16 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. पण गिडवाणींकडे एवढे पैसे आले कुठून अशी चर्चाही आता रंगली आहे. आदर्शप्रकरणात अनेक मोठ्या नेते आणि अधिकार्‍यांची नावं अडकली असताना हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणार्‍या गिडवाणींकडे एवढे पैसे आले कुठून हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरीतच राहतो. पण गिडवाणींच्या या कृत्याची दखल घेत काँग्रेस बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 7, 2012 05:25 PM IST

गिडवाणींची काँग्रेसमधून हकालपट्टी

07 मार्च

आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणातील आरोपी माजी आमदार कन्हैयालाल गिडवाणी यांची काँग्रेसने पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यांना कायमस्वरुपी निलंबित केल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली आहे. आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणातील आरोपी माजी आमदार गिडवाणी आणि त्यांच्या मुलावर आदर्श प्रकरणात कडक कारवाई होऊ नये, यासाठी कोट्यवधी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.

कन्हैय्यालाल गिडवाणी...माजी आमदार आणि भ्रष्टाचाराचा आदर्श ठरलेल्या आदर्श सोसायटीचे को प्रमोटर. दिवसेंदिवस आदर्शप्रकरण गंभीर होत असताना हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न गिडवाणी यांनी चालवला होता. याप्ररणी जग्यासी या टॅक्स कन्सल्टंटला अटक करण्यातआली. पण त्यांचा याप्रकरणाशी संबंध नसल्याचा दावा जग्यासी यांच्या वकिलानं केला. जिग्यासी याला अटक झाल्यानंतर सीबीआयचे वकील मंदार गोस्वामी यांनी जग्यासीच्या माध्यमातून गिडवाणींकडून पैसै घेतल्याचं उघड झालं. आणि गोस्वामीसह गिडवाणी आणि त्यांच्या मुलालाही पोलिसांनी अटक केली. या सगळ्यांना 16 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. पण गिडवाणींकडे एवढे पैसे आले कुठून अशी चर्चाही आता रंगली आहे.

आदर्शप्रकरणात अनेक मोठ्या नेते आणि अधिकार्‍यांची नावं अडकली असताना हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणार्‍या गिडवाणींकडे एवढे पैसे आले कुठून हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरीतच राहतो. पण गिडवाणींच्या या कृत्याची दखल घेत काँग्रेस बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 7, 2012 05:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close