S M L

सरकारची सत्वपरीक्षा !

12 मार्चसंसदेचं बजेट अधिवेशन आजपासून सुरू झालं. आणि त्याचबरोबर दिल्लीत तिसर्‍या आघाडाची आणि मध्यावधी निवडणुकांचीही चर्चा सुरू झाली आहे. अधिवेशनात सरकारची कोंडी करण्यासाठी भाजप आणि डाव्यांनी रणनीती तयार केलीय. नुकत्याच संपलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये अपयश आल्याने काँग्रेस बॅकफूटवर आहे. त्यामुळेच समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षांशी चर्चेचे प्रयत्न काँग्रेसनं सुरू केले आहेत. यंदाचे बजेट अधिवेशन हे सरकारसाठी सत्वपरीक्षा ठरणार आहे.उत्तर प्रदेशातल्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवलेला समाजवादी पक्ष आणि डावे एकत्र येण्याची चिन्हं आहेत. त्यातच म्हणूनच शरद पवार एनडीएतल्या प्रकाशसिंग बादल यांच्या शपथविधीला उपस्थित होणार आहेत. त्यामुळे यूपीए सरकार काळजीत सापडलं आहे. म्हणूनच बजेट अधिवेशन सुरू होण्याआधी पंतप्रधानांनी स्पष्ट केलं की त्यांच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे.बजेट अधिवेशनात आपली कसोटी लागणार असल्याची जाणीव युपीए सरकारला आहे. अनेक महत्त्वाची विधेयक सरकारला मंजूर करून घ्यायची आहेत. म्हणूनच काँग्रेस समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तृणमूलबद्दल शंका असल्याने कोणताही धोका पत्करण्याची सरकारची तयारी नाही. म्हणूनच सुधारणात्मक विधेयकांवर जपून पावलं टाकण्याचं धोरण सरकारनं स्वीकारलं आहे. दरम्यान, अनेक मुद्द्यांवर सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी भाजपने केली आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर बरीचशी समीकरणं बदलली आहेत. मध्यावधी निवडणुकीची शक्यता कमी असली, मोठा भाऊ अशा काँग्रेसच्या स्थानाला विधानसभा निवडणुकांनंतर धक्का बसला आहे. त्यामुळेच यूपीए सरकारवरचा दबाव आणखी वाढला आहे. तर मध्यावधी निवडणुका अटळ आहेत, असा दावा भाजपनं केला आहे. पण, एनडीएचे नेते नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांनी ही शक्यता फेटाळून लावली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 12, 2012 04:22 PM IST

सरकारची सत्वपरीक्षा !

12 मार्च

संसदेचं बजेट अधिवेशन आजपासून सुरू झालं. आणि त्याचबरोबर दिल्लीत तिसर्‍या आघाडाची आणि मध्यावधी निवडणुकांचीही चर्चा सुरू झाली आहे. अधिवेशनात सरकारची कोंडी करण्यासाठी भाजप आणि डाव्यांनी रणनीती तयार केलीय. नुकत्याच संपलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये अपयश आल्याने काँग्रेस बॅकफूटवर आहे. त्यामुळेच समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षांशी चर्चेचे प्रयत्न काँग्रेसनं सुरू केले आहेत. यंदाचे बजेट अधिवेशन हे सरकारसाठी सत्वपरीक्षा ठरणार आहे.

उत्तर प्रदेशातल्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवलेला समाजवादी पक्ष आणि डावे एकत्र येण्याची चिन्हं आहेत. त्यातच म्हणूनच शरद पवार एनडीएतल्या प्रकाशसिंग बादल यांच्या शपथविधीला उपस्थित होणार आहेत. त्यामुळे यूपीए सरकार काळजीत सापडलं आहे. म्हणूनच बजेट अधिवेशन सुरू होण्याआधी पंतप्रधानांनी स्पष्ट केलं की त्यांच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे.

बजेट अधिवेशनात आपली कसोटी लागणार असल्याची जाणीव युपीए सरकारला आहे. अनेक महत्त्वाची विधेयक सरकारला मंजूर करून घ्यायची आहेत. म्हणूनच काँग्रेस समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तृणमूलबद्दल शंका असल्याने कोणताही धोका पत्करण्याची सरकारची तयारी नाही. म्हणूनच सुधारणात्मक विधेयकांवर जपून पावलं टाकण्याचं धोरण सरकारनं स्वीकारलं आहे.

दरम्यान, अनेक मुद्द्यांवर सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी भाजपने केली आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर बरीचशी समीकरणं बदलली आहेत. मध्यावधी निवडणुकीची शक्यता कमी असली, मोठा भाऊ अशा काँग्रेसच्या स्थानाला विधानसभा निवडणुकांनंतर धक्का बसला आहे. त्यामुळेच यूपीए सरकारवरचा दबाव आणखी वाढला आहे. तर मध्यावधी निवडणुका अटळ आहेत, असा दावा भाजपनं केला आहे. पण, एनडीएचे नेते नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांनी ही शक्यता फेटाळून लावली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 12, 2012 04:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close