S M L

रेल्वेचा प्रवास महागणार ?

13 मार्चरेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी उद्या आपलं पहिला रेल्वे बजेट लोकसभेत सादर करणार आहेत. या बजेटमध्ये रेल्वेच्या प्रवासी भाड्यात वाढ केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काही उपकर आणि सरचार्ज लावला जाण्याची शक्यता आहे. पण त्याला भाडेवाढ म्हटलं जाणार नाही. सॅम पित्रोदा आणि काकोडकर समितीने रेल्वेसंदर्भात केलेल्या शिफारशींचा विचारही रेल्वे बजेटमध्ये केला जाणार आहे. काही नव्या ट्रेन्सची घोषणाही होऊ शकते. आधुनिकीकरण, पायाभूत सुविधा, मालवाहतुकीत वाढ, अशा गोष्टींवर भर दिलं जाण्याची शक्यता आहे. रेल्वेचं बजेट बुधवारी लोकसभेत सादर होणार पण भारतीय रेल्वेपुढे सध्या अनेक समस्या आहेत. अनेक आव्हानं आहेत. रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी या आव्हानांचा आणि लोकांच्या अपेक्षांचा सामना कसा करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.अपघातांचं वाढतं प्रमाण, तुडुंब गर्दी, वारंवार खचणारे ट्रॅक्स..जगातील सर्वात मोठं नेटवर्क असणार्‍या भारतीय रेल्वेपुढच्या संकटांची ही न संपणारी मालिका. त्याचं ओझं घेऊनच दिनेश त्रिवेदी बुधवारी आपला पहिला रेल्वे बजेट सादर करणार आहेत.गेल्या बजेटमध्ये ममता बॅनजीर्ंनी केलेल्या अनेक घोषणा कागदावरच राहिल्यात.- 132 नव्या रेल्वे सुरू करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं. त्यांपैकी फेब्रुवारी 2012 पर्यंत 115 नव्या ट्रेन्स सुरू झाल्यात- 1 हजार 75 किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग बनवण्याचं आश्वासनही पूर्ण झालं नाही. पायाभूत सुविधांसाठी अकराशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी केवळ 15 टक्के रक्कम गेल्या नोव्हेंबरपर्यंत खर्च झाली. निधी खर्च करण्याचा वेग पाहता सध्याच्या प्रस्तावित प्रकल्प मार्गी लागण्यासाठी 15 वर्षं लागणार आहेत.रेल्वे अपघातांचं प्रमाणही मोठं आहे. 90 टक्के रेल्वे अपघात कर्मचार्‍यांवरच्या कामाच्या ताणामुळे होतात. रेल्वेसुरक्षा विभागात येणार्‍या ग्रुप सी आणि डी च्या 1 लाख 75 हजार कर्मचार्‍यांची कमतरता आहे. पण, अनेक कारणांमुळे रेल्वेभर्ती रखडलेलीच आहे. रेल्वेतल्या ढिसाळ कारभारावर कॅगने आणि संसदेच्या स्थायी समितीने कडक ताशेरे ओढले होते.2010-11 च्या अहवालात कॅगनं म्हटलंय. - रेल्वे स्टाफसाठी चांगल्या आणि आधुनिक प्रशिक्षण सुविधेची गरज आहे- कालबाह्य झालेले लोकोमोटीव्ह, ट्रॅक्स आणि ब्रिजेसची देखभाल यांच्याकडे रेल्वे प्रशासनाचं दुर्लक्ष झालंय- अनेक नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं उद्दिष्ट अपूर्ण राहिलंयदेशातली अनेक रेल्वे स्टेशन्स वर्ल्ड क्लास करण्याची ममता बॅनर्जांची घोषणाही पोकळ ठरली. ठाणे स्टेशनचंच उदाहरण पाहिलं तर याची कल्पना येईल. राजकीय गणितांचा विचार करूनच रेल्वे मंत्रालयाकडे पाहिलं जातं. पश्चिम बंगालमध्ये मतांचं समीकरण बिघडू नये यासाठी गेल्या वर्षी प्रवासीभाड्यात वाढ झालेली नाही. पण आता मात्र कोणतीही मोठी निवडणूक नाही. ममता बॅनजीर्ंनी गेली दोन वर्षं पश्चिम बंगालकडेच लक्ष दिल्यानं. रेलभवन दुर्लक्षित राहिलं. रेल्वे अपघातांची संख्या, रेल्वेचा तोटा वाढत गेला. पण त्यावर ठोस उपाययोजना झाल्याच नाहीत. त्यामुळेच संकटात सापडलेल्या या रेल्वेला ट्रॅकवर आणण्याचं मोठं आव्हान दिनेश त्रिवेदी यांच्यापुढे आहे. घोषणा 'ट्रॅक'वर कधी येणार?- ममता बॅनजीर्ंनी 132 नव्या रेल्वेंची घोषणा केली होती- फेब्रुवारी 2012 पर्यंत 115 नव्या ट्रेन्स सुरू- 1 हजार 75 किमी लांबीच्या रेल्वेमार्गाचं आश्वासन अपूर्ण - पायाभूत सुविधांसाठी 11,00 कोटींची तरतूद - फक्त 15 टक्के रक्कम गेल्या नोव्हेंबरपर्यंत खर्च रेल्वेवर कॅगचे ताशेरे- रेल्वे स्टाफसाठी चांगल्या, आधुनिक प्रशिक्षण सुविधेची गरज - कालबाह्य लोकोमोटीव्ह, ट्रॅक्स, ब्रिजेसच्या देखभालीकडे दुर्लक्ष - अनेक नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं उद्दिष्ट अपूर्ण

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 13, 2012 05:47 PM IST

रेल्वेचा प्रवास महागणार ?

13 मार्च

रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी उद्या आपलं पहिला रेल्वे बजेट लोकसभेत सादर करणार आहेत. या बजेटमध्ये रेल्वेच्या प्रवासी भाड्यात वाढ केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काही उपकर आणि सरचार्ज लावला जाण्याची शक्यता आहे. पण त्याला भाडेवाढ म्हटलं जाणार नाही. सॅम पित्रोदा आणि काकोडकर समितीने रेल्वेसंदर्भात केलेल्या शिफारशींचा विचारही रेल्वे बजेटमध्ये केला जाणार आहे. काही नव्या ट्रेन्सची घोषणाही होऊ शकते. आधुनिकीकरण, पायाभूत सुविधा, मालवाहतुकीत वाढ, अशा गोष्टींवर भर दिलं जाण्याची शक्यता आहे.

रेल्वेचं बजेट बुधवारी लोकसभेत सादर होणार पण भारतीय रेल्वेपुढे सध्या अनेक समस्या आहेत. अनेक आव्हानं आहेत. रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी या आव्हानांचा आणि लोकांच्या अपेक्षांचा सामना कसा करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

अपघातांचं वाढतं प्रमाण, तुडुंब गर्दी, वारंवार खचणारे ट्रॅक्स..जगातील सर्वात मोठं नेटवर्क असणार्‍या भारतीय रेल्वेपुढच्या संकटांची ही न संपणारी मालिका. त्याचं ओझं घेऊनच दिनेश त्रिवेदी बुधवारी आपला पहिला रेल्वे बजेट सादर करणार आहेत.गेल्या बजेटमध्ये ममता बॅनजीर्ंनी केलेल्या अनेक घोषणा कागदावरच राहिल्यात.- 132 नव्या रेल्वे सुरू करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं. त्यांपैकी फेब्रुवारी 2012 पर्यंत 115 नव्या ट्रेन्स सुरू झाल्यात- 1 हजार 75 किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग बनवण्याचं आश्वासनही पूर्ण झालं नाही. पायाभूत सुविधांसाठी अकराशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी केवळ 15 टक्के रक्कम गेल्या नोव्हेंबरपर्यंत खर्च झाली. निधी खर्च करण्याचा वेग पाहता सध्याच्या प्रस्तावित प्रकल्प मार्गी लागण्यासाठी 15 वर्षं लागणार आहेत.रेल्वे अपघातांचं प्रमाणही मोठं आहे. 90 टक्के रेल्वे अपघात कर्मचार्‍यांवरच्या कामाच्या ताणामुळे होतात. रेल्वेसुरक्षा विभागात येणार्‍या ग्रुप सी आणि डी च्या 1 लाख 75 हजार कर्मचार्‍यांची कमतरता आहे. पण, अनेक कारणांमुळे रेल्वेभर्ती रखडलेलीच आहे. रेल्वेतल्या ढिसाळ कारभारावर कॅगने आणि संसदेच्या स्थायी समितीने कडक ताशेरे ओढले होते.2010-11 च्या अहवालात कॅगनं म्हटलंय.

- रेल्वे स्टाफसाठी चांगल्या आणि आधुनिक प्रशिक्षण सुविधेची गरज आहे- कालबाह्य झालेले लोकोमोटीव्ह, ट्रॅक्स आणि ब्रिजेसची देखभाल यांच्याकडे रेल्वे प्रशासनाचं दुर्लक्ष झालंय- अनेक नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं उद्दिष्ट अपूर्ण राहिलंय

देशातली अनेक रेल्वे स्टेशन्स वर्ल्ड क्लास करण्याची ममता बॅनर्जांची घोषणाही पोकळ ठरली. ठाणे स्टेशनचंच उदाहरण पाहिलं तर याची कल्पना येईल. राजकीय गणितांचा विचार करूनच रेल्वे मंत्रालयाकडे पाहिलं जातं. पश्चिम बंगालमध्ये मतांचं समीकरण बिघडू नये यासाठी गेल्या वर्षी प्रवासीभाड्यात वाढ झालेली नाही. पण आता मात्र कोणतीही मोठी निवडणूक नाही. ममता बॅनजीर्ंनी गेली दोन वर्षं पश्चिम बंगालकडेच लक्ष दिल्यानं. रेलभवन दुर्लक्षित राहिलं. रेल्वे अपघातांची संख्या, रेल्वेचा तोटा वाढत गेला. पण त्यावर ठोस उपाययोजना झाल्याच नाहीत. त्यामुळेच संकटात सापडलेल्या या रेल्वेला ट्रॅकवर आणण्याचं मोठं आव्हान दिनेश त्रिवेदी यांच्यापुढे आहे. घोषणा 'ट्रॅक'वर कधी येणार?- ममता बॅनजीर्ंनी 132 नव्या रेल्वेंची घोषणा केली होती- फेब्रुवारी 2012 पर्यंत 115 नव्या ट्रेन्स सुरू- 1 हजार 75 किमी लांबीच्या रेल्वेमार्गाचं आश्वासन अपूर्ण - पायाभूत सुविधांसाठी 11,00 कोटींची तरतूद - फक्त 15 टक्के रक्कम गेल्या नोव्हेंबरपर्यंत खर्च रेल्वेवर कॅगचे ताशेरे- रेल्वे स्टाफसाठी चांगल्या, आधुनिक प्रशिक्षण सुविधेची गरज - कालबाह्य लोकोमोटीव्ह, ट्रॅक्स, ब्रिजेसच्या देखभालीकडे दुर्लक्ष - अनेक नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं उद्दिष्ट अपूर्ण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 13, 2012 05:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close