S M L

हायकोर्टाच्या आदेशामुळे 'पर्वती' वाचली

14 मार्चपुण्यामध्ये पर्वती या डोंगरावर 100 टक्के टीडीआर देण्याचा पुणे महापालिकेचा निर्णय हायकोर्टाने रद्दबातल ठरवला आहे. पुण्याच्या पर्वतीच्या काही भागावर उद्यानाचे आरक्षण होते ही जागा ताब्यात घेण्याच्या बदल्यात नियमानुसार चार टक्के टीडीआर मुळ जागामालकाला देणे बंधनकारक होते. पण तत्कालीन महापालिका आयुक्त संजय कुमार यांनी 100 टक्के टीडीआर मंजूर केला. या निर्णयाच्या विरोधात तत्कालिन नगरसेवक वंदना चव्हाण, शिवा मंत्री आणि श्याम मानकर या नगरसेवकांनी तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार यांच्या कडे दाद मागीतली. तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी संजय कुमार यांची बदली केली. शिंदे यांनी या निर्णयाला स्थगितीही दिली. या जागेचे मुळे मालक तपोवर्धन राऊत हे हायकोर्टात गेले. राउत यांची याचिका हायकोर्टाने फेटाळल्याने ते सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण हायकोर्टाकडे पाठवले पण हायकोर्टाने आपला निर्णय ठेवला. या जागेसंदर्भात फक्त चार टक्के टीआर द्या असे निर्देशही हायकोर्टाने दिले आहे. या जमिनीची मुळ मालकी तपोवर्धन राऊत यांची असली तरी त्यांची पावर ऑफ ऍटर्नी प्रख्यात बिल्डर अविनाश भोसले यांच्याकडे आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 14, 2012 05:05 PM IST

हायकोर्टाच्या आदेशामुळे 'पर्वती' वाचली

14 मार्च

पुण्यामध्ये पर्वती या डोंगरावर 100 टक्के टीडीआर देण्याचा पुणे महापालिकेचा निर्णय हायकोर्टाने रद्दबातल ठरवला आहे. पुण्याच्या पर्वतीच्या काही भागावर उद्यानाचे आरक्षण होते ही जागा ताब्यात घेण्याच्या बदल्यात नियमानुसार चार टक्के टीडीआर मुळ जागामालकाला देणे बंधनकारक होते. पण तत्कालीन महापालिका आयुक्त संजय कुमार यांनी 100 टक्के टीडीआर मंजूर केला. या निर्णयाच्या विरोधात तत्कालिन नगरसेवक वंदना चव्हाण, शिवा मंत्री आणि श्याम मानकर या नगरसेवकांनी तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार यांच्या कडे दाद मागीतली. तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी संजय कुमार यांची बदली केली. शिंदे यांनी या निर्णयाला स्थगितीही दिली. या जागेचे मुळे मालक तपोवर्धन राऊत हे हायकोर्टात गेले. राउत यांची याचिका हायकोर्टाने फेटाळल्याने ते सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण हायकोर्टाकडे पाठवले पण हायकोर्टाने आपला निर्णय ठेवला. या जागेसंदर्भात फक्त चार टक्के टीआर द्या असे निर्देशही हायकोर्टाने दिले आहे. या जमिनीची मुळ मालकी तपोवर्धन राऊत यांची असली तरी त्यांची पावर ऑफ ऍटर्नी प्रख्यात बिल्डर अविनाश भोसले यांच्याकडे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 14, 2012 05:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close