S M L

साई संस्थान बरखास्त करा : कोर्ट

13 मार्चशिर्डी संस्थान बरखास्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. भाजपचे शिर्डी शहर अध्यक्ष राजेंद्र भाऊसाहेब गोंदकर, आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप कुलकर्णी यांनी 2011 मध्ये जनहित याचिका दाखल केली होती. शिर्डी समितीच्या विश्वस्त समितीची मुदत संपूनही कामकाज सुरु आहे. त्यामुळे नव्या समिती स्थापन करण्याची मागणी त्यांनी या याचिकेद्वारे केली होती. या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठाने हे आदेश दिले आहे. विश्वस्त समिती बरखास्त करुन 15 दिवसाच्या आत नवी समिती स्थापन करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. नव्या निवडणुका होईपर्यंत जिल्हाधिकारी आणि जिल्हा न्यायाधीश समितीचे काम पाहणार असही कोर्टाने म्हटलं आहे. तर राज्य सरकारने नव्या समितीच्या नियुक्तीसाठी 3 महिन्यांची मुदत मागितली होती. पण औरंगाबाद खंडपीठाने ही विनंती फेटाळून लावली. सरकारने या प्रकरणी अनास्था दाखवली असे ताशेरेदेखील कोर्टाने मारले.साई संस्थानची संपत्ती - एकूण गुंतवणूक - 529 कोटी- एफ.डी.(राष्ट्रीयकृत बँका) - 466 कोटी- किसान विकासपत्र - 40.84 कोटी- सरकारी बाँड - 22 कोटी- सोनं आणि चांदी - 28 कोटी- मौल्यवान खडे - 4 कोटी

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 13, 2012 09:27 AM IST

साई संस्थान बरखास्त करा : कोर्ट

13 मार्च

शिर्डी संस्थान बरखास्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. भाजपचे शिर्डी शहर अध्यक्ष राजेंद्र भाऊसाहेब गोंदकर, आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप कुलकर्णी यांनी 2011 मध्ये जनहित याचिका दाखल केली होती. शिर्डी समितीच्या विश्वस्त समितीची मुदत संपूनही कामकाज सुरु आहे. त्यामुळे नव्या समिती स्थापन करण्याची मागणी त्यांनी या याचिकेद्वारे केली होती. या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठाने हे आदेश दिले आहे. विश्वस्त समिती बरखास्त करुन 15 दिवसाच्या आत नवी समिती स्थापन करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. नव्या निवडणुका होईपर्यंत जिल्हाधिकारी आणि जिल्हा न्यायाधीश समितीचे काम पाहणार असही कोर्टाने म्हटलं आहे. तर राज्य सरकारने नव्या समितीच्या नियुक्तीसाठी 3 महिन्यांची मुदत मागितली होती. पण औरंगाबाद खंडपीठाने ही विनंती फेटाळून लावली. सरकारने या प्रकरणी अनास्था दाखवली असे ताशेरेदेखील कोर्टाने मारले.

साई संस्थानची संपत्ती

- एकूण गुंतवणूक - 529 कोटी- एफ.डी.(राष्ट्रीयकृत बँका) - 466 कोटी- किसान विकासपत्र - 40.84 कोटी- सरकारी बाँड - 22 कोटी- सोनं आणि चांदी - 28 कोटी- मौल्यवान खडे - 4 कोटी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 13, 2012 09:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close