S M L

जॉन अब्राहमला जामीन ; जेलची 'हवा'टळली

09 मार्चबॉलिवूडचा 'देसी बॉय' जॉन अब्राहम याला 15 दिवसांची शिक्षा कायम ठेवली आहे. जॉनला ताब्यात घ्यावे असे आदेश देण्यात आले होते मात्र जॉनला संध्याकाळी हायकोर्टाकडून जामीन मिळाला आहे. 20 हजार रुपयाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. हायकोर्टानं सेशन कोर्टाच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. 2006 मध्ये जॉन अब्राहमने खार भागात भरधाव मोटरसायकल चालवत दोन जणांना धडक दिली होती. या अपघातात दोन तरुण जखमी झाले होते. या प्रकरणी जॉन अब्राहमच्या निकालावर फेरविचार करण्याची याचिका सेशन्स कोर्टानं फेटाळली आहे. त्यामुळे बेपर्वा गाडी चालवून दोन जणांना जखमी केल्याप्रकरणी अभिनेता जॉन अब्राहमला ताब्यात घेण्याचे आदेश कोर्टानं दिले आहे. सेशन्स कोर्टाने ऑक्टोंबर 2010 मध्ये याप्रकरणी जॉनला 15 दिवसांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेच्या विरोधात जॉनने न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र आज कोर्टाने याचिका फेटाळून लावली आणि शिक्षा कायम ठेवली. या निर्णायाविरोधात जॉनने हायकोर्टात धाव घेतली तिथे त्याला कोर्टाने दिलासा देत जामीन मंजूर केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 9, 2012 10:17 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 9, 2012 10:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close