S M L

जि.प.अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची काँग्रेसला धोबीपछाड

21 मार्चजिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलीच बिघाडी झाली आहे. आघाडीचं बहुमत असतानाही राष्ट्रवादीने अध्यक्षपदासाठी काँग्रेसला बाजूला सारून विरोधकांशी हातमिळवणी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या यवतमाळ जिल्हापरिषदेत राष्ट्रवादीने शिवसेनेशी हातमिळवणी करीत आपला अध्यक्ष निवडून आणला. अमरावतीत देखिल राष्ट्रवादीने शिवसेनेला सोबत घेऊन आपला अध्यक्ष निवडून आणला. चंद्रपूर आणि गडचिरोली मध्ये सुध्दा भाजपला बरोबर घेऊन सत्ता मिळवलीय. नागपुरमध्ये देखिल भाजप आणि शिवसेनेच्या पाठिंब्यावर आपला उपाध्यक्ष निवडून आणला. एवढं कमी की काय म्हणून काँग्रेसला एनवेळी दगाफटका करून राष्ट्रवादीने नगर जिल्हापरिषदेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष स्वताचे मिळवले. तेथे उपाध्यक्ष बनलेल्या मोनिका रांजळे यांनी आपलेच नातेवाईक सत्यजित तांबेचा पराभव केला. राष्ट्रवादीच्या या दगाफटक्यामुळे काँग्रेसचे नेते संतप्त झाले आहेत. खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आता केंद्रीय स्तरावर हा मुद्दा लावून धरणार आहेत. मुख्यमंत्री म्हणतात, जिल्हा परिषद निवडणूक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सोबत जायचं असं ठरलं असताना राष्ट्रवादीनं घेतलेली भूमिका दुर्देवी..नागपूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या मदतीनं भाजपनं बाजी मारली आहे. भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाली आणि आणखी एक नवं राजकीय समीकरण पहायला मिळालं. नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सध्या गोतमारे यांची अध्यक्षपदी निवड झाली. तर राष्ट्रवादीच्या वाट्याला उपाध्यक्षपद आलंय. राष्ट्रवादीचे चंद्रशेखर चिखले यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. तर अमरावती जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीच्या सुरेखा ठाकरे अध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत. काँग्रेसच्या ज्योती आरेकर यांचा त्यांनी पराभव केला. सर्वाधिक सदस्य असूनही अमरावती जिल्हा परिषदेत काँग्रेस सत्तेबाहेर आहे. सुरेखा ठाकरे यांनी ज्योती आरेकर यांचा 2 मतांनी पराभव केला. राष्ट्रवादी- सेना -भाजप- बसपा - प्रहार अशी युती अमरावतीत पहायला मिळाली. नागपूरमधील पक्षीय बलाबल भाजप - 22काँग्रेस - 19राष्ट्रवादी - 7शिवसेना - 8आरपीआय - 1बसप - 1इतर - 1एकूण - 59

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 21, 2012 11:53 AM IST

जि.प.अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची काँग्रेसला धोबीपछाड

21 मार्च

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलीच बिघाडी झाली आहे. आघाडीचं बहुमत असतानाही राष्ट्रवादीने अध्यक्षपदासाठी काँग्रेसला बाजूला सारून विरोधकांशी हातमिळवणी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या यवतमाळ जिल्हापरिषदेत राष्ट्रवादीने शिवसेनेशी हातमिळवणी करीत आपला अध्यक्ष निवडून आणला. अमरावतीत देखिल राष्ट्रवादीने शिवसेनेला सोबत घेऊन आपला अध्यक्ष निवडून आणला. चंद्रपूर आणि गडचिरोली मध्ये सुध्दा भाजपला बरोबर घेऊन सत्ता मिळवलीय.

नागपुरमध्ये देखिल भाजप आणि शिवसेनेच्या पाठिंब्यावर आपला उपाध्यक्ष निवडून आणला. एवढं कमी की काय म्हणून काँग्रेसला एनवेळी दगाफटका करून राष्ट्रवादीने नगर जिल्हापरिषदेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष स्वताचे मिळवले. तेथे उपाध्यक्ष बनलेल्या मोनिका रांजळे यांनी आपलेच नातेवाईक सत्यजित तांबेचा पराभव केला. राष्ट्रवादीच्या या दगाफटक्यामुळे काँग्रेसचे नेते संतप्त झाले आहेत.

खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आता केंद्रीय स्तरावर हा मुद्दा लावून धरणार आहेत. मुख्यमंत्री म्हणतात, जिल्हा परिषद निवडणूक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सोबत जायचं असं ठरलं असताना राष्ट्रवादीनं घेतलेली भूमिका दुर्देवी..

नागपूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या मदतीनं भाजपनं बाजी मारली आहे. भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाली आणि आणखी एक नवं राजकीय समीकरण पहायला मिळालं. नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सध्या गोतमारे यांची अध्यक्षपदी निवड झाली. तर राष्ट्रवादीच्या वाट्याला उपाध्यक्षपद आलंय. राष्ट्रवादीचे चंद्रशेखर चिखले यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.

तर अमरावती जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीच्या सुरेखा ठाकरे अध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत. काँग्रेसच्या ज्योती आरेकर यांचा त्यांनी पराभव केला. सर्वाधिक सदस्य असूनही अमरावती जिल्हा परिषदेत काँग्रेस सत्तेबाहेर आहे. सुरेखा ठाकरे यांनी ज्योती आरेकर यांचा 2 मतांनी पराभव केला. राष्ट्रवादी- सेना -भाजप- बसपा - प्रहार अशी युती अमरावतीत पहायला मिळाली.

नागपूरमधील पक्षीय बलाबल

भाजप - 22काँग्रेस - 19राष्ट्रवादी - 7शिवसेना - 8आरपीआय - 1बसप - 1इतर - 1एकूण - 59

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 21, 2012 11:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close