S M L

मावळ गोळीबार प्रकरणी कोणाला अटक का केली नाही:कोर्ट

21 मार्चमावळ गोळीबार प्रकरण हायकोर्टाने आज राज्य सरकारला चांगलेच फटकारले. गोळीबाराआधी जिल्हाधिकार्‍यांना का विचारले नाही, असा सवाल कोर्टाने केला. तसेच या प्रकरणात अजूनपर्यंत एकालाही अटक का नाही अशी विचारणाही कोर्टाने केली. या प्रकरणात सरकारने येत्या 27 तारखेपर्यंत आपलं मत मांडण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. 9 ऑगस्ट 2011 ला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर बऊर गावात हा गोळीबार झाला होता. पवना धरणातून पिंपरी चिंचवडसाठी सोडल्या जाणार्‍या पाण्याला या गावातल्या शेतकर्‍यांचा विरोध होता. त्यावरून हे आंदोलन पेटलं होतं. आता इतके दिवस होऊनही या प्रकरणी कोणालाही अटक का केली नाही असा सवाल आता हायकोर्टाने विचारला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 21, 2012 10:12 AM IST

मावळ गोळीबार प्रकरणी कोणाला अटक का केली नाही:कोर्ट

21 मार्च

मावळ गोळीबार प्रकरण हायकोर्टाने आज राज्य सरकारला चांगलेच फटकारले. गोळीबाराआधी जिल्हाधिकार्‍यांना का विचारले नाही, असा सवाल कोर्टाने केला. तसेच या प्रकरणात अजूनपर्यंत एकालाही अटक का नाही अशी विचारणाही कोर्टाने केली. या प्रकरणात सरकारने येत्या 27 तारखेपर्यंत आपलं मत मांडण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. 9 ऑगस्ट 2011 ला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर बऊर गावात हा गोळीबार झाला होता. पवना धरणातून पिंपरी चिंचवडसाठी सोडल्या जाणार्‍या पाण्याला या गावातल्या शेतकर्‍यांचा विरोध होता. त्यावरून हे आंदोलन पेटलं होतं. आता इतके दिवस होऊनही या प्रकरणी कोणालाही अटक का केली नाही असा सवाल आता हायकोर्टाने विचारला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 21, 2012 10:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close