S M L

दीपक मानकरांना उपमहापौरपदासाठी उमेदवारी

09 मार्चपुणेकरांना आज दुहेरी धक्का बसला. एकीकडे कॉमनवेल्थ घोटाळ्यातील आरोपी सुरेश कलमाडी यांनी जाहीर केलं की ते 2014 सालची लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. तर दुसरीकडे वादग्रस्त नगरसेवक दीपक मानकर यांना काँग्रेसने उपमहापौरपदासाठी उमेदवारी दिली. सुरेश कलमाडी.. आणि दीपक मानकर.. एका नाण्याच्या दोन बाजू..नाण्याच्या दोन्ही बाजूंचा शिक्का एकच.. वादग्रस्त पार्श्वभूमी. एक कोट्यवधी रुपयांच्या कॉमनवेल्थ घोटाळ्यातला आरोपी.. तर दुसर्‍यावर विनयभंग आणि शस्त्राने हल्ला करण्यासारखे 7 आरोप. मानकरांचं निलंबन रद्द करण्याची घाई प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी केली असा आरोप विरोधकांनी केला. आता मानकरांना उपमहापौरपदाच्या उमेदवारीचा मान दिल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. दुसरीकडे कलमाडी हे सध्या काँग्रेसमधून निलंबित आहेत. तिहार तुरुंगाची हवा खाऊन आल्यानंतर आता त्यांनी पुन्हा पुणे शहरातून 2014 सालची लोकसभा निवडणूक लढवण्याचा मनसूबा बोलून दाखवलाय. कलमाडी आणि मानकर यांचं समर्थन करणं काँग्रेसच्या नेत्यांना अडचणीचं ठरतंय.कलमाडी आणि मानकर या दोघांनाही पुणेकरांनीच निवडून दिलं आहे. त्यामुळे आता त्यांना हाती मोठी पदं मिळाली, तर पुणेकरांना फारसा धक्का बसू नये.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 9, 2012 05:26 PM IST

दीपक मानकरांना उपमहापौरपदासाठी उमेदवारी

09 मार्च

पुणेकरांना आज दुहेरी धक्का बसला. एकीकडे कॉमनवेल्थ घोटाळ्यातील आरोपी सुरेश कलमाडी यांनी जाहीर केलं की ते 2014 सालची लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. तर दुसरीकडे वादग्रस्त नगरसेवक दीपक मानकर यांना काँग्रेसने उपमहापौरपदासाठी उमेदवारी दिली.

सुरेश कलमाडी.. आणि दीपक मानकर.. एका नाण्याच्या दोन बाजू..नाण्याच्या दोन्ही बाजूंचा शिक्का एकच.. वादग्रस्त पार्श्वभूमी. एक कोट्यवधी रुपयांच्या कॉमनवेल्थ घोटाळ्यातला आरोपी.. तर दुसर्‍यावर विनयभंग आणि शस्त्राने हल्ला करण्यासारखे 7 आरोप. मानकरांचं निलंबन रद्द करण्याची घाई प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी केली असा आरोप विरोधकांनी केला. आता मानकरांना उपमहापौरपदाच्या उमेदवारीचा मान दिल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत.

दुसरीकडे कलमाडी हे सध्या काँग्रेसमधून निलंबित आहेत. तिहार तुरुंगाची हवा खाऊन आल्यानंतर आता त्यांनी पुन्हा पुणे शहरातून 2014 सालची लोकसभा निवडणूक लढवण्याचा मनसूबा बोलून दाखवलाय. कलमाडी आणि मानकर यांचं समर्थन करणं काँग्रेसच्या नेत्यांना अडचणीचं ठरतंय.

कलमाडी आणि मानकर या दोघांनाही पुणेकरांनीच निवडून दिलं आहे. त्यामुळे आता त्यांना हाती मोठी पदं मिळाली, तर पुणेकरांना फारसा धक्का बसू नये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 9, 2012 05:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close