S M L

भारताचा पाकवर 'विराट' विजय

१८ मार्च मिरपूर वनडेत विराट कोहलीच्या शानदार १८३ रन्सच्या खेळीने भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. भारताने पाकवर ६ विकेट राखून विजयाची गुढी रोवली आहे. आशियाई कप स्पर्धेत शेर-ए-बांगला स्टेडियमवर पाकने भारताला दिलेले ३३० धावांचे अवघड आव्हान ४ विकेट गमावून ४७.५ ओव्हरमध्ये पार केलं.रोहित शर्माने ६८ रन्स बनवले. तर विराटने आपल्या क्रिकेट करिअरमधील ११ वे शतक झळकाविले आहेत. सचिनच्या महाशतकानंतर बांगलादेशकडून मिळालेला पराभव महाशतकाला गालबोट लावून गेले. आणि नेहमी खेळात कट्टर शत्रू असलेल्या पाकिस्तान सोबत शेर-ए-बांगला स्टेडियमवर आमने-सामने झाली. पाकने टॅास जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. सुरवात जोरदार करत सलामीला आलेल्या मोहम्मद हफीजने १०५,जमशेदने ११२ आणि पूर्व कर्णधार युनिस खानने ५२ रन्स केले. या बळावर पाकने ५० ओव्हरमध्ये ३२९ रन्स केले. ३३० धावांचे अवघड लक्षाचा पाठलाग करत सलामीला आलेल्या गौतम गंभीर आणि सचिन तेंडुलकरने सावध सुरवात केली. पण पहिल्याच ओव्हरच्या दुसऱ्या बॅालवर गंभीर एलबीडब्लू आऊट झाला. तेंव्हा भारताचे खातेही उघडले नव्हते. दुसऱ्या विकेटसाठी सचिन आणि विराटने १३३ रन्स खात्यात जमा केले. सचिन एक सिक्स आणि पाच चौकर लगावत ५२ रन्सवर आऊट झाला. विराट कोहलीने इनिग सावरत आपल्या करिअर मधील ११ वे शतक झळकावात १४८ बॅाल्समध्ये २२ फोर आणि १ सिक्स लगावत दमदार १८३ रन्स केले. तर रोहित शर्माने ८३ बॅाल्समध्ये ६८ रन्स केलेत. विराटच्या आऊट झाल्यानंतर रैना आणि कर्णधार महेंद्रसिंग धोणीने विजयाची औपचारिक्त पूर्ण केली. रैना १२ रन्स तर धोणी ४ रन्स करुन नाबाद राहिले.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 18, 2012 04:53 PM IST

भारताचा पाकवर  'विराट' विजय

१८ मार्च

मिरपूर वनडेत विराट कोहलीच्या शानदार १८३ रन्सच्या खेळीने भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. भारताने पाकवर ६ विकेट राखून विजयाची गुढी रोवली आहे. आशियाई कप स्पर्धेत शेर-ए-बांगला स्टेडियमवर पाकने भारताला दिलेले ३३० धावांचे अवघड आव्हान ४ विकेट गमावून ४७.५ ओव्हरमध्ये पार केलं.रोहित शर्माने ६८ रन्स बनवले. तर विराटने आपल्या क्रिकेट करिअरमधील ११ वे शतक झळकाविले आहेत.

सचिनच्या महाशतकानंतर बांगलादेशकडून मिळालेला पराभव महाशतकाला गालबोट लावून गेले. आणि नेहमी खेळात कट्टर शत्रू असलेल्या पाकिस्तान सोबत शेर-ए-बांगला स्टेडियमवर आमने-सामने झाली. पाकने टॅास जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. सुरवात जोरदार करत सलामीला आलेल्या मोहम्मद हफीजने १०५,जमशेदने ११२ आणि पूर्व कर्णधार युनिस खानने ५२ रन्स केले. या बळावर पाकने ५० ओव्हरमध्ये ३२९ रन्स केले. ३३० धावांचे अवघड लक्षाचा पाठलाग करत सलामीला आलेल्या गौतम गंभीर आणि सचिन तेंडुलकरने सावध सुरवात केली. पण पहिल्याच ओव्हरच्या दुसऱ्या बॅालवर गंभीर एलबीडब्लू आऊट झाला. तेंव्हा भारताचे खातेही उघडले नव्हते. दुसऱ्या विकेटसाठी सचिन आणि विराटने १३३ रन्स खात्यात जमा केले. सचिन एक सिक्स आणि पाच चौकर लगावत ५२ रन्सवर आऊट झाला. विराट कोहलीने इनिग सावरत आपल्या करिअर मधील ११ वे शतक झळकावात १४८ बॅाल्समध्ये २२ फोर आणि १ सिक्स लगावत दमदार १८३ रन्स केले. तर रोहित शर्माने ८३ बॅाल्समध्ये ६८ रन्स केलेत. विराटच्या आऊट झाल्यानंतर रैना आणि कर्णधार महेंद्रसिंग धोणीने विजयाची औपचारिक्त पूर्ण केली. रैना १२ रन्स तर धोणी ४ रन्स करुन नाबाद राहिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 18, 2012 04:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close