S M L

क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचे निधन

22 मार्चज्येष्ठ स्वातंत्रसैनिक नागनाथअण्णा नायकवडी यांचं मुंबईतल्या लिलावती हॉस्पीटलमध्ये निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. स्वातंत्रलढ्यानंतर सुराज्य आलं पाहिजे या ध्यासानं नागनाथ अण्णांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातल्या चळवळींमध्ये हिरीरीनं पुढाकार घेतला होता. हुतात्मा सहकारी कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी शेती आणि सहकार क्षेत्रात आदर्श उपक्रम राबवले. नागनाथअण्णांनी एन.डी.पाटील, गणपराव देशमुख या नेत्यांसह अनेक ठिकाणी पाणी परिषदा घेऊन पाणी प्रश्नावर ग्रामीण महाराष्ट्रात रान पेटवलं. राज्य सरकारनं त्यांना 2007 साली महाराष्ट्र भूषण म्हणून गौरवलं. तर भारत सरकारचा त्यांना पद्मभूषण पुरस्कारंनही सन्मानित करण्यात आलं होतं. उद्या सकाळी 9 वाजता नागनाथअण्णांच्या जन्मगावी सांगलीतल्या वाळवा इथं शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गोर्‍या सरकारच्या विरोधात बंड पुकारून क्रांतीसिंह नाना पाटलांच्या सोबत इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडणार्‍या नागनाथअण्णा नायकवडी यांच्या कारकीर्द...स्वातंत्र्याच्या लढ्यापासून ते संयुक्त महाराष्ट्रासह विविध लढ्यात अग्रेसर असणारा नेतृत्व असी महाराष्ट्रला ओळख असणारे व्यक्तीमत्व म्हणजे क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी.. सांगली जिल्ह्यातल्या वाळव्यातल्या एका शेतकरी कुटुंबात 1922 साली त्यांच्या जन्म झाला. इंग्रजांच्या विरोधात देशभरात पसरलेली लाट आणि त्यातून उभ्या राहिलेल्या चळवळीचा साहजिकच अण्णाच्या बालमनावर परीणाम झाला. आणि शालेय जीवनापासूनच स्वातंत्र लढ्यात भाग घ्यायला सुरूवात केली होती. त्यामुळे 1947 साली दहावीतूनच शिक्षण सोडून आण्णा भूमिगत चळवळीत सामिल झाले. लढाऊ चळवळीतील सहभागावर नियंत्रण ठेवण्याच्या दुष्ट हेतूने मोरारजी सरकारने त्यांच्यावर वॉरट काढल्यामुळे भुमिगत राहून त्यांनी आपलं काम सुरू केलं. कर्मवीर भाऊराव पाटलांकडे त्यांच येणं जाणं होतं. दुर्बल घटकांना चांगल शिक्षण मिळावं म्हणून शिक्षण संस्थाही त्यांनी सुरू केल्या आहेत. 1939 साली आपल्या काही साथीदारांच्या मदतीने शिराळा पेट्याच्या अती दुर्गम भागात व्हॉल्टंरी शाळांची सुरूवात केली. एवढच नाही तर किल्लारी भूकंपात अनाथ झालेल्या 111 मुंलांना दत्तक घेऊन त्यांच्या जीवनाला अधार देण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. सुभाष बाबूंच्या विचाराचा प्रभाव त्यांच्यावर मोठा होता त्यामुळे 1942 सालच्या चले जाव आणि करो या मरो या घोषणांनी त्यांच्यामध्ये क्रांतीचा अंगार पेरला. तेंव्हा त्यांनी लढ्यासाठी शस्त्र जमा करण्याचा निर्धार केला. आणि 1943 साली शेणोली जवळ काही सहकार्‍यांच्यामदतीनं त्यांनी स्पेशल ट्रेन लुटली. त्याचबरोबर कोल्हापूरच्या सागाव पोलीस ठाण्यातूनही बंदुका पळवण्यातही त्यांचा सहभाग होता. चळवळी बरोबरच अण्णांचा राजकाराणावरही मोठा प्रभाव होता. यशवंतराव चव्हाणांपासून ते वसंतदादा पाटीलसह महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध होतेच. त्याचबरोबर कांशीरामजी सोबतही वैचारीक बैठक होती. 1957 आणि 1985 असे दोन वेळा वाळवा मतदार संघातून ते विधानसेभेवर निवडून गेले. राजकारणात त्यांनी आपली एकवेगळी छाप निर्माण केली होती. 1985 साली विधानसभेची निवडणूक लढवत असताना त्यांना सिंह निवडणूक चिन्ह म्हणून मिळाले होते. पण अण्णाचे कार्यकर्ते एवढे जंगी होते की, निवडणूक प्रचारात त्यांनी खराखुरा सिंह प्रचाराला आणला होता. एन.डी.पाटील गणपराव देशमुख या नेत्यासह सिनेअभिनेते निळू फुले यांच्या सोबत अनेक ठिकाणी पाणी परिषदा घेऊन त्यांनी पाणी प्रश्नावर ग्रामीण महाराष्ट्रात रान पेटवलं. त्यांच्या कार्याचा गौरव करत राज्य सरकारनंही त्यांना 2007 साली महाराष्ट्र भूषण म्हणून गौरवलं. तर भारत सरकारचा त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं असा हा समाजभिमुख क्रांतिकारी सिंह आज आपल्यातून निघून गेला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 22, 2012 11:53 AM IST

क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचे निधन

22 मार्च

ज्येष्ठ स्वातंत्रसैनिक नागनाथअण्णा नायकवडी यांचं मुंबईतल्या लिलावती हॉस्पीटलमध्ये निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. स्वातंत्रलढ्यानंतर सुराज्य आलं पाहिजे या ध्यासानं नागनाथ अण्णांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातल्या चळवळींमध्ये हिरीरीनं पुढाकार घेतला होता. हुतात्मा सहकारी कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी शेती आणि सहकार क्षेत्रात आदर्श उपक्रम राबवले. नागनाथअण्णांनी एन.डी.पाटील, गणपराव देशमुख या नेत्यांसह अनेक ठिकाणी पाणी परिषदा घेऊन पाणी प्रश्नावर ग्रामीण महाराष्ट्रात रान पेटवलं. राज्य सरकारनं त्यांना 2007 साली महाराष्ट्र भूषण म्हणून गौरवलं. तर भारत सरकारचा त्यांना पद्मभूषण पुरस्कारंनही सन्मानित करण्यात आलं होतं. उद्या सकाळी 9 वाजता नागनाथअण्णांच्या जन्मगावी सांगलीतल्या वाळवा इथं शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गोर्‍या सरकारच्या विरोधात बंड पुकारून क्रांतीसिंह नाना पाटलांच्या सोबत इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडणार्‍या नागनाथअण्णा नायकवडी यांच्या कारकीर्द...

स्वातंत्र्याच्या लढ्यापासून ते संयुक्त महाराष्ट्रासह विविध लढ्यात अग्रेसर असणारा नेतृत्व असी महाराष्ट्रला ओळख असणारे व्यक्तीमत्व म्हणजे क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी.. सांगली जिल्ह्यातल्या वाळव्यातल्या एका शेतकरी कुटुंबात 1922 साली त्यांच्या जन्म झाला. इंग्रजांच्या विरोधात देशभरात पसरलेली लाट आणि त्यातून उभ्या राहिलेल्या चळवळीचा साहजिकच अण्णाच्या बालमनावर परीणाम झाला. आणि शालेय जीवनापासूनच स्वातंत्र लढ्यात भाग घ्यायला सुरूवात केली होती. त्यामुळे 1947 साली दहावीतूनच शिक्षण सोडून आण्णा भूमिगत चळवळीत सामिल झाले. लढाऊ चळवळीतील सहभागावर नियंत्रण ठेवण्याच्या दुष्ट हेतूने मोरारजी सरकारने त्यांच्यावर वॉरट काढल्यामुळे भुमिगत राहून त्यांनी आपलं काम सुरू केलं.

कर्मवीर भाऊराव पाटलांकडे त्यांच येणं जाणं होतं. दुर्बल घटकांना चांगल शिक्षण मिळावं म्हणून शिक्षण संस्थाही त्यांनी सुरू केल्या आहेत. 1939 साली आपल्या काही साथीदारांच्या मदतीने शिराळा पेट्याच्या अती दुर्गम भागात व्हॉल्टंरी शाळांची सुरूवात केली. एवढच नाही तर किल्लारी भूकंपात अनाथ झालेल्या 111 मुंलांना दत्तक घेऊन त्यांच्या जीवनाला अधार देण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. सुभाष बाबूंच्या विचाराचा प्रभाव त्यांच्यावर मोठा होता त्यामुळे 1942 सालच्या चले जाव आणि करो या मरो या घोषणांनी त्यांच्यामध्ये क्रांतीचा अंगार पेरला.

तेंव्हा त्यांनी लढ्यासाठी शस्त्र जमा करण्याचा निर्धार केला. आणि 1943 साली शेणोली जवळ काही सहकार्‍यांच्यामदतीनं त्यांनी स्पेशल ट्रेन लुटली. त्याचबरोबर कोल्हापूरच्या सागाव पोलीस ठाण्यातूनही बंदुका पळवण्यातही त्यांचा सहभाग होता. चळवळी बरोबरच अण्णांचा राजकाराणावरही मोठा प्रभाव होता. यशवंतराव चव्हाणांपासून ते वसंतदादा पाटीलसह महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध होतेच. त्याचबरोबर कांशीरामजी सोबतही वैचारीक बैठक होती. 1957 आणि 1985 असे दोन वेळा वाळवा मतदार संघातून ते विधानसेभेवर निवडून गेले. राजकारणात त्यांनी आपली एकवेगळी छाप निर्माण केली होती. 1985 साली विधानसभेची निवडणूक लढवत असताना त्यांना सिंह निवडणूक चिन्ह म्हणून मिळाले होते. पण अण्णाचे कार्यकर्ते एवढे जंगी होते की, निवडणूक प्रचारात त्यांनी खराखुरा सिंह प्रचाराला आणला होता.

एन.डी.पाटील गणपराव देशमुख या नेत्यासह सिनेअभिनेते निळू फुले यांच्या सोबत अनेक ठिकाणी पाणी परिषदा घेऊन त्यांनी पाणी प्रश्नावर ग्रामीण महाराष्ट्रात रान पेटवलं. त्यांच्या कार्याचा गौरव करत राज्य सरकारनंही त्यांना 2007 साली महाराष्ट्र भूषण म्हणून गौरवलं. तर भारत सरकारचा त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं असा हा समाजभिमुख क्रांतिकारी सिंह आज आपल्यातून निघून गेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2012 11:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close