S M L

कोळसा खाण घोटाळ्याचं वृत्त कॅगनं फेटाळलं

22 मार्चदेशात सध्या एकापेक्षा एक मोठे घोटाळे उघड होत आहे. 2 जी घोटाळ्यानंतर आता कोळसा खाणी घोटाळ्याची बातमी आहे. एका वृत्तपत्राने ही बातमी दिली. लिलाव न करता कोळसा खाणी वाटल्यामुळे सरकारचं तब्बल दहा लाख कोटींचं नुकसान झाल्याचं कॅगच्या अहवालात म्हटलंय. दरम्यान, कॅगनं या वृत्ताचं खंडन केलंय.- कॉमनवेल्स गेम्स घोटाळा - 70 हजार कोटी- 2 G घोटाळा - 1 लाख 76 हजार कोटी- कोळसा खाण वाटप घोटाळा - 10 लाख 70 हजार कोटी?दहा लाख कोटींचा घोटाळा... डोळे विस्फारणारा हा आकडा दिलाय कॅगनं... एका वृत्तपत्राने दिलेल्या या बातमीमुळे देशभरात खळबळ माजलीय. या वृत्तपत्रानुसार... कोळसा खाण वाटप घोटाळा ? 2004 ते 2009 या काळात केंद्र सरकारनं 155 कोळसा खाणींचं वाटप केलं. पण हे वाटप लिलाव पद्धतीनं करण्यात आलं नाही आणि त्यामुळे सरकारचं तब्बल दहा लाख सत्तर हजार कोटींचं नुकसान झालं. या बातमीवरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. कोळसा खाणींचं वाटप लिलाव पद्धतीनं करण्याचा निर्णय सरकारने 2007 सालीच घेतला होता, मग त्याची अंमलबजावणी का झाली नाही, असा सवाल विरोधकांनी विचारला. या मुद्द्यावर पुढच्या आठवड्यात चर्चा करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं. दरम्यान, कोळसा खाण वाटपासंबंधीचं वृत्त दिशाभूल करणारं आहे, असा कॅगनंच म्हटल्याचं पंतप्रधान कार्यालयानं सांगितलंय. याबाबतचा अंतिम अहवाल अजून तयारच झाला नाही, त्यावर काम सुरु असल्याचं कॅगने पंतप्रधान कार्यालयाला कळवलंय. कॅगचा हा अहवाल प्राथमिक स्वरुपाचा असला तरी घोटाळ्यांच्या गर्तेत सापडलेल्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालच्या यूपीएसाठी हा आणखी एक मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 22, 2012 05:16 PM IST

कोळसा खाण घोटाळ्याचं वृत्त कॅगनं फेटाळलं

22 मार्च

देशात सध्या एकापेक्षा एक मोठे घोटाळे उघड होत आहे. 2 जी घोटाळ्यानंतर आता कोळसा खाणी घोटाळ्याची बातमी आहे. एका वृत्तपत्राने ही बातमी दिली. लिलाव न करता कोळसा खाणी वाटल्यामुळे सरकारचं तब्बल दहा लाख कोटींचं नुकसान झाल्याचं कॅगच्या अहवालात म्हटलंय. दरम्यान, कॅगनं या वृत्ताचं खंडन केलंय.- कॉमनवेल्स गेम्स घोटाळा - 70 हजार कोटी- 2 G घोटाळा - 1 लाख 76 हजार कोटी- कोळसा खाण वाटप घोटाळा - 10 लाख 70 हजार कोटी?

दहा लाख कोटींचा घोटाळा... डोळे विस्फारणारा हा आकडा दिलाय कॅगनं... एका वृत्तपत्राने दिलेल्या या बातमीमुळे देशभरात खळबळ माजलीय. या वृत्तपत्रानुसार...

कोळसा खाण वाटप घोटाळा ?

2004 ते 2009 या काळात केंद्र सरकारनं 155 कोळसा खाणींचं वाटप केलं. पण हे वाटप लिलाव पद्धतीनं करण्यात आलं नाही आणि त्यामुळे सरकारचं तब्बल दहा लाख सत्तर हजार कोटींचं नुकसान झालं. या बातमीवरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. कोळसा खाणींचं वाटप लिलाव पद्धतीनं करण्याचा निर्णय सरकारने 2007 सालीच घेतला होता, मग त्याची अंमलबजावणी का झाली नाही, असा सवाल विरोधकांनी विचारला. या मुद्द्यावर पुढच्या आठवड्यात चर्चा करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं.

दरम्यान, कोळसा खाण वाटपासंबंधीचं वृत्त दिशाभूल करणारं आहे, असा कॅगनंच म्हटल्याचं पंतप्रधान कार्यालयानं सांगितलंय. याबाबतचा अंतिम अहवाल अजून तयारच झाला नाही, त्यावर काम सुरु असल्याचं कॅगने पंतप्रधान कार्यालयाला कळवलंय. कॅगचा हा अहवाल प्राथमिक स्वरुपाचा असला तरी घोटाळ्यांच्या गर्तेत सापडलेल्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालच्या यूपीएसाठी हा आणखी एक मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2012 05:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close