S M L

नागपूरमध्ये स्टेट बँकेत 37 कोटींचा ईपीएफ घोटाळा उघड

प्रशांत कोरटकर, नागपूर 22 मार्चबँकेत पैसा जमा केली की तो सुरक्षित राहतो असा अनेकांचा समज असतो पण नागपूरमध्ये देशातील अग्रगण्य समजल्या जाणार्‍या स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये कोट्यावधीचा ईपीएफ घोटाळा झाल्याचं उघड झालंय. नागपूरच्या स्टेट बँकेच्या मुख्यशाखेत झालेल्या ईपीफ घोटाळा. जिल्ह्यातील बहुदा सर्वच औद्योगिक भागातील मोठ मोठ्या कंपन्यांच्या कर्मचार्‍यांचे पगार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमार्फत होतात. यातूनच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीफ चा पैसा एकत्र करून डीडी च्या माध्यमातून मुख्यशाखेला पाठवला जातो. आणि त्यानंतर हा पैसा पीएफ साठी त्या त्या कर्मचार्‍याच्या खात्यात जमा होतो. पण नागपूर जिल्ह्यातील 10 बँकेच्या शाखेने पैसे पाठवूनही गेल्या 6 महिन्यांपासून मुख्य शाखेने 37 कोटी रुपयांचा निधी जमाच केला नसल्याच उघड झालंय. ईपीफ विभागाने बँकेला विचारणा केल्यानंतर ही बाब उघडकीला आली. 1 ऑगस्टपासून बँकेने आँन लाईन क्रेडिट देणे सुरू केले असून पे ऑर्डर घेणं बंद केल्यावर ही संबंधीत शाखांकडून डीडी का मागवण्यात आले असाही प्रश्न आता उपस्थित झाला. हा घोटाळा मोठा असण्याचीही भीती आता व्यक्त होतेय. बँकेचे कोणीही अधिकारी यावर प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत. पण कष्ट करुन भविष्याची तरतूद करणार्‍या प्रत्येक कर्मचार्‍याला हा घोटाळा म्हणजे मोठा धक्का आहे. आता दोषी अधिकार्‍यांवर कारवाई होऊन कर्मचार्‍यांचा पैसा परत मिळणार का हा मोठा प्रश्नआहे. आयबीएन लोकमतचा सवालगहाळ झालेल्या 37 कोटींचे डीडी आणि पे आँर्डरचा पत्ता आजवर का लागला नाही ?गेल्या 6 महिन्यांत कुठल्याच अधिकार्‍याला ही बाब लक्षात का आली नाही ?अनेक महत्त्वाचे अधिकारी अनेक वर्षांपासून मुख्य शाखेत एकाच जागी कसे ?

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 22, 2012 10:30 AM IST

नागपूरमध्ये स्टेट बँकेत 37 कोटींचा ईपीएफ घोटाळा उघड

प्रशांत कोरटकर, नागपूर

22 मार्च

बँकेत पैसा जमा केली की तो सुरक्षित राहतो असा अनेकांचा समज असतो पण नागपूरमध्ये देशातील अग्रगण्य समजल्या जाणार्‍या स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये कोट्यावधीचा ईपीएफ घोटाळा झाल्याचं उघड झालंय.

नागपूरच्या स्टेट बँकेच्या मुख्यशाखेत झालेल्या ईपीफ घोटाळा. जिल्ह्यातील बहुदा सर्वच औद्योगिक भागातील मोठ मोठ्या कंपन्यांच्या कर्मचार्‍यांचे पगार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमार्फत होतात. यातूनच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीफ चा पैसा एकत्र करून डीडी च्या माध्यमातून मुख्यशाखेला पाठवला जातो. आणि त्यानंतर हा पैसा पीएफ साठी त्या त्या कर्मचार्‍याच्या खात्यात जमा होतो. पण नागपूर जिल्ह्यातील 10 बँकेच्या शाखेने पैसे पाठवूनही गेल्या 6 महिन्यांपासून मुख्य शाखेने 37 कोटी रुपयांचा निधी जमाच

केला नसल्याच उघड झालंय. ईपीफ विभागाने बँकेला विचारणा केल्यानंतर ही बाब उघडकीला आली. 1 ऑगस्टपासून बँकेने आँन लाईन क्रेडिट देणे सुरू केले असून पे ऑर्डर घेणं बंद केल्यावर ही संबंधीत शाखांकडून डीडी का मागवण्यात आले असाही प्रश्न आता उपस्थित झाला. हा घोटाळा मोठा असण्याचीही भीती आता व्यक्त होतेय.

बँकेचे कोणीही अधिकारी यावर प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत. पण कष्ट करुन भविष्याची तरतूद करणार्‍या प्रत्येक कर्मचार्‍याला हा घोटाळा म्हणजे मोठा धक्का आहे. आता दोषी अधिकार्‍यांवर कारवाई होऊन कर्मचार्‍यांचा पैसा परत मिळणार का हा मोठा प्रश्नआहे. आयबीएन लोकमतचा सवाल

गहाळ झालेल्या 37 कोटींचे डीडी आणि पे आँर्डरचा पत्ता आजवर का लागला नाही ?गेल्या 6 महिन्यांत कुठल्याच अधिकार्‍याला ही बाब लक्षात का आली नाही ?अनेक महत्त्वाचे अधिकारी अनेक वर्षांपासून मुख्य शाखेत एकाच जागी कसे ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2012 10:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close