S M L

28 नोव्हेंबरला होत आहे महिला फेडरेशनची निवडणूक

22 नोव्हेंबर मुंबईशिल्पा गाडलोकसभेच्या निवडणुका कधी जाहीर होतात याच्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे . पण त्याही आधी लोकसभेच्या निवडणुकीसारखी निवडणूक मुंबईत होत आहे. आणि हि निवडणूक आहे, महिला मंडळांच्या फेडरेशनची निवडणूक.नावनोंदणीची लगबग...पोस्टर... घोषणा... ही सगळी तयारी सुरू आहे. या निवडणुकीचा उद्देशही तितकाच स्वागतार्ह आहे.आम्ही ही निवडणूक घ्यायचं ठरवलं ते महिलांना या लोकशाही प्रक्रियेकडे गांभीर्यानं बघावं म्हणून असं कोरी संघटनेच्या सचिव सुजाता खांडेकर सांगतात.निवडणूक प्रक्रियेविषयी त्या सांगतात या निवडणुकीची तयारी करताना आम्ही महिलांचं वर्कशॉप घेतलं त्यांना सांगितलं की निवडणूक कशी लढवावी, कशा चांगल्या प्रकारे लढवावी.या निवडणुकीचा आवाकाही मोठा आहे जवळपास चेंबूर पट्ट्यातली साडेतीनशे मंडळं यात सहभागी होणार आहेत. 28 नोव्हेंबरला 9 मतदार संघात ही निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीत 71 उमेदवार रिंगणात आहेत. इथे उभे रहाणारे उमेदवार हे तळागाळात काम करणारे आहेत. ही निवडणूक हा नवीन प्रयोग आहे राजकारणाकडे सकारात्मकदृष्टीनं पहाण्याचा.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 22, 2008 01:26 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2008 01:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close