S M L

मुंबईचे पाणी महागले

20 मार्चदेशाचे आर्थिक बजेट सादर होऊन मुंबईकरांची महिन्याच्या हिशेबाची बेरीज-वजाबाकी पूर्ण होत नाही तोच मुंबईकरांचा खिसा खाली झाला आहे. आज मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. आयुक्तांनी स्थायी समितीकडे 2012-13 साठी 26 हजार 581 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. गेल्या वर्षींपेक्षा 26 टक्याने अर्थसंकल्पात वाढ झाली आहे. पाणी पट्टीमध्ये वाढ करण्यात आली आहे. घरगुती वापरासाठी 1 हजार लिटरमागे 1.25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर हौसिंग सोसायटी साठी दर 1 हाजर लिटरमागे 50 पैसे वाढवण्यात आले आहे. तर दुसरीकडे व्यावसायिकांवरही पाणी फिरवले आहे. यापुढे व्यावसासिक वापरासाठी दर वर्गीकरूण करुन वाटले आहे. यामध्ये बिगर व्यावसायिक संस्थेसाठी दर 1 हजार लिटरला 3.50 रुपयांची ,संस्थांसाठी दर 1 हजार लिटरला 12 रुपये, उद्योग आणि कारखाने यासाठी दर 1 हजारे लिटरला 15 रुपये, तारांकीत हॉटेलसाठी दर 1 हजार लिटरमागे 22 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या प्रस्तावित वाढीमुळे 313.40 कोटी रुपये महसूल वाढेल. सध्या 816.41 कोटी रुपये महसूल मिळतो. प्रस्तावित वाढीमुळे 1129.81 महसूल मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 20, 2012 05:39 PM IST

मुंबईचे पाणी महागले

20 मार्च

देशाचे आर्थिक बजेट सादर होऊन मुंबईकरांची महिन्याच्या हिशेबाची बेरीज-वजाबाकी पूर्ण होत नाही तोच मुंबईकरांचा खिसा खाली झाला आहे. आज मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. आयुक्तांनी स्थायी समितीकडे 2012-13 साठी 26 हजार 581 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. गेल्या वर्षींपेक्षा 26 टक्याने अर्थसंकल्पात वाढ झाली आहे. पाणी पट्टीमध्ये वाढ करण्यात आली आहे. घरगुती वापरासाठी 1 हजार लिटरमागे 1.25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर हौसिंग सोसायटी साठी दर 1 हाजर लिटरमागे 50 पैसे वाढवण्यात आले आहे.

तर दुसरीकडे व्यावसायिकांवरही पाणी फिरवले आहे. यापुढे व्यावसासिक वापरासाठी दर वर्गीकरूण करुन वाटले आहे. यामध्ये बिगर व्यावसायिक संस्थेसाठी दर 1 हजार लिटरला 3.50 रुपयांची ,संस्थांसाठी दर 1 हजार लिटरला 12 रुपये, उद्योग आणि कारखाने यासाठी दर 1 हजारे लिटरला 15 रुपये, तारांकीत हॉटेलसाठी दर 1 हजार लिटरमागे 22 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या प्रस्तावित वाढीमुळे 313.40 कोटी रुपये महसूल वाढेल. सध्या 816.41 कोटी रुपये महसूल मिळतो. प्रस्तावित वाढीमुळे 1129.81 महसूल मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2012 05:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close