S M L

सुरेश जैन यांचे उपोषणाचे 'खुळ' डॉक्टरांनी उतरवले

12 मार्च जळगावमधल्या घरकुल घोटाळ्याने आता राजकीय वळण घेतलंय. शिवसेना आमदार सुरेश जैन यांना अटक झाल्यानंतर आज शिवसेनेनं जळगाव बंद पुकारला होता. तर जैन यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे मंत्री गुलाबराव देवकर यांनाही अटक करा, अशी मागणी पुन्हा शिवसेनेनं केली. आणि या प्रकरणामुळे भाजप आणि शिवसेनेमध्येही जुंपली. दरम्यान, अटकेच्या निषेधासाठी सुरेश जैन यांनी तुरुंगातच उपोषण सुरू केलं होतं. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांनी ते सोडलं.जळगाव बंद.. शिवसेनेच्या आमदाराला घोटाळ्यात अटक झाली.. म्हणून जळगावकरांचे हाल. शिवसेनेचे जळगांवमधील आमदार सुरेश जैन यांना घरकुल घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली. त्याविरोधात एकीकडे जैनांनी जेलमध्येच उपोषण सुरू केलंय. तर दुसरीकडे शिवसेनेनं जळगाव बंद पुकारला. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असला. तरी सर्वसामान्य जळगांवकर वैतागले. जळगाव शहराप्रमाणेच.. अंमळनेर, भुसावळमध्ये बंदचे पडसाद उमटले. हा घोटाळा झाला, तेव्हा राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर नगराध्यक्ष होते. त्यामुळे त्यांनाही अटक करा, त्यांचा बचाव करू नका अशी मागणी पुन्हा शिवसेनेनं केली. या अटकेमागे राजकीय षडयंत्र आहे अशी टीकाही त्यांनी केली.तर गुलाबराव देवकरांच्या अटकेची मागणी राजकीय हेतूने होतेय असा उलटा आरोप गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी केला.जैन यांच्यावर आरोप होते, हे सगळ्यांना माहीत होतं. अगदी शिवसेनेच्या नेत्यांनाही असा घरचा आहेर एकनाथ खडसेंनी नाव न घेता शिवसेनेला दिला. घरकुल घोटाळा हा केवळ 29 कोटींचा असला तरी त्याचे राजकीय परिणाम मात्र मोठे होतील आणि इतरही काही मोठे नेते अडकतील, अशी शक्यता दिसतेय. काय आहे घरकुल योजना ?- 110 कोटींची महत्त्वाकांक्षी योजना- गरीबांना हक्काचं घर देण्यासाठी योजना- 11,424 घरांची योजना- 1997मध्ये 9 ठिकाणी राबवले प्रकल्प- 7,500 घरांचं वाटप- उर्वरित घरांचं बांधकाम अपूर्णसुरेश जैन यांचा या घोटाळ्याशी काय संबंध ?- बेकायदेशीरपणे खान्देश बिल्डरला दिली ऍडव्हान्स रक्कम- सुरेश जैन यांच्या अधिपत्याखालच्या नगरपालिकेनं दिला ऍडव्हान्स- खान्देश बिल्डरचं ऑफिसही सुरेश जैन यांच्या घरात- थोडक्यात, पैसे देणारे आणि घेणारेही जैन यांचे निकटवर्तीय- घोटाळा झाला तेव्हा सुरेश जैन होते राष्ट्रवादीत

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 12, 2012 10:51 AM IST

सुरेश जैन यांचे उपोषणाचे 'खुळ' डॉक्टरांनी उतरवले

12 मार्च

जळगावमधल्या घरकुल घोटाळ्याने आता राजकीय वळण घेतलंय. शिवसेना आमदार सुरेश जैन यांना अटक झाल्यानंतर आज शिवसेनेनं जळगाव बंद पुकारला होता. तर जैन यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे मंत्री गुलाबराव देवकर यांनाही अटक करा, अशी मागणी पुन्हा शिवसेनेनं केली. आणि या प्रकरणामुळे भाजप आणि शिवसेनेमध्येही जुंपली. दरम्यान, अटकेच्या निषेधासाठी सुरेश जैन यांनी तुरुंगातच उपोषण सुरू केलं होतं. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांनी ते सोडलं.

जळगाव बंद.. शिवसेनेच्या आमदाराला घोटाळ्यात अटक झाली.. म्हणून जळगावकरांचे हाल. शिवसेनेचे जळगांवमधील आमदार सुरेश जैन यांना घरकुल घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली. त्याविरोधात एकीकडे जैनांनी जेलमध्येच उपोषण सुरू केलंय. तर दुसरीकडे शिवसेनेनं जळगाव बंद पुकारला. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असला. तरी सर्वसामान्य जळगांवकर वैतागले.

जळगाव शहराप्रमाणेच.. अंमळनेर, भुसावळमध्ये बंदचे पडसाद उमटले. हा घोटाळा झाला, तेव्हा राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर नगराध्यक्ष होते. त्यामुळे त्यांनाही अटक करा, त्यांचा बचाव करू नका अशी मागणी पुन्हा शिवसेनेनं केली. या अटकेमागे राजकीय षडयंत्र आहे अशी टीकाही त्यांनी केली.तर गुलाबराव देवकरांच्या अटकेची मागणी राजकीय हेतूने होतेय असा उलटा आरोप गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी केला.जैन यांच्यावर आरोप होते, हे सगळ्यांना माहीत होतं. अगदी शिवसेनेच्या नेत्यांनाही असा घरचा आहेर एकनाथ खडसेंनी नाव न घेता शिवसेनेला दिला. घरकुल घोटाळा हा केवळ 29 कोटींचा असला तरी त्याचे राजकीय परिणाम मात्र मोठे होतील आणि इतरही काही मोठे नेते अडकतील, अशी शक्यता दिसतेय.

काय आहे घरकुल योजना ?

- 110 कोटींची महत्त्वाकांक्षी योजना- गरीबांना हक्काचं घर देण्यासाठी योजना- 11,424 घरांची योजना- 1997मध्ये 9 ठिकाणी राबवले प्रकल्प- 7,500 घरांचं वाटप- उर्वरित घरांचं बांधकाम अपूर्ण

सुरेश जैन यांचा या घोटाळ्याशी काय संबंध ?- बेकायदेशीरपणे खान्देश बिल्डरला दिली ऍडव्हान्स रक्कम- सुरेश जैन यांच्या अधिपत्याखालच्या नगरपालिकेनं दिला ऍडव्हान्स- खान्देश बिल्डरचं ऑफिसही सुरेश जैन यांच्या घरात- थोडक्यात, पैसे देणारे आणि घेणारेही जैन यांचे निकटवर्तीय- घोटाळा झाला तेव्हा सुरेश जैन होते राष्ट्रवादीत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 12, 2012 10:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close