S M L

आदर्श प्रकरणी 4 जणांना अटक

20 मार्चआदर्श घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वर्षभरानंतर सीबीआयने कारवाईला सुरुवात केली. याप्रकरणी सीबीआयने कन्हैयालाल गिडवाणी यांच्यासह आदर्शच्या चार सदस्यांना अटक केली. सीबीआयने 14 जणांवर गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे इतर 10 जणांना कधी अटक होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आदर्श प्रकरणात अनेक जनहित याचिका दाखल झाल्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर 29 जानेवारी 2011 रोजी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. आता वर्षभरानंतर सीबीआयने कारवाईला सुरुवात केली. सीबीआयने याप्रकरणी चार जणंना अटक केली. त्यात आदर्श सोसायटीचे प्रवर्तक आर. सी. ठाकूर, नगरविकास विभागाचे तत्कालीन उपसचिव पी. व्ही. देशमुख, सोसायटीचे अध्यक्ष एम. एम. वांच्छू आणि सहप्रवर्तक कन्हैयालाल गिडवानी यांचा समावेश आहे.सकाळी सहा वाजता सोसायटीचे अध्यक्ष एम. एम.वांच्छू आणि सेक्रेटरी आर.सी.ठाकूर यांना सीबीआयच्या तन्ना हाऊस इथल्या कार्यालयात बोलावण्यात आलं. दुपारी त्यांनी अटक करण्यात आली. तिसरे आरोपी पी. व्ही. देशमुख यांना पुण्यातून अटक करण्यात आली. पी. व्ही. देशमुख यांच्या अटकेनंतर मंत्रालयात खळबळ माजली. आदर्श प्रकरणात मंत्रालयाशी संबंधित देशमुख हे महत्त्वाचे आरोपी आहेत. त्यामुळे देशमुख यांनी अटक म्हणजे मंत्रालयातल्या अधिकार्‍यांसाठी एक धक्का आहे. सीबीआयचे इकडं अटकसत्र सुरू असतानाच सेशन्स कोर्टाने आदर्शसंबंधी लाचखोरीप्रकरणी कन्हैय्यालाल गिडवानी आणि त्याच्या मुलासह चार जणांना जामीन मंजूर केला. पण जामीन मिळाल्यानंतर लगेचच सीबीआयने आदर्श घोटाळ्याप्रकरणी गिडवानी यांनी पुन्हा अटक केली. या सर्व आरोपींना बुधवारी सीबीआयच्या विशेष कोर्टात हजर केलं जाणार आहे.आदर्शप्रकरणात सीबीआयने 14 जणांना आरोपी बनवलं होतं. त्यापैकी 4 जणांना झालेली ही पहिलीच अटक आहे. अजून मोठे मासे बाहेरच आहेत. ते कधी गळाला लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 20, 2012 09:22 AM IST

आदर्श प्रकरणी 4 जणांना अटक

20 मार्च

आदर्श घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वर्षभरानंतर सीबीआयने कारवाईला सुरुवात केली. याप्रकरणी सीबीआयने कन्हैयालाल गिडवाणी यांच्यासह आदर्शच्या चार सदस्यांना अटक केली. सीबीआयने 14 जणांवर गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे इतर 10 जणांना कधी अटक होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आदर्श प्रकरणात अनेक जनहित याचिका दाखल झाल्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर 29 जानेवारी 2011 रोजी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. आता वर्षभरानंतर सीबीआयने कारवाईला सुरुवात केली. सीबीआयने याप्रकरणी चार जणंना अटक केली. त्यात आदर्श सोसायटीचे प्रवर्तक आर. सी. ठाकूर, नगरविकास विभागाचे तत्कालीन उपसचिव पी. व्ही. देशमुख, सोसायटीचे अध्यक्ष एम. एम. वांच्छू आणि सहप्रवर्तक कन्हैयालाल गिडवानी यांचा समावेश आहे.सकाळी सहा वाजता सोसायटीचे अध्यक्ष एम. एम.वांच्छू आणि सेक्रेटरी आर.सी.ठाकूर यांना सीबीआयच्या तन्ना हाऊस इथल्या कार्यालयात बोलावण्यात आलं. दुपारी त्यांनी अटक करण्यात आली. तिसरे आरोपी पी. व्ही. देशमुख यांना पुण्यातून अटक करण्यात आली.

पी. व्ही. देशमुख यांच्या अटकेनंतर मंत्रालयात खळबळ माजली. आदर्श प्रकरणात मंत्रालयाशी संबंधित देशमुख हे महत्त्वाचे आरोपी आहेत. त्यामुळे देशमुख यांनी अटक म्हणजे मंत्रालयातल्या अधिकार्‍यांसाठी एक धक्का आहे.

सीबीआयचे इकडं अटकसत्र सुरू असतानाच सेशन्स कोर्टाने आदर्शसंबंधी लाचखोरीप्रकरणी कन्हैय्यालाल गिडवानी आणि त्याच्या मुलासह चार जणांना जामीन मंजूर केला. पण जामीन मिळाल्यानंतर लगेचच सीबीआयने आदर्श घोटाळ्याप्रकरणी गिडवानी यांनी पुन्हा अटक केली. या सर्व आरोपींना बुधवारी सीबीआयच्या विशेष कोर्टात हजर केलं जाणार आहे.

आदर्शप्रकरणात सीबीआयने 14 जणांना आरोपी बनवलं होतं. त्यापैकी 4 जणांना झालेली ही पहिलीच अटक आहे. अजून मोठे मासे बाहेरच आहेत. ते कधी गळाला लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2012 09:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close