S M L

शिवस्मारकासाठी केंद्राकडे पाठपुरावा झालाच नाही - मुख्यमंत्री

15 मार्चछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या मुळ प्रस्तावाला केंद्रीय पर्यावरण खात्याने परवानगी नाकारली नाही. पण मधल्या काळात राज्य सरकारकडून केंद्राकडे योग्य पाठपुरावा झाला नाही. त्यामुळे हा प्रस्ताव मागे पडला अशी कबुली मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत दिली. त्यामुळे सरकारमधले मतभेद उघड झाले आहेत. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता स्मारकासाठी नव्या जागेचा शोध घेतला आहे, असंही स्पष्ट केलं होतं. अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाला राज्याच्या पर्यावरण खात्याने परवानगी नाकारली. संबंधीत फाईलही बंद केली. अशा वेळी केंद्रीय पर्यावरण खातं कशी परवानगी देईल असा सवाल, विरोधकांनी सरकारला आज सभागृहात विचारला. त्यावर सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरून जोरदार घोषणाबाजी झाली. अखेर या प्रकरणी दोन दिवसात राज्य सरकारने भुमिका स्पष्ट करावी असे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे. विधान परिषदेत उद्या या प्रकरणावर चर्चा होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 15, 2012 01:14 PM IST

शिवस्मारकासाठी केंद्राकडे पाठपुरावा झालाच नाही - मुख्यमंत्री

15 मार्च

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या मुळ प्रस्तावाला केंद्रीय पर्यावरण खात्याने परवानगी नाकारली नाही. पण मधल्या काळात राज्य सरकारकडून केंद्राकडे योग्य पाठपुरावा झाला नाही. त्यामुळे हा प्रस्ताव मागे पडला अशी कबुली मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत दिली. त्यामुळे सरकारमधले मतभेद उघड झाले आहेत. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता स्मारकासाठी नव्या जागेचा शोध घेतला आहे, असंही स्पष्ट केलं होतं. अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाला राज्याच्या पर्यावरण खात्याने परवानगी नाकारली. संबंधीत फाईलही बंद केली. अशा वेळी केंद्रीय पर्यावरण खातं कशी परवानगी देईल असा सवाल, विरोधकांनी सरकारला आज सभागृहात विचारला. त्यावर सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरून जोरदार घोषणाबाजी झाली. अखेर या प्रकरणी दोन दिवसात राज्य सरकारने भुमिका स्पष्ट करावी असे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे. विधान परिषदेत उद्या या प्रकरणावर चर्चा होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2012 01:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close